2 killed in south korea bridge collapse
सियोल: दक्षिण कोरियात एक मोठी दुर्घटना घडली आहे. एका एक्सप्रेसवे बांधकामाच्या ठिकाणी मंगळवारी (25 फेब्रुवारी) एक पुलाचा एक भाग कोसळला. यामुळे दोन नागरिकांचा मृत्यू आणि पाचजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिण कोरियाच्या अनसेओंगमध्ये धुराचे मोठे ढग हवेत दिसले. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ही घटना सियोल पासून 65 किलोमीटर अतंरावर असलेल्या दक्षिण भागातील अनसेओंग भागांत घडली. स्थानिक वेळेनुसार सकाळी 9.30 च्या सुमारास दुर्घटना झाली. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार जण गंभीर जखमी झाले असून एकाला किरकोळ दुखापत झाली आहे. सध्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा तीन शोध प्रशासनाने सुरु केला आहे.
BIG BREAKING NEWS
At least 3 construction workers killed, 5 injured after portion of highway overpass collapsed near Anseong, South Korea
🇰🇷🇰🇷‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️ pic.twitter.com/qk6LSajfLe
— WW3 Monitor (@WW3_Monitor) February 25, 2025
जखमी रुग्णालयात दाखल
बचाव पथकाने जखमी झालेल्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. राष्ट्रपती चोई सांग मोक यांनी बचाव पथकाला कार्य सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांनी इतर नागरिकांनी परिसरात न जाण्याचे आवाहन केले आहे.
व्हायरल व्हिडिओ
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, पुल एका बाजून अचानक धडाधड कोसळलेला दिसत आहे. हे दृश्य अगदी चित्रपटांमधील दृश्यासारखे वाटत आहे. सध्या बाचव कार्य सुरु असून मलब्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध सुरु आहे. स्थानिक अधिकारी आणि प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी देखील अशा अनेक घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे 2020-2023 दरम्यान घडलेल्या घटनांमध्ये 8 हजारहूंन अधिक लोकांचा मृत्यू अशा दुर्घटनांमध्ये झाला आहे.
दक्षिण कोरियाच्या या भागात नागरिकांना जाण्यास मनाई
मध्य आफ्रिकेतील काँगोच्या पूर्व भागात सुरू असलेल्या हिंसाचारामुळे दक्षिण कोरियाने आपल्या नागरिकांसाठी कठोर प्रवास निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली. दक्षिण कोरिया सरकारने लादलेले हे सर्वात कडक प्रवास निर्बंध असून नागरिकांना या भागांमध्ये जाण्याची परवानगी देण्यात येणार नसल्याचे सरकारने सांगितले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- बांगलादेशात शेख हसीना यांचे जोरदार कमबॅक; ‘या’ निवडणुकीत दणदणीत विजय