
Iran Claims to Have Shot Down US C‑130 aircraft
US Politics : इराणशी युद्ध डोनाल्ड ट्रम्प यांच्या आंगलट? लोकप्रियतेचा आलेख घरसला, खुर्ची धोक्यात?
इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी(०५ एप्रिल २०२६) देशांच्या संयुक्त लष्करी कमांडला मोठा विजय मिळाला आहे. या कमांडने इस्फाहान शहरात दोन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर आणि एक C-130 लष्करी वाहतूक विमान पाडल्याचे माध्यमांनी सांगितले आहे. सोशल मीडियावर या संदर्भात एक पोस्टही करण्यात आली आहे. यामुळे सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे. यापूर्वी इराणने अमेरिकेचे F-15 फायटर जेट हाणून पाडल्याचा दावा केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, या विमानाच्या पायलटलाही ताब्यात घेण्यात आले होते. परंतु त्याची सुरक्षित आणि यशस्वी सुटका करण्यात आली आहे. सध्या पुन्हा एकदा झालेल्या हल्ल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
IRGC PR: A U.S. enemy #aircraft searching for the downed fighter pilot was destroyed in southern Isfahan. Further details to follow.#Iran #IRGC #BreakingNews #Pilot #War pic.twitter.com/UeJWSDPbJo — Consulate General of the I.R. Iran in Mumbai (@IRANinMumbai) April 5, 2026
हा हल्ला अशा वेळी करण्यात आला आहे, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला शांतता करारसाठी ४८ तासांचा अल्टीमेटम दिला आहे. किंवा होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यास सांगितली आहे. असे न केल्यास इराणला गंभीर परिणाम भोगावे लागतील असे त्यांनी म्हटले आहे. मात्र इराणेन या धमक्यांना फेटाळून लावले असून कोणत्याही दबावापुढे झुकणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
याच वेळी इस्रायलचे सैन्य इराणवर सातत्याने हल्ले करत आहे. इराणच्या लेबनॉनमधील हिजबुल्लाह संघटनेला लक्ष्य केले जात आहे. आतापर्यंत १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले केले आहे. याचा उद्देश इराणची बाह्य लष्करी क्षमता उद्ध्वस्त करणे होतो. तसेच इराणने देखील पलटवार सुरु ठेवले आहेत.