26/11 Mumbai Attack Accused Tahawwur Rana Files New Petition Against Extradition in US Court
वॉशिंग्टन: मुंबई (26/11) हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाने प्रत्यार्पणाविरोधात पुन्हा एकदा नवीन याचिका दाखल केली आहे. ही याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्याधीशांना पाठवण्यात आली आहे. पुन्हा एकदा प्रत्यापर्ण थांबवण्यासाठी राणाने अपील दाखल केली. यापूर्वी न्यायमूर्ती एलेना कागन यांनी राणाची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली होती. राणाने दावा केला आहे की, त्याला भारतात प्रत्यार्पण केले गेले तर त्याच्या जिवाला धोका आहे. राणा पाकिस्तानी वंशाचा मुस्लिम असल्याने आणि मुबंई हल्ल्यांशी संबंधित आरोपांमुळे त्याला छळ सहन करावा लागेल. तसेच त्यांनी खराब प्रकृतीचा हवाल देते याचिका दाखल केली आहे.
दरम्यान अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय तव्वहुर राणाच्या याचिकवेर विचार करु शकते असे म्हटले जात आहे. या याचिकेवर 4 एप्रिल 2025 रोजी खाजगी परिषदेत चर्चा करण्यात येणार आहे. सध्या 63 वर्षीय राणा लॉस एंजेलिसच्या तरुंगात आहे. राणा पाकिस्तानी दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबा (LeT) चा सदस्य आणि 26/11 हल्ल्याचा मास्टरमांइड डेव्हिड हेडलीचा जवळचा सहकारी अस्लयाचे मानले जाते. 2008 मद्ये मुबंईतक झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यात 166 जणांना जीव गमवावा लागला होता.
तहव्वूर राणाला 2009 मध्ये FBIकडून अटक करण्यात आली होती. तर अमेरिकेत राणाला लष्कर-ए-तोएबला पाठिंबा दिल्याने दोषी करार देण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, राणाने हेडलील त्याच्या बेकायदेशीर इमिग्रेशन व्यवसायाचा वापर भारतात प्रवास करण्यासाठी, तसेच संभाव्य हल्ल्यासाठी ठिकाणांची माहिती पुरवली होती. 2009 मध्ये शिकागो येथे FBI ने पाकिस्तान समर्थित दहशतवादी नेटवर्कमध्ये राणाच्या भूमिकेसाठी अटक केली होती. मात्र, मुंबई हल्ल्याशी त्याचा थेट संबंध असल्याचा पुरावा न मिळाल्याने त्याला निर्दोष मुक्त करण्यात आले होते.
फेब्रुवारीत राणाच्या प्रत्यार्पणाला ट्रम्प यांनी दिली मंजुरी
गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राणाच्या प्रत्यार्पणला मानत्या दिली होती. ट्रम्प यांनी राणाला ‘धोकादायक दहशतवादी’ म्हणून संबोधले आहे. 211 मद्ये, भारताच्या राष्ट्रीय तपसा संस्थेने (NIA) तव्वहुर राणा आणि इतर आठ जणांविरुद्ध मुंबई हल्ल्याचा कट रचल्याचा आणि अंमलबजावणी केल्याचा आरोप करत आरोपपत्र दाखल केले.
या आरोपपत्रात २६/११ च्या मुंबई हल्ल्याचे नियोजन आणि अंमलबजावणी केल्याचा आरोप होता. तहव्वुर राणा बद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच म्हटले होते की, ‘आम्ही कसाबला पाहिले. काय मोठी गोष्ट आहे? आम्ही त्याला महाराष्ट्रात नक्कीच ठेवू, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.