अमेरिकेतील हवाई येथील माउईच्या जंगलात भीषण आग (America Fire In Forest)लागली आहे. आग किती भीषण आहे, याचा अंदाज यावरून लावता येतो की, लाहैना शहरात आतापर्यंत किमान ५३ जणांचा जीव गमवावा लागला असून, लोकांना बाहेर काढले जात असताना सुद्धा होरपळून अनेकांचा मृत्यू झाला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान सातत्याने प्रयत्न करत आहेत.
पुल्हे आणि उपकंट्रीमध्ये नुकत्याच आगीच्या घटना घडल्या आहेत. लोकांना जीव वाचवण्यासाठी समुद्रात उडी मारावी लागत आहे. इतकंच नाही तर बेटावरील ऐतिहासिक शहरांचा मोठा भाग आगीमुळे नष्ट झाला आहे. जंगलातील आगीमुळे लाहैना शहरातील पर्यटन स्थळांचे मोठे नुकसान झाले आहे. अमेरिकेच्या हवामान खात्याच्या माहितीनुसार, चक्रीवादळ डोरा देखील हवाईमधील या जंगलातील आगीच्या जलद उद्रेकास कारणीभूत आहे, ज्याच्या जोरदार वाऱ्यामुळे आग खूप वेगाने पसरली आहे.
आगीवर नियंत्रण मिळवून वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लहेना येथे लागलेली आग इतकी भीषण आहे की लोकांना वाचवणे कठीण झाले आहे.आणखी 17 जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 53 वर पोहोचला आहे.
जंंगलात मोठ्या प्रमाणावर आग पसरल्याने बचावकार्य करण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना मोठा अडचणींना सोमोरं जाव लागत आहे. स्थानिक वेळेनुसार बुधवारी माउई बेटावरून 14 हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ज्या लोकांना वाचवण्यात आले आहे त्यांना हवाईमधील इतर ठिकाणी पाठवण्यात आले आहे. तर ज्यांचे उपचार झालेत त्यांना रुग्णालायतून डिस्चार्ज देण्यात आलं आहे.
शहरातील जंगलातील 80 टक्के आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. त्याच वेळी, संपूर्ण लहेनामध्ये वीज नाही. एवढेच नाही तर माऊमध्ये सुमारे 11 हजार लोक वीजविना जगत आहेत. तथापि, लहेना येथे प्रवेश प्रतिबंधित आहे. पुलेहूची आगही जवळपास ७० टक्के आटोक्यात आली आहे.