इस्लामाबाद- पाकिस्तान चीनला धोका देण्याची शक्यता आहे. चीनवर लाढते आर्थिक अवलंबित्व आणि आर्थिक संकटामुळे, पाकिस्तान येत्या काळात ‘चायना-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर’मधून (CPEC) बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. ‘चायना-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर’ रद्द करण्याचा प्रस्ताव पाकिस्तानने दिल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे. मात्र अमेरिकेने मदत दिल्यासच पाकिस्तान हे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.
पाकिस्तान बदलत्या काळानुसार अमेरिकेशी पुन्हा एकदा चांगले संबंध प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात आहे. याचसाठी मोईल युसुफ यांना इम्रान खान यांनी पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. जर पाकिस्तानला वॉशिंग्टनकडून आर्थिक मगत मिळाल्यास, ‘चायना-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर’मधून बाहेर पडण्याची पाकिस्तानची तयारी आहे.
अशा प्रकारचे प्रयत्न य़ापूर्वीही करण्यात आले आहेत. जुलै २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेकडून बेलआऊट पॅकेजच्या व्यतिरिक्त पाकिस्तानच्या पदरात फारसे काही पडलेले नाही. कतार आणि अफगाणिस्थानच्या मुद्द्यावरुन पाकिस्तान सध्या अमेरिकेच्या बॅड बुकमध्ये आहे.
यापूर्वी इम्रान खान यांनी ‘चायना-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर’ आणि ग्वादर बंदरात होत असलेल्या विकासाला महान संधी म्हणून इम्रान खान यांनी संबोधले होते. तसेच हे सगळे चीनचे कर्जाचे जाळे असल्याच्या वृत्ताचाही त्यांनी इन्कार केला होता.
दोन वर्षांपासून हे काम बंद असल्याने चीन नाराज आहे. कारण चीनने आताप्र्यंत या प्रलक्पावर १६ अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत. चीनची समजूत काढून, इम्रान खान सरकार हे काम सुरु करण्याच्या प्रयत्नात असतानाच, तिथे त्याला विरोध होतो आहे. बलुचिस्तानात असलेल्या ग्वादरमध्ये राजकीय पक्ष, चळवळीतील कार्यकर्ते, मच्छिमार आणि स्थानिक या प्रकल्पाच्या विरोधी सभांमध्ये सातत्याने सहभागी होत आहेत.
‘चायना-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर’चे कोणतेही काम सुरु करण्याआधी, इथे मूलभूत सोयीसुविधा द्या, अशी त्यांची मागणी आहे. यात पिण्याचे पाणी, वीज, मच्छिमारीसाठी पूरक वातावरण, इराण सीमेवरील निर्बंध हटविणे यासारख्या मागण्या आहेत.
[read_also content=”मरताना डोक्यात काय विचार येतात? मृत्यूनंतरही मेंदू काम करतो का? इतिहासात प्रथमच डॉक्टरांनी केले मेलेल्या व्यक्तीचे ब्रेन स्कॅनिंग https://www.navarashtra.com/technology/what-thoughts-come-to-mind-when-dying-does-the-brain-work-even-after-death-for-the-first-time-in-history-doctors-performed-a-brain-scan-of-dying-person-nrvk-245495.html”]