Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Earthquake Update : पाकिस्तानला पहाटे 5.2 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का; उत्तरेकडील भाग हादरला, केंद्र अफगाण सीमेवर

Earthquake News : शुक्रवारी (दि. 21 नोव्हेंबर 2025) पहाटे पाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तर पाकिस्तानच्या काही भागात पहाटे 2:39 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. लोक घाबरून घराबाहेर पडले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 21, 2025 | 09:15 AM
5.2 magnitude earthquake jolts Pakistan in the morning Northern parts shaken

5.2 magnitude earthquake jolts Pakistan in the morning Northern parts shaken

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तानच्या उत्तर भागात पहाटे 5.2 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का, लोक भीतीने घराबाहेर.
  • भूकंपाचे केंद्र पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील डोंगराळ पट्टा; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.
  • देश भूकंपीयदृष्ट्या अतिसंवेदनशील; यावर्षी अनेक मध्यम तीव्रतेचे भूकंप आधीच नोंदले गेले.

Pakistan earthquake 5.2 Richter scale : पाकिस्तानला (Pakistan) शुक्रवारी पहाटे पुन्हा एकदा भूकंपाने(Earthquake) हादरवले. उत्तर पाकिस्तानमध्ये स्थानिक वेळेनुसार पहाटे २:३९ वाजता भूकंपाचे जोरदार धक्के जाणवल्यानंतर नागरिक घाबरून घराबाहेर पडले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ५.२ अशी नोंदवण्यात आली असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. देशातील अनेक उत्तरेकडील प्रांतांना या धक्क्यांचा फटका बसला.

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या (NCS) माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र पाकिस्तान–अफगाणिस्तान सीमेला लागून असलेल्या डोंगराळ आणि भूकंपीयदृष्ट्या सक्रिय प्रदेशात होते. भूकंपाची खोली सुमारे १३५ किलोमीटर इतकी होती, जी तुलनेने अधिक मानली जाते. तज्ज्ञांच्या मते, अशा खोल भूकंपांमध्ये ऊर्जा पृष्ठभागावर पोहोचण्याआधीच मोठ्या प्रमाणात शोषली जाते, त्यामुळे जमिनीवरील हादरे तुलनेने कमी तीव्र असतात. त्यामुळेच व्यापक नुकसान टळले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Defense Deal : फिलीपिन्सनंतर जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश विकत घेणार ‘BrahMos’; ‘या’ देशाचे संरक्षण मंत्री स्वतः करणार करार

पाकिस्तान सतत भूकंपाच्या विळख्यात का अडकतो?

पाकिस्तान हा जगातील सर्वात सक्रिय भूकंपीय पट्ट्यांपैकी एकावर बसलेला देश आहे. येथे भारतीय आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांना भिडतात, त्यामुळे या प्रदेशात लहान-मोठे भूकंप वारंवार होतात.

  • बलुचिस्तान
  • खैबर पख्तूनख्वा (KPK)
  • गिलगिट–बाल्टिस्तान

हे सर्व प्रांत प्लेट सीमेवर स्थित असल्याने येथे मध्यम ते प्रचंड तीव्रतेचे भूकंप सामान्य मानले जातात. पाकिस्तानच्या सिंध आणि पंजाबसारख्या प्रांतांमध्येही भूकंपाचा धोका कायम असतो, मात्र तिथे धक्के तुलनेने कमी जाणवतात.

EQ of M: 5.2, On: 21/11/2025 03:09:12 IST, Lat: 36.12 N, Long: 71.51 E, Depth: 135 Km, Location: Pakistan.
For more information Download the BhooKamp App https://t.co/5gCOtjdtw0 @DrJitendraSingh @OfficeOfDrJS @Ravi_MoES @Dr_Mishra1966 @ndmaindia pic.twitter.com/teLa9W1bfs
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) November 20, 2025

credit : social media

बलुचिस्तान : देशातील सर्वाधिक भूकंपप्रवण क्षेत्र

अरबी आणि युरेशियन प्लेट्सच्या सीमेवर असलेला बलुचिस्तान हा पाकिस्तानातील सर्वात भूकंपसंकटग्रस्त प्रदेश मानला जातो. येथे भूकंपाचे प्रमाण जास्त असून, यापूर्वी अनेक विनाशकारी भूकंपांनी या भागाला तडाखा दिला आहे. खैबर प्रदेश आणि गिलगिट-बाल्टिस्तानमध्येही भूकंपाचे चक्र अखंड सुरूच असते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Tariffs: ‘अमेरिका भारतावर लादणार होती 350% कर…’, अघटित घडण्यापासून थांबवले; Donald Trumpचा खुलासा

या वर्षी आधी झालेले भूकंप : सतत वाढत असलेली भूकंपीय हालचाल

पाकिस्तानमध्ये यंदा सलग भूकंपांची नोंद होत आहे.

