Sukhi Chahal Death: अमेरिकेत खलिस्तानी विरोधक सुखी चहल यांचा गूढ मृत्यू ; प्रकरणाची सखोल चौकशी सुरु (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन : अमेरिकेत प्रसिद्ध उद्योगपती आणि खलिस्तानी विरोधी सुखी चहल याचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातमध्ये ते राहत होते. त्यांच्या संशयास्पद मृत्यूने सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यांनी अमेरिकेत भारत समर्थक विचारसणीची एक संस्था स्थापन केली होती. तसेच त्यांनी नेहमी खलिस्तान फटीरतावादाचा तीव्र विरोध केला आहे. त्यांच्या समर्थकांविरोधातही अनेक वेळा आवाज उठवला आहे. यामुळे त्यांना खलिस्तानी समर्थकांकडून अनेक धमक्या दिल्या जता होता.
तसेच सुखी चहलने खलिस्तानी समर्थक अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे म्हटले होते. तसेच भारतीय स्थलांतरितांना देखील कट्टपंथी खलिस्तानींच्या कारवायांपासून दूर राहण्याचा सल्ला सुखी चहल यांनी दिली होता. त्यांनी खलिस्तानी समर्थकांचे आणि खलिस्तानी चवळींना (Khalistani Movement) अनेक वेळा विरोध केला आहे.
पाकिस्तान डोनाल्ड ट्रम्पच्या पाठीत खुपसतोय खंजीर? बलुचिस्तानच्या नेत्याच्या दाव्याने उडाली खळबळ
नेमका कसा झाला मृत्यू?
कॅनलिफोर्नियाच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखी चहल यांचा मृत्यू गुरुवारी (३१ जुलै) झाला. त्यांचे जवळचे मित्र जसपास सिंग यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ते एका ओळखीच्या व्यक्तीच्या घरी जेवणास गेले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली आणि जागीच मृत्यू झाला. या घटनेच्या काहीदिवसांपूर्वीच्या त्यांना धमक्या दिल्या जात होत्या. १७ ऑगस्ट रोजी वॉशिंग्टनमध्ये खलिस्तानी जनमत चाचणी पार पडणार होची, याला चहल यांनी विरोध केला होता. अशा वेळी त्यांच्या मृत्यूने प्रकरण आणखी गूढ बनले आहे.
प्रकरणाची चौकशी सुरु
यापूर्वी सुखी चहल यांना खलिस्तानी समर्थकांकडून अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. त्यांच्या जवळच्या व्यक्तींना देखील सतत धमक्या दिल्या जात होता. सध्या त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला, त्यांची हत्या करण्यात आली का असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण आणि हेतू अद्याप अस्पष्ट आहे. यामुळे स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. सुखी चहल यांचे बॉडी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आली आहे. सध्या पोलिसांनी अद्याप त्यांच्या हत्येची पुष्टी केलेली नाही.
चहल यांनी भारतीय स्थलांतरितांना अनेक वेळा अमेरिकेच्या कायद्यांचे पालन करण्याचा सल्ला देते होते. त्यांनी यासंबंधी एक्सवर देखील पोस्ट केली होती. तसेच भारत आणि अमेरिकेतील संबंधांना चालना देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहे. त्यांनी भारत आणि अमेरिकेतील धोणात्मतक संबंधांना चालना देण्यासाठी आणि दोन्ही देशांमध्ये व्यापारासाटी नेत्यांसोबत काम कार्य केले आहे. सध्या त्यांच्या मृत्यूवर भारताने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
‘मी माझी कबर खोदत आहे’ , इस्रायली बंधकाचा हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल; जगाला टाकले हादरवून