6.2 magnitude earthquake in Alaska, USA; Tajikistan also shook
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या अलास्कामध्ये भूकंपाचे जोरदार झटके जाणवले आहेत. या भूकंपानंतर नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने त्सुनामीचा इशाराही जारी केला आहे. सोमवारी (२१ जुलै) पहाटे ६.२ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे झटके जाणवले. या भूकंपाचे केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ४८ किलोमीटर खोल होते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, इतक्या कमी खोलीवर भूकंप झाल्याने आफ्टरशॉकचा झटका बसण्याची शक्यता आहे.
EQ of M: 6.2, On: 21/07/2025 03:58:02 IST, Lat: 54.99 N, Long: 159.98 W, Depth: 48 Km, Location: Alaska Peninsula.
For more information Download the BhooKamp App https://t.co/5gCOtjdtw0 @DrJitendraSingh @OfficeOfDrJS @Ravi_MoES @Dr_Mishra1966 @ndmaindia pic.twitter.com/t6cCnC8XH1— National Center for Seismology (@NCS_Earthquake) July 20, 2025
याच वेळी ताजिकिस्तानमध्येही ४.६ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद करण्यात आली. सोमवारी (२१ जुलै) पहाटे १.०१ वाजता भारतीय वेळेनुसार ताजिकिस्तानती जमीन हादरली. नॅशनल सेंटर फऑर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता ४.१ रिश्टर स्केल इतकी होती. दरम्यान या दोन्ही घटनांमध्ये कोणत्याही जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही.
EQ of M: 4.6, On: 21/07/2025 04:43:29 IST, Lat: 37.39 N, Long: 72.58 E, Depth: 23 Km, Location: Tajikistan.
For more information Download the BhooKamp App https://t.co/5gCOtjcVGs @DrJitendraSingh @OfficeOfDrJS @Ravi_MoES @Dr_Mishra1966 @ndmaindia pic.twitter.com/WWwmZUh7TK— National Center for Seismology (@NCS_Earthquake) July 20, 2025
नॅशनल सेंटर फऑर सिस्मोलॉजीने (NCS) ने दिलेल्या आकडेवारीनुसार, ताजिकिस्तानच्या भूकंपाचे केंद्र ३६.८७ अंश उत्तर अक्षांश आणि ७२.१० अंश पूर्व रेखांशावर होते. सुमारे १६० किलोमीटर खोलीवर या भूकंपाचे केंद्रबिंदू होती. यामुळे हा मध्यम तीव्रतेचा भूकंप मानला जात आहे.
यामुळे याचा पृथ्वीच्या पृष्ठभागावर कमी परिणाम झाला, तसेच कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु नॅशनल सेंटर फऑर सिस्मोलॉजीने लोकांना सतर्क राहण्याचे आवहान केले आहे. स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. लोकांना घाबरुन न जाता सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जमिनीखाली असलेल्या टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांवर आदळतात. यामुळे, पृथ्वीच्या खाली कंपन निर्माण होतात आणि भूकंपाचे धक्के जाणवतात. याशिवाय, अण्वस्त्रांच्या चाचण्यांमुळे देखील भूकंप होण्याची शक्यता असते. परंतु हे फारसे हानिकारक नसतात.