US Firing : अमेरिकेत गोळीबाराचे सत्र सुरुच! कॅरोलिनात रेस्टॉरंटमधील हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, अनेक जखमी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
America Firing News in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेत (America) पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. २०२५ च्या सुरुवातीपासून २० हून अधिक गोळीबाराच्या घटना समोर आल्या आहेत. नुकतेच उत्तर कॅरोलिनात एका रेस्टॉरंटमध्ये गोळीबार करण्यात आला. यामध्ये तीन ठार तर अनेक जखमी झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
वाढत्या गोळीबाराच्या घटनांमुळे अमेरिकेच्या सुरक्षा व्यवस्था आणि कायद्यावर प्रश्न उपस्थि केले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शनिवारी (२७ सप्टेंबर) स्थानिक वेळेनुसार, रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. विल्मिंग्टनपासून २० मैल दक्षिणकेस असलेल्या साऊथपोर्ट यॉट बेसिन पसरिरात ही घटना घडली. एका अमेरिकन फिश या रेस्टॉरंटवर हल्ला करण्यात आला.
US Firing : अमेरिकेत पुन्हा गोळीबार! पेनसिल्व्हेनियात घरगुती वादाच्या चौकशीदरम्यान पोलिसांवरच हल्ला
गोळीबारानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यात किमान सात जणांना गोळ्या लागल्या यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयता दाखल करण्यात आले आहे. सध्या या घटनेवर पोलिसांनी इतर कोणतीही माहिती अधिकृपण जाहीर केलेल नाही. गोळीबारामागील कारणही सध्या अस्पष्ट आहे. हल्लेखोरांचा शोध सुरु असून परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गेल्या काही महिन्यात अमेरिकेत गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. गेल्या महिन्यात दक्षिण मिनियापोलिसमध्ये कॅथोलिक प्रार्थनेच्या वेळी देखील गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये दोन मुलांचा मृत्यू झाला होता, तर २१ जण जखमी झाले होते. तसेच १८ सप्टेंबर रोजी अमेरिकेच्या डेन्वहर शहरातही एका शाळेत गोळीबार करण्यात आला होता, ज्यामध्ये ३ विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते. गेल्या ५० वर्षात १५ लाखांहून अधिक लोक मरण पावले आहेत.
अमेरिकेत लहान शस्त्र खरेदीसाठी किमान वय वर्षे १८ आणि इतर शस्त्रांसाठी २१ वर्षे आहे. यामुळे अमेरिकेत जवळपास अनेक लोकांकडे बंदूका आहेत अशा परिस्थिती अमेरिकेत गोळीबाराच्या घटना आता सामान्य झाल्या आहेत.
अमेरिकेत कुठे घडली गोळीबाराची घटना?
अमेरिकेमध्ये उत्तर कॅरोलिनात एका रेस्टॉरंटमध्ये गोळीबार करण्यात आला. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली का?
अमेरिकेतील उत्तर कॅरोलिनात रेस्टॉरंटमध्ये झालेल्या गोळीबारात ३ जण ठार झाले असून अनेक जखमी झाले आहेत.
काय आहे हल्ल्यामागचे कारण?
उत्तर कॅरोलिनाच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गोळीबाराच्या मागे कारण सध्या अस्पष्ट असून घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे.
US Firing : अमेरिकेच्या डेन्व्हर शहरातील शाळेत गोळीबाराचा थरार ; हल्ल्यात ३ विद्यार्थ्यी गंभीर जखमी