  • २९ जून २०२५ रोजी मध्य पाकिस्तानमध्ये ५.५ तीव्रतेचा भूकंप नोंदला गेला.
  • १० मे २०२५ रोजी भूकंपाची ५.७ तीव्रता नोंदली गेली.
  • १२ एप्रिल २०२५ रोजी तिथे ५.० तीव्रतेचा भूकंप झाला होता.
  • मार्च आणि जून महिन्यात कराचीसारख्या दक्षिणेकडील महत्त्वाच्या शहरातही अनेक सौम्य किंवा मध्यम धक्के जाणवले.

या सलग भूकंपांच्या मालिकेमुळे पाकिस्तानमधील भूकंप तयारी प्रणाली, इमारतींची सुरक्षितता आणि आपत्कालीन व्यवस्थापन याबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तज्ज्ञांचा इशारा आहे की भविष्यात मोठ्या भूकंपाची शक्यता नाकारता येत नाही.

जनतेत भीतीचे वातावरण : पण सुदैवाने नुकसान नाही

भूकंपाच्या वेळेस अनेक लोक झोपेतून घाबरून बाहेर पडले. उत्तरेकडील शहरांमध्ये काही काळ संभ्रमाचे वातावरण होते. मात्र, अधिकाऱ्यांनी तातडीने परिस्थितीवर नियंत्रण मिळवत नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले. प्राथमिक तपासणीत कोठेही मोठे नुकसान किंवा जीवितहानी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आज पाकिस्तानमध्ये भूकंपाची तीव्रता किती होती?

    Ans: तीव्रता 5.2 रिश्टर स्केल.

  • Que: भूकंपाचे केंद्र कुठे होते?

    Ans: पाकिस्तान–अफगाणिस्तान सीमेजवळील डोंगराळ भाग.

  • Que: नुकसान किंवा जीवितहानी झाली का?

    Ans: नाही, कोणतेही नुकसान नोंदले गेले नाही.

Web Title: 52 magnitude earthquake jolts pakistan in the morning northern parts shaken

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 09:15 AM

Topics:  

  • Earthquake
  • pakistan
  • Pakistan News

संबंधित बातम्या

SindhIsland : पाकचा मोठा तेल जुगार; पीठ आणि तांदळावर अवलंबून असलेला देश ट्रम्पचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बांधणार कृत्रिम बेट
1

SindhIsland : पाकचा मोठा तेल जुगार; पीठ आणि तांदळावर अवलंबून असलेला देश ट्रम्पचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बांधणार कृत्रिम बेट

Terror Links : ‘ड्रग्ज, तस्करी, दहशतवाद…’भारताविरुद्ध अतांकिस्तानचा धोकादायक कट; बांगलादेशी पंतप्रधान युनूसला बनवले ‘मोहरा’
2

Terror Links : ‘ड्रग्ज, तस्करी, दहशतवाद…’भारताविरुद्ध अतांकिस्तानचा धोकादायक कट; बांगलादेशी पंतप्रधान युनूसला बनवले ‘मोहरा’

पाकिस्तानचे दरवाजे बंद होताच तालिबानची भारताकडे धाव; उद्योग मंत्री अजीजी दिल्लीमध्ये
3

पाकिस्तानचे दरवाजे बंद होताच तालिबानची भारताकडे धाव; उद्योग मंत्री अजीजी दिल्लीमध्ये

पाकिस्तानची क्रूरता! पोलिसांनी माजी पंतप्रधान इम्रान खानच्या बहिणींना फरपटत नेले अन्… ; जाणून घ्या नेमकं काय घडलं?
4

पाकिस्तानची क्रूरता! पोलिसांनी माजी पंतप्रधान इम्रान खानच्या बहिणींना फरपटत नेले अन्… ; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.