ISKCON च्या रेस्टॉरंटमध्ये तरुणाची हुल्लडबाजी; थेट KFC ची चिकन बकेट काढली अन्..., VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. आपल्याला जगभरातील घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर लंडनमधील एक धक्कादायतक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एका तरुणाने लंडनच्या एका इस्कॉन रेस्टॉरंटमध्ये असे काही केले आहे, यामुळे हिंदू समुदायामध्ये संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लंडनमधील आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत समाजाच्या (इस्कॉन) गोविंद रेस्टॉरंटमध्ये एक तरुणाने खाल्ले आहे. यामुळे हिंदू समाजाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. तरुणाच्या या कृतीला हिंदू संस्कृतीचे आणि धार्मिकतेचे अपमान असल्याचे लोकांनी म्हटले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक आफ्रिकन-ब्रिटिश वंशाचा तरुण गोविंद रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करत आहे. रेस्टॉरंटमध्ये आल्यानंतर तो मांसाहारी भोजन आहे का असा प्रश्न करतो. यावर रेस्टॉरंटमधील कर्मचारी आणि मालक इथे केवळ शाकाहारी भोजन मिळते. कांदा आणि लसूनचेही भोजन मिळत नाही असे त्याला सांगतात. त्यानंतर तरुण केएसी ची चिकन बकेट काढतो आणि तिथेच रेस्टॉरंटमध्ये खाऊ लागतो.
यामुळे रेसॉरंटमधील कर्मचारी, ग्राहक आणि मालकाला धक्का बसतो. सर्वजण त्याला बाहेर जाण्यास सांगतात. परंतु तरुण बाहेर जात नाही, तिथेच चिकन खात उभा असतो. या घटनेने सध्या सोशल मीडियावर हिंदू लोकांनी देखील संताप व्यक्त केला आहे. रेस्टॉरंटमधील एका ग्राहकाने तरुणाला समजवण्याचा प्रयत्न देखील केला आहे. त्याने म्हटले आहे की, माफ करा, परंतु तुम्ही जे करत आहे, हे रेस्टॉरंटच्या नियमांचे उल्लंघन आहे, हे योग्य नाही. मात्र यावरही तरुणाचे चिकन खाणे सुरुच आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Shameless African-British man forcibly eats chicken at ISKCON Govinda’s restaurant in London. MAN (Enters): Only veg food here? STAFF: Yes, only vegetarian food. What would you like? Then he pulled out KFC chicken and began eating it inside pic.twitter.com/iRhGiQqlNG — Sumit (@SumitHansd) July 20, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी याला हिंदू धर्माचा अपमान असल्याचे म्हटले आहे. या घटनेमुळे हिंदू समाजातील लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असल्याचे लोकांनी म्हटले आहे. तरुणाविरोधात कारवाई करायला हवी असेही अनेकांनी म्हटले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.