रशियातील कामचटका प्रदेश हादरला; भूकंपानंतर आता ज्वालामुखीचा स्फोट, VIDEO (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Russia News marathi : मॉस्को : रशियामध्ये शक्तिशाली भूकंपानंतर (Earthquake) आता आणकी एक मोठे संकट उभे राहिले आहे. गेल्या आठवड्यात रशियाच्या कमचटका प्रदेशात ८.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूंकपाचे झटके जाणवले होते. आता या प्रदेशात ज्वालामुखीचा उद्रेक सुरु झाला आहे. यामुळे आपत्कालीन विभागाने रविवारी लोकांना सतर्कतेचा इशारा जारी केली आहे. पण यामुळे कामचटका प्रदेशातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
व्हिडिओ व्हायरल
सध्या याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये कामचटका प्रदेशातील क्रॅशेनिनिकोव्ह ज्वालामुखीतून राखेचे ढग बाहेर पडताना दिसत आहेत. स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशनच्या ग्लोबल कार्यक्रमानुसार यापूर्वी या ज्वालामुखीचा १५५० मध्ये उद्रेक झाला होता. आता ६०० वर्षानंतर पुन्हा या ज्वालामुखाचा उद्रेक होत आहे.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात झालेल्या भूंकंपामुळे हा उद्रेक होत असण्याची शक्यता आहे. या भूकंपामुळे गेल्या आठवड्यात रशिया, जपानसह अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये त्सुनामीचा फटका बसला होता. यामुळे सध्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रशियाच्या आपत्कालीन सेवा मंत्रालयेने, कामचटका द्वीपकल्पावरील स्फोटानंतर ऑरेंज अलर्ट जारी केला होता. विमानांना वाढत्या धोक्याचे संकेत देण्यात आले होते.
लोकांना न घाबारण्याचे आवाहन
रशियाच्या (Russia) सरकारी माझ्यामांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ज्वालामुखीतून निघणारे राखेचे ढग पूर्वेकडे प्रशांत महासागराच्या दिशेने जात आहे. या भागात कोणतीही लोकसंख्या नाही यामुळे सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. तसेच लोकांना घाबरुन न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आपत्कालीन सेवांच्या संपर्कात राहण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. परंतु गेल्या आठवड्यातील भूकंपानंतर शास्त्रज्ञांनी आफ्टरशॉकचा इशारा जारी केला आहे. लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आले आहे.
New video shows absolutely stunning footage of Krasheninnikov erupting after 600 years.
On August 2, 2025, it recorded its first-ever eruption, with ash soaring up to 5-6 km high. Scientists believe it may be linked to the recent M8.8 earthquake.
📍 Kamchatka, Russia. pic.twitter.com/1CKiSXbeRM
— Weather Monitor (@WeatherMonitors) August 3, 2025
FAQs ( संबंधित प्रश्न)
रशियामध्ये सतत भूकंप का होतात?
रशिया टेक्टोनिक प्लेस्टच्या कडांवर वसलेला आहे. तसेच याचा पूर्व पॅसिफिक भाग हा रिंग ऑफ फायरचा भाग आहे. यामुळे या प्रदेशात भूकंपाचे, ज्वालामुखीचे उद्रेक सतत होत असतात. यासाठी टोक्टोनिक क्रियाकलाप कारणीभूत ठरतात.
भूकंप का होतात?
पृथ्वीच्या आत खोलवर टेक्टोनिक प्लेट्स नावाच्या खडकांच्या १२ टेक्टोनिक प्लेट्स आहेत. या प्लेट्स सतत एकमेकांवर आदळत असतात, या सततच्या हालचालींमुळे ऊर्जेचा विस्फोट होतो, ज्यामुळे भूकंप घडतात.
Sukhi Chahal Death: अमेरिकेत खलिस्तानी विरोधक सुखी चहल यांचा गूढ मृत्यू ; प्रकरणाची सखोल चौकशी सुरु