पीठ आणि तांदळावर अवलंबून असलेला पाकिस्तान... ट्रम्पचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बांधणार कृत्रिम बेट ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Pakistan Building Artificial Island for Oil Exploration : पाकिस्तानची(Pakistan) डळमळीत अर्थव्यवस्था, वाढती महागाई आणि अन्नटंचाई यामुळे देश सतत संकटात असल्याचे चित्र जगासमोर आहे. पीठ-तांदळाच्या आयातीवर पूर्णपणे अवलंबून असलेल्या पाकिस्तानला आता आर्थिक पुनरुज्जीवनाची एकमेव आशा ‘तेल शोध’(Oil Exploration) वाटू लागली आहे. या आशेवर स्वार होऊन पाकिस्तानने सिंधच्या किनाऱ्यावर कृत्रिम बेट बांधण्याचा मोठा प्रकल्प सुरू केला आहे. या बेटावरून ऑफशोअर ड्रिलिंग करून समुद्रातील संभाव्य तेलसाठे शोधण्याची तयारी सुरू आहे.
पाकिस्तानच्या तेलसाठ्यांबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रस दाखवल्यानंतर इथल्या सरकारने आणि तेल कंपन्यांनी प्रकल्पाला अचानक गती दिली आहे. पाकिस्तानी माध्यमांच्या म्हणण्यानुसार, अलीकडील भौगोलिक अभ्यासांत सिंध किनाऱ्यावरील ऑफशोअर बेसिनमध्ये मोठ्या प्रमाणात हायड्रोकार्बन साठ्यांची शक्यता दिसून आली आहे. हीच शक्यता पाकिस्तानसाठी ‘आर्थिक जीवनदान’ म्हणून दाखवली जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PakExposed : ‘लाल किल्ल्यापासून काश्मीरपर्यंत…’; माजी PoK पंतप्रधानांच्या VIDEOने उघडल्या पाकिस्तानच्या कटकारस्थानाच्या खिडक्या
पाकिस्तान पेट्रोलियम लिमिटेड (PPL) हा प्रकल्प पुढे नेत आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, हे कृत्रिम बेट समुद्रसपाटीपासून अंदाजे सहा फूट उंचीवर तयार केले जात आहे, जेणेकरून उंच भरती आणि समुद्री लाटा शोध प्रक्रियेत अडथळा आणू शकणार नाहीत. हे बेट सिंधच्या किनाऱ्यापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असेल, जेथे खोदकाम करणे सुरक्षित आणि तांत्रिकदृष्ट्या अधिक सोयीचे असेल. पीपीएलचे महाव्यवस्थापक अर्शद पालेकर यांनी सांगितले की, हा प्रकल्प पूर्णपणे अबू धाबीच्या कृत्रिम बेट मॉडेलपासून प्रेरित आहे, ज्या मॉडेलने तेलशोधात उत्कृष्ट यश मिळवले आहे. पाकिस्तानमध्ये या प्रकारचे तंत्रज्ञान प्रथमच लागू होत आहे, त्यामुळे हे पाऊल देशासाठी ऐतिहासिक मानले जात आहे.
इस्लामाबादमध्ये झालेल्या तेल-वायू परिषदेत पालेकर यांनी माहिती दिली की, बेटाचे बांधकाम वेगाने चालू असून फेब्रुवारीपर्यंत ते पूर्ण होईल. त्यानंतर तात्काळ ड्रिलिंगचा पहिला टप्पा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या ड्रिलिंगमधून मिळणाऱ्या माहितीवर पाकिस्तानचे आर्थिक भविष्य अवलंबून असेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Terror Links : ‘ड्रग्ज, तस्करी, दहशतवाद…’भारताविरुद्ध अतांकिस्तानचा धोकादायक कट; बांगलादेशी पंतप्रधान युनूसला बनवले ‘मोहरा’
पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या विदेशी कर्ज, अन्नटंचाई, महागाई आणि बेरोजगारीच्या फेऱ्यात अडकली आहे. अन्नधान्य आयातीवर अवलंबून राहिल्याने सामान्य जनतेवरचा भार अधिक वाढत आहे. अशा परिस्थितीत ‘तेलाचा शोध’ म्हणजे पाकिस्तानसाठी एक मोठी शक्यता — ज्यातून देशाला आर्थिक स्थैर्य, विदेशी गुंतवणूक आणि ऊर्जा स्वयंपूर्णतेची संधी मिळू शकते. मात्र, अनेक तज्ज्ञांचे मत आहे की तेलसाठे सापडले तरच हा प्रयत्न फलीभूत ठरेल; अन्यथा हा प्रकल्प पाकिस्तानसाठी आणखी आर्थिक ओझे ठरू शकतो.
Ans: तेलसाठे शोधण्यासाठी सुरक्षित ऑफशोअर ड्रिलिंग करण्यासाठी.
Ans: फेब्रुवारीपर्यंत बांधकाम पूर्ण होणार आहे.
Ans: ट्रम्प यांनी संभाव्य तेलसाठ्यांबद्दल रस व्यक्त केल्यानंतर.






