3 Girls brutaly killed in Argentina
ब्यूनस आयर्स : अर्जेंटिनामध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. तीन तरुणींची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण अर्जेंटिनामध्ये खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या हत्येला इन्स्टाग्रामवर लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १९ सप्टेंबर रोजी घडली होती, जी आता समोर येत आहे. सध्या देशभरात याविरोधात तीव्र निदर्शने सुरु आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ड्रग्ज तस्कीर गटाने या तरुणींची हत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ड्रग्ज तस्करी गटातील लोकांनी तरुणींना प्रथम बेदम मारहाण केली, त्यांची बोटे कापली, नखे उपटून टाकली आणि नंतर त्यांची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या प्रकरणाअंतर्गत तीन पुरुषांना आणि दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. सध्या त्यांची चौकशी सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणींना एका पार्टीचे आमंत्रण देण्याच्या बहाण्याने त्यांना व्हॅनमध्ये नेण्यात आले आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की या तरुणी त्या टोळीचा भाग होत्या. परंतु त्यांनी त्यांच्या
गटाचे नियम तोडले आणि ड्रग्जची चोरी केली. ज्यामुळे या तरुणींची हत्या करण्यात आली. व्हिडिओमध्ये ड्रग्ज तस्करी करणाऱ्या गटाचा प्रमुखाने, जो कोणी ड्रग्ज चोरेल त्याच्यासोबत असेच होईल असा मेसेजही दिला असल्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग पाहणाऱ्या लोकांनी म्हटले आहे.
❗️🇦🇷 – In Argentina, the brutal triple femicide of Morena Verri, Brenda Loreley Del Castillo, and Lara Morena Gutiérrez has sparked widespread outrage and feminist protests. The three young women, aged 15 to 20, disappeared Friday night after entering a white van in La Tablada,… pic.twitter.com/5M7SUekBle — 🔥🗞The Informant (@theinformant_x) September 26, 2025
मृतांमध्ये मोरेना व्हर्डी, ब्रेंडा डेल कॅस्टिलो या २० वर्षांच्या आणि १५ वर्षांची लारा गुटेरेझ या तरुणांची समावेश आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलींना एका वेश्या म्हणून एका पार्टीमध्ये आमंत्रित करण्यात आले होते. परंतु पीडितांच्या कुटुंबियांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी त्यांच्या मुलींचा ड्रग्ज तस्करी किंवा वेश्या व्यवसायाशी कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेचे एका खाजगी खात्यावरुन लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात आल होते, जे ४५ लोकांनी पाहिले. फम इन्स्टाग्राम आणि मेटाने म्हटले की,त्यांना प्लॅटफॉर्मवर हत्येच्या लाईव्ह स्ट्रिमिंगचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत.
सध्ये देशात हत्या झालेल्या मुलींना न्या मिळावा यासाठी आंदोलन सुरु आहेत. हजारो लोक या घटनेविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. पीडितांच्या कुटुंबीयांनी लारा, ब्रेंडा, मोरेना असे लिहिलेले बॅनर आणि त्यांचे फोटो घेऊन
संसदेवर मोर्चा काढला आहे. या घटनेने संपूर्ण जग हादरले आहे.