Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीवाला धोका; अवघ्या 17 वर्षांच्या मुलाने रचला हत्येचा कट, पाहा कोण?

Nikita Casap : अमेरिकेतून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. 17 वर्षांच्या निकिता कॅसॅप या किशोरवयीन मुलावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ठार मारण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 14, 2025 | 11:25 AM
17-year-old Nikita Kasap charged with plotting to kill President Trump

17-year-old Nikita Kasap charged with plotting to kill President Trump

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन : अमेरिकेतून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. 17 वर्षांच्या निकिता कॅसॅप या किशोरवयीन मुलावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ठार मारण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकंच नव्हे तर त्याने आपल्या आई आणि सावत्र वडिलांचीही हत्या केल्याचा आरोप आहे. या गंभीर प्रकरणामुळे अमेरिकेतील राष्ट्रीय सुरक्षेच्या पातळीवर चिंता व्यक्त केली जात आहे.

विस्कॉन्सिन राज्यातील मिलवॉकी परिसरात राहणारा निकिता कॅसॅप हा मुलगा केवळ हिंसक कटात सामील होता असे नाही, तर त्याने स्वतःच्या पालकांची हत्या करून घरातील रोख रक्कम आणि कुटुंबीयांचा कुत्रा घेऊन पळ काढला. या संपूर्ण कटामागचा उद्देश अमेरिकेतील सरकार उलथवण्याचा होता, असे तपास यंत्रणांनी स्पष्ट केले आहे.

पालकांची हत्या आणि दोन आठवडे मृतदेहांसोबत वास्तव्य

फेब्रुवारी 2025 मध्ये कॅसॅपने आपल्या 35 वर्षीय आई तातियाना कॅसॅप आणि 51 वर्षीय सावत्र वडील डोनाल्ड मेयर यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली. ही हत्या 11 फेब्रुवारी रोजी झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अत्यंत विकृतपणे, कॅसॅपने दोन आठवडे त्या मृतदेहांसोबत राहिले. 28 फेब्रुवारी रोजी कुटुंबीयांनी आणि शाळेतील अनुपस्थितीमुळे पोलिसांनी चौकशी केली असता, ही घटना उघडकीस आली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangladesh Anti-Israel Passport : बांगलादेशात लाखो लोक रस्त्यावर उतरले पाहून युनूस सरकारचे धाबे दणाणले

Nikita Casap, 17, from Waukesha Wisconsin was arrested after murdering both his parents and fleeing with their car and money as part of an accelerationist conspiracy to assassinate President Trump.

Casap was directly linked to individuals who I have identified as being Order of… pic.twitter.com/cHr3YkMprL

— Bx (@bx_on_x) April 13, 2025

credit : social media

14,000 डॉलर्स घेऊन फरार, ट्रम्पला लक्ष्य करण्याचा कट

हत्या केल्यानंतर कॅसॅप 14,000 डॉलर्स रोख रक्कम, पासपोर्ट आणि कुत्रा घेऊन फरार झाला. त्याने टेलिग्राम या अ‍ॅपद्वारे एका रशियन व्यक्तीशी संपर्क केला होता. त्याचा युक्रेनमध्ये पळून जाण्याचा प्लॅन होता, असे एफबीआयच्या वॉरंटमध्ये नमूद करण्यात आले आहे. एफबीआयच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या जाहीरनाम्यात कॅसॅपने ट्रम्पविरोधातील जहाल भावना व्यक्त केल्या आहेत. त्यात डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राचा शत्रू घोषित करत त्यांना ठार मारण्याचे स्पष्ट विधान आहे. त्याने लिहिलेला तीन पानांचा यहूदीविरोधी दस्तऐवज, अ‍ॅडॉल्फ हिटलरची स्तुती आणि ‘ऑर्डर ऑफ नाइन एंजल्स’ या नव-नाझी गटाशी संबंधित साहित्य देखील पोलिसांना सापडले.

गंभीर आरोपांची मालिका आणि न्यायालयीन कारवाई

ऑनलाइन न्यायालयीन नोंदीनुसार, निकिता कॅसॅपवर नऊ गंभीर आरोप लावण्यात आले आहेत, ज्यात पालकांची हत्या, मृतदेह लपवणे, बेकायदेशीर शस्त्र वापर आणि सरकारविरोधी कट रचणे यांचा समावेश आहे. मार्च महिन्यात त्याला कॅन्सस राज्यात अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला १० लाख डॉलर्सच्या जामिनावर तुरुंगात ठेवण्यात आले आहे. ९ एप्रिल रोजी झालेल्या प्राथमिक सुनावणीनंतर, आता त्याची पुढील सुनावणी ७ मे रोजी होणार आहे.

राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि अंतर्गत दहशतवादाचे संकट

या प्रकरणामुळे अमेरिकेतील अंतर्गत दहशतवाद आणि कट्टर विचारसरणीच्या प्रसाराचे संकट अधोरेखित झाले आहे. एका किशोरवयीन मुलाकडून अशा प्रकारचा संगनमत आणि हिंसक कट रचला जाणे, ही देशासाठी गंभीर बाब मानली जात आहे. एफबीआय, स्थानिक पोलीस आणि फेडरल सुरक्षा यंत्रणा या प्रकरणाकडे उच्चस्तरीय सुरक्षेच्या दृष्टीने पाहत असून, या कटामागे कोणते आंतरराष्ट्रीय जाळे कार्यरत आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Earthquake in Tajikistan: ताजिकिस्तानमध्ये सलग भूकंपांचे धक्के, संपूर्ण आशिया हादरले

निकिता कॅसॅपचे प्रकरण

निकिता कॅसॅपचे प्रकरण हे केवळ एक गंभीर गुन्हेगारी घटना नाही, तर ते अमेरिकेतील अस्वस्थ सामाजिक मानसिकता, दहशतवाद, आणि युवकांमध्ये पसरत असलेल्या अतिरेकी विचारांचे प्रतीक आहे. या प्रकरणातून सरकारविरोधी विचारसरणीला आणि देशांतर्गत सुरक्षेला निर्माण होणाऱ्या धोक्यांना गांभीर्याने घेणे अत्यावश्यक आहे.

Web Title: 17 year old nikita kasap charged with plotting to kill president trump nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2025 | 11:18 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • international news

संबंधित बातम्या

इस्रायलच्या हल्ल्यानंतर चवताळले इराण सरकार; हेरगिरीच्या आरोपाखाली तब्बल २१ हजार नागरिकांना तुरुंगवास
1

इस्रायलच्या हल्ल्यानंतर चवताळले इराण सरकार; हेरगिरीच्या आरोपाखाली तब्बल २१ हजार नागरिकांना तुरुंगवास

Trump-Putin Meeting: ट्रम्प-पुतिन यांच्या अ‍लास्कातील भेटीवर भारताची प्रतिक्रिया; ‘शांततेच्या प्रयत्नांचे कौतुक’
2

Trump-Putin Meeting: ट्रम्प-पुतिन यांच्या अ‍लास्कातील भेटीवर भारताची प्रतिक्रिया; ‘शांततेच्या प्रयत्नांचे कौतुक’

Viral : अमेरिकेला गंडवलं? खरे नाही तर ‘क्लोन पुतिन’ने घेतली ट्रम्पची भेट; सोशल मीडियावर धुमाकूळ
3

Viral : अमेरिकेला गंडवलं? खरे नाही तर ‘क्लोन पुतिन’ने घेतली ट्रम्पची भेट; सोशल मीडियावर धुमाकूळ

Russia Ukraine War : झेलेन्स्कींना झटका! ट्रम्प-पुतिन बैठीदरम्यान रशियन सैन्याचा युक्रेनच्या दोन भागांवर ताबा
4

Russia Ukraine War : झेलेन्स्कींना झटका! ट्रम्प-पुतिन बैठीदरम्यान रशियन सैन्याचा युक्रेनच्या दोन भागांवर ताबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.