Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

China Flood : चीनमध्ये हाहाकार! महापुरात शहरंच्या शहरं बुडाली, लाखो लोक बेघर

चीनमधील गुइझोऊ प्रांतात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली असून या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत किमान १४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १७ जण बेपत्ता आहेत.

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 24, 2025 | 10:14 PM
चीनमध्ये हाहाकार! महापुरात शहरंच्या शहरं बुडाली, लाखो लोक बेघर

चीनमध्ये हाहाकार! महापुरात शहरंच्या शहरं बुडाली, लाखो लोक बेघर

Follow Us
Close
Follow Us:

चीनमधील गुइझोऊ प्रांतात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली असून या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत किमान १४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १७ जण बेपत्ता आहेत. या महापुरामुळे संपूर्ण प्रांतात भू-स्खलन, रस्ते व पूल कोसळण्याच्या घटना घडल्या असून ३,००,००० हून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

Iran Israel War : ट्रम्प यांच्या प्रयत्नांना धक्का, युद्धबंदी नाहीच? इराणचा पुन्हा हल्ला, इस्रालकडूनही सैन्याला आदेश

या पूरस्थितीमुळे अनेक भागातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. नदीकाठच्या आणि डोंगर उतारावरील गावांमध्ये पाणी शिरलं असून अनेक कुटुंबांना मध्यरात्री घर सोडावं लागलं. प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून अनेक ठिकाणी हेलिकॉप्टर्स, ड्रोन आणि रबरी बोटींनी अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या पूरात सर्वात मोठी दुर्घटना वू नदीवर घडली. एक पर्यटकांची बोट उलटून १० जणांचा मृत्यू झाला. हे सर्व पर्यटक पर्यटनासाठी आले होते, मात्र अचानक आलेल्या पुराच्या लाटेत बोट बुडाली. या अपघातात अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. दुसरीकडे, भूस्खलनामुळे चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गुइझोऊमधील रस्ते, पूल आणि उड्डाणपुलांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. एका प्रसंगात, एक मालवाहू ट्रक पुलावरून कोसळला. ट्रकचालक पुलाच्या तुटलेल्या टोकाला लटकून वाचण्याचा प्रयत्न करत होता. त्याला शेवटी रेस्क्यू टीमने वाचवले. अशा अनेक अपघातांच्या घटना समोर आल्या आहेत ज्यांनी स्थानिक नागरिकांचे मानसिक संतुलनही ढासळले आहे.

सांडू काउंटीमध्ये १,४४१ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे आणि या भागांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी प्रशासन ड्रोन आणि बोटींवर अवलंबून आहे. स्थानिक प्रशासन, आपत्कालीन विभाग आणि स्वयंसेवी संस्था एकत्रितपणे मदतकार्य करत असून अन्न, पाणी आणि औषधसाहित्य पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

या आपत्तीत स्थानिक उद्योग, शेती, घरे आणि लहान व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार एकूण आर्थिक नुकसान अमेरिकन १ ते २ अब्ज डॉलर्स दरम्यान असू शकते. त्यातील बहुतांश नुकसान हे रस्ते आणि पूल यांच्याशी संबंधित पायाभूत सुविधांचे आहे.

Khamenei : बलाढ्य अमेरिका अन् इस्रायलला एकटा नडला इराण; एकाही देशाची साथ नसताना खामेनेई बनले जगभरातील मुस्लिमांचे हिरो

हवामान खात्याने पुढील काही दिवसांत आणखी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क आहे आणि नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे. हवामान बदलामुळे पावसाचे प्रमाण आणि त्याची तीव्रता वाढत असल्याने,  यंदाच्या मॉन्सून हंगामातील चीनमधील गुइझोऊ प्रातं सर्वाधिक प्रभावित झाला आहे.

Web Title: 14 died in southwest china floods after heavy rain 300000 people affected latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2025 | 10:14 PM

Topics:  

  • China
  • flood
  • Heavy Rainfall

संबंधित बातम्या

Maharashtra Heavy Rain: पुणे, रायगडसह ‘या’ जिल्ह्यांत तुफान पाऊस कोसळणार; कोकणात तर उंचच उंच…
1

Maharashtra Heavy Rain: पुणे, रायगडसह ‘या’ जिल्ह्यांत तुफान पाऊस कोसळणार; कोकणात तर उंचच उंच…

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस
2

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस

Koyna Dam: सांगली-कोल्हापूरवर महापुराचे संकट; कोयनेतून तब्बल ८०,५०० क्युसेकने विसर्ग सुरू
3

Koyna Dam: सांगली-कोल्हापूरवर महापुराचे संकट; कोयनेतून तब्बल ८०,५०० क्युसेकने विसर्ग सुरू

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर
4

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.