
अमेरिका-इराण युद्ध पेटले! '48 तासांत इराणवर नरक कोसळेल' (Photo Credit- AI)
इराणने गेल्या काही दिवसांपासून जगातील महत्त्वाचा व्यापारी समुद्री मार्ग ‘होर्मुजची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) बंद केला आहे. ट्रम्प यांनी हा मार्ग त्वरित खुला करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मी इराणला चर्चेसाठी किंवा होर्मुज मार्ग उघडण्यासाठी 10 दिवसांचा वेळ दिला होता, हे लक्षात आहे ना? आता वेळ वेगाने निघून जात आहे. 48 तासांनंतर इराणमध्ये ‘पावर दिवस’, ‘प्लांट दिवस’ आणि ‘ब्रिज दिवस’ एकाच वेळी साजरे केले जातील,” असा सूचक इशारा देत त्यांनी इराणचे वीज प्रकल्प आणि पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करण्याचे संकेत दिले आहेत.
US President Donald Trump has posted this about the Iran War on his official Truth Social account. pic.twitter.com/8ymSOFcWRm — ANI (@ANI) April 5, 2026
या युद्धादरम्यान अमेरिकेने इराणच्या हद्दीत शिरून एक अत्यंत धाडसी रेस्क्यू ऑपरेशन राबवले. इराणच्या डोंगराळ भागात अडकलेल्या आपल्या F-15 लढाऊ विमानातील जखमी वैमानिकाची (कर्नल दर्जाचे अधिकारी) अमेरिकेने सुटका केली आहे. इराणी सैन्य या वैमानिकाच्या अगदी जवळ पोहोचले असताना अमेरिकेने दिवसाढवळ्या ही कारवाई केली. “अशा मोहिमा अत्यंत दुर्मिळ असतात. आमच्या शूर सैनिकांनी इराणच्या आकाशात सात तास घालवून आपल्या सहकाऱ्याला सुखरूप परत आणले. ही अद्भूत शौर्याची पराकाष्ठा आहे.”
US Iran War : अमेरिकेला दुसरा मोठा झटका! इराणने आणखी एक विमान पाडलं? जगभरात खळबळ
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सोमवारी दुपारी 1 वाजता ओव्हल ऑफिसमध्ये लष्करी अधिकाऱ्यांसह एक मोठी पत्रकार परिषद घेणार आहेत. या परिषदेत इराणविरुद्धच्या पुढील लष्करी कारवाईची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मध्य पूर्वेतील अरब देशांमधील आर्थिक केंद्रांवर इराणने सुरू ठेवलेले हल्ले पाहता, अमेरिका आता पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरल्याचे दिसत आहे.
दुसरीकडे, इराणने अद्याप माघार घेण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत. होर्मुजवर आपले नियंत्रण कायम ठेवत इराणने अमेरिकेच्या धमक्यांना न जुमानण्याची भूमिका घेतली आहे. मात्र, ट्रम्प यांनी दिलेल्या 48 तासांच्या अल्टिमेटममुळे जागतिक बाजारपेठेत, विशेषतः कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी खळबळ माजली आहे. जर हा वाद निवळला नाही, तर जागतिक स्तरावर मोठे आर्थिक संकट ओढवू शकते.