Zebra tackles multiple crocodiles and safely makes it to the shore video goes viral
सोशल मीडियावर रोज काही ना काही मजेशीर, भायवह, विचित्र असे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये प्राण्यांच्या जीवानाशी संबंधित देखील अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये पाळीव आणि जगंली प्राण्यांचे विविध व्हिडिओ तुम्ही पाहिले असती. कधी मांजर आणि कुत्र्यांची भांडणे तर कधी त्यांच्या मैत्रीचे व्हिडिओ पाहायला मिळतात. शिवाय म्हैस, बैल, रेडा, शेळी मेंढी अशा इतर पाळीव प्राण्यांचे देखील व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. यातील काही व्हिडिओ अतिशय गोंडस असतात, तर काही व्हिडिओ थरकाप उडवणारे. हत्ती, वाघ, सिंह, गोरिला, यांसारख्या अनेक प्राण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर असतात. यामध्ये जंगली हिंसक प्राण्यांच्या शिकारीचे तर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील.
वाघ, सिंह आपले भक्ष्य शोधताना, त्यांची शिकार करताना किंवा त्यांची शिकार होतानाचे व्हिडिओ असतात. आता पुन्हा एकदा असाच एक भयावह व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये चार पाच मगरीच्या तावडीत झेब्रा अडकला आहे. काही सेकंदातच झेब्रा मगरींची मेजवानी बनला असता, मात्र झेब्राच्या जीव वाचवण्यासाठीच्या धडपडीने त्याचे प्राण थोडक्यात बचावले आहेत.
व्हायरल होत असले्ल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, एक झेब्रा नदीमधून बाहेर जाताना दिसत आहे. अगदी हळहळू झेब्रा पाण्यातून बाहेर जात आहे. याच वेळी चार पाच मगरी झेब्राच्या आजूबाजूला येतात. यामुळे झेब्राला बाहेर जाता येत नाही. तुम्ही पाहू शकता की, मगरी झेब्रावर हल्ला करत आहेत. कोणी झेब्राच्या मानेला जबड्यात धरत आहे, तर कोणी त्याच्या पायावर हल्ला करत आहे. झेब्रा देखील त्याच ताकदीने उत्तर देत आहे. झेब्रा हार न मानता आपले प्राण वाचवण्यासाठी लढत आहे. झेब्रा नदीच्या काठाच्या दिशेने जात आहे, याच वेळी मागून होणाऱ्या मगरींच्या हल्लाला देखील लाथ मारुन पाडत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Zebra tackles multiple crocs and safely makes it to the shore!
pic.twitter.com/mGN7BVy9CM — Cats & Dogs Universe (@CatsandDogsmem) July 18, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @AMAZlNGNATURE या अकाउंटवर शेअक करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत मिलियन लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने झेब्रा तर पहलवान निघाला असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने झेब्राने मृत्यूला मात दिली असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.