दाखवतोच तुला इंगा! पार्टनरवर हल्ला केल्याचे पाहताच चवताळून उठला झेब्रा, जंगलाच्या राजाला असे उधळून लावले की... Video Viral
सोशल मीडियावर नेहमीच अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे असे अनेक व्हिडिओ शेअर होतात ज्यांना पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्का मिळेल. आताही इथे असाच एक थक्क करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात सिंह आणि झेब्रातील संघर्ष दिसून आला. सिंहाच्या लढतीचे अनेक व्हिडिओ याआधीही इंटरनेटवर शेअर झाले आहेत मात्र आताचा व्हिडिओ काहीसा वेगळा आहे. यात झेब्राने चक्क जंगलाच्या राजाला पुरेपूर धुळीत मिळवल्याचे दिसून येते. हे दृश्य थरारक पण तितकेच मनोरंजक वाटू लागते. पुढे काय घडते ते जाणून घेऊया.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, जो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. यात सिंह आणि झेब्रा यांच्यातील धोकादायक लढत दाखवण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये सिंह झेब्रावर हल्ला करतो, पण तेवढ्यात दुसरा झेब्रा येतो आणि आपल्या मित्राला वाचवण्याचा प्रयत्न करतो. हे दृश्य इतके रोमांचक आणि अनोखे आहे लोक ते पुन्हा पुन्हा पाहत आहेत आणि शेअरही करत आहे. यातील दृश्य कोणत्या चित्रपटाच्या सीनहुन कमी वाटत नाही.
काय दिसले व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात सिंह झेब्राची शिकार करण्याचा प्रयत्न करत आहे. तो पटकन तिच्यावर झेपावतो आणि तिला पकडण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो. पण कथेत ट्विस्ट येतो जेव्हा दुसरा झेब्रा धावत येतो आणि सिंहाशी भिडतो. दोन्ही झेब्रा एकत्रितपणे सिंहावर हल्ला करतात आणि त्यांच्या धैर्याने त्याला मागे हटण्यास भाग पाडतात. शेवटी सिंह हार मानून पळून जातो आणि झेब्रा त्यांचे प्राण वाचवतात. या व्हिडीओने जंगलाचे सत्य समोर आणले आहे की शक्तीसोबतच धैर्य आणि एकताही आवश्यक आहे. सिंह हा जंगलाचा राजा मानला जातो, परंतु यावेळी झेब्राच्या एकजुटीने त्याचा पराभव केला. दोन्ही झेब्रानी मिळून आपला जीव वाचवला आणि सिंहाला रिकाम्या हाताने परतावे लागले. आपल्या धाडसाने आपण मोठमोठ्या संकटांवरही मात करू शकतो ही शिकवण आपल्याला या व्हिडिओतून मिळते.
The fight Zebra and lion 😱 pic.twitter.com/h82Ll6kUwT
— THE WILD ANIMALS (@TheWildAnimal_) March 6, 2025
सिंह झेब्राच्या लढतीचा हा व्हिडिओ @TheWildAnimal_ नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘सिंह आणि झेब्रामधील लढत’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आहे, लोक आता वेगाने हा व्हिडिओ शेअर करत आहेत आणि यातील रोमांचक दृश्यांची मजा लुटत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.