रशियाचा घातक खेळ सुरु! युक्रेनवर वाढणार विध्वंसक ड्रोन हल्ले; जर्मनच्या अधिकाऱ्याचा दिली मोठी माहिती (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Russia Ukraine war news marathi : जेरुसेलम : गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. सध्या रशिया आणि युक्रेन युद्धाने रौद्र रुप धारण केले आहे. रशियाचे युक्रेनवर तीव्र हल्ले सुरु असून आता हे युद्ध धोकादायक टप्प्यावरजवळ येत असल्याची माहिती समोर आली आहे. रशिया युक्रेनवर आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची तयारी करत असल्याचे म्हटले जात आहे. जर्मनीच्या बुंडसवेहरचेमेजर जनरल यांनी ही माहिती दिली आहे.
तसेच युक्रेनच्या समन्वय केंद्राचे प्रमुख क्रिश्चियन फ्रायडिंग यांनी देखील याची पुष्टी केली आहे. दोन्ही अधिकाऱ्यांनी सांगितले की, रशिया युक्रेनवर ड्रोन हल्ल्याची तयारी करत असून एकाच वेळी २ हजार ड्रोन्सचा मार करण्याची शक्यता आहे. हा आतापर्यंतचा रशियाचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला असेल. हा हल्ला युक्रेनच्या संरक्षणासाठी मोठे आव्हान ठरु शकतो.
मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने आपल्या ड्रोन उप्तादनात वाढ केली आहे. फ्रायडिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशिया जवळपास २० लाख FPV ड्रोन्सची निर्मिती करत आहे. या ड्रोनमध्ये लांब अंतरापर्यंत अचूक हल्ला करण्याची श्रमता आहे. यामध्ये सर्वात जास्त कामिकाझी ड्रोनही मोठ्या प्रमाणावर तयार केले जात आहेत.
फ्रायडिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाने जून महिन्यात ५ हजार ३३७ शाहीद ड्रोन युक्रेनवर डागले होते. हे ड्रोन इतके ताकदवर होते की या ड्रोन्सने पॅट्रियट एअर डिफेन्स सिस्टमलाही नष्ट करण्याची क्षमता ठेवतात.
German Major General