4 Missing Indian-Origin people Found Dead After US Car Crash
America News Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेतून (America) एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय वंशाच्या चार सदस्यांचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्कच्या बफेलो येथून पश्चिम व्हर्जिनियाला निघाले होते. यानंतर चारही सदस्य अचानक बेपत्ता झाले.परंतु आता त्यांचे मृतदेह सपाडले आहेत. अमेरिकेच्या मार्शल काऊंटी शेरीफ माइक डौगर्टी यांनी या घटनेची माहिती दिली. या घटनेने संबंधित सदस्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
पोलिसांनी मृतांची ओळख पटवली असून यामध्ये सर्व सदस्य एकाच कुटुंबातील असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाण कुटुंबातील डॉ. किशोर, आशा, शैलेश आणि गीता चार वृद्ध व्यक्तींचा समावेश आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाण कुटुंबाची कार २ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता व्हर्जिनियातील मार्शल काऊंटी येथे बिग व्हीलिंग क्रीक रोडजवळ आढळली. मार्शल काऊंटी शेरीफ यांच्या कार्यलयाने यासंबंधी एक निवेदन जारी केले आहे.
या निवेदनात पीडीतांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त करण्यात आले आहे. तसेच या घटनेचा तपास सुरु करण्यात आले असल्याचे निवेदनात सांगण्यात आले आहे. न्यू यॉर्कच्या बफेलो येथून दिवाण कुटुंबातील हे २९ जुलै रोजी शेवटचे दिसले होते. त्यानंतर या सदस्यांचा कुटुंबाशी कोणताही संपर्क झाला नाही. पेन्सिलव्हेनियातील एका फास्ट-फूड रेस्टॉरंटमध्ये शेवटचे पाहिले गेले. शेवटचा क्रेडिट व्यवहार देखील येथेच झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर ते पश्चिम व्हर्जिनियाच्या दिशेने गेले.
रशियातील कामचटका प्रदेश हादरला; भूकंपानंतर आता ज्वालामुखीचा स्फोट, VIDEO
4 Indian-origin senior citizens who went missing during a road trip from #NewYork to West Virginia have been found dead in a car crash, #Marshall County Sheriff Mike Dougherty said. The victims have been identified as Dr Kishore Divan, Asha Divan, Shailesh Divan, & Gita Divan pic.twitter.com/Ty96cTD8VN
— TheSouthAsianTimes (@TheSATimes) August 3, 2025
कुटुंब मंदिरात दर्शनासाठी निघाले होते
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वंशाचे कुटुंब मंदिरात दर्शन घेण्यासाठी निघाले होते. पश्चिम व्हर्जिनियातील माउंड्सविलेतील प्रभुपादांच्या पॅलेस ऑफ गोल्डच्या आध्यात्मिक आश्रमात ते निघाले होते. दरम्यान बुधवारी (३० जुलै) पहाटे ३ वाजता माउंड्सविले आणि व्हीलिंगनंतर त्यांचे फोन आणि इंटरनेटसेवा बंद झाली. यानंतर ते बेपत्ता झाल्याचे पोलिसांनी सांगतिले. सध्या त्यांच्या अपघाताचे कारण अस्पष्ट आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर सर्व माहिती जाहीर केली जाईल असे पोलिसांनी म्हटले आहे. या घटनेने अमेरिकेतील भारतीय समुदायामध्ये खळबळ उडाली आहे.
Sukhi Chahal Death: अमेरिकेत खलिस्तानी विरोधक सुखी चहल यांचा गूढ मृत्यू ; प्रकरणाची सखोल चौकशी सुरु