33 killed in Thailand-Cambodia clashes India issues alert for its citizens
सध्या थायलंड आणि कंबोडियामध्ये जुन्या शिवमंदिरावरुन तीव्र संघर्ष सुरु आहे. गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या या संघर्षात मृतांचा आकडा ३३ पर्यंत पोहोचला आहे. यामध्ये कंबोडियाचे १३ सैनिक ठार झाले आहे. यात ८ नागरिक आणि ५ सैनिकांचा समावेश आहे. तर ७१ हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत.
याच वेळी थायलंडमध्ये २० जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १४ नागरिकांचा आणि ६ सैनिकांचा समावेश आहे. दोन्ही देश एकमेकांवर जाणूनबुजून हल्ला केल्याचा आरोप करत आहेत. दोन्ही देशांच्या २४ जुलै रोजी मलेशियाच्या मध्यस्थीने युद्धबंदीची सहमती दर्शवली होती. परंतु थायलंडने हल्ला करत या करारातून माघार घेतली. यामुळे कंबोडियाने संयुक्त राष्ट्रातर्फे युद्धबंदीचे आवाहन केल आहे. मात्र हा संघर्ष अधिक हिंसक झाला आहे.
थायलंड आणि कंबोडियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या नागरिकांसाठी एक सल्लागार जारी केला आहे. कंबोडियातील परिस्थिती लक्षात घेता देशातील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांसाठी सीमावरती भागात प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. यासंबंधी सुचना देखील जारी करण्यात आल्या आहेत.
pic.twitter.com/zU1oNMcLvM — India in Cambodia (@indembcam) July 26, 2025
२४ जुलै रोजी थायलंड आणि कंबोडियामध्ये हिंसाचाराला सुरुवात झाली. दोन्ही देशांनी एकमेकांवर अंदाधुंद गोळीबार सुरु केला. दरम्यान यामध्ये कंबोडियाने तोफखानांचा वापर, तसेच BM-21 रॉकेट्सचा हल्ला करण्यास देखील सुरुवात केली. थालंडने देखील प्रत्युत्तर हवाई हल्ले सुरु केले. यामुळे सध्या थायलंड आणि कंबोडियाच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हजारो लोकांना राहते घर सोडून जीव वाचवण्यासाठी पळावे लागले आहे.
बुधवारी दोन्ही देशांच्या सीमेजवळ झालेल्या भूसुरुंग स्फोटात पाच थाई सैनिकांचा मृत्यू झाला. यानंतर गुरुवारपासून दोन्ही देशात लष्करी संघर्षाची सुरुवात झाला. दोन्ही देश एका प्राचीन प्रेह विहार मंदिरावरुन वाद घालत आहे. हा वाद सध्या उफाळत चालला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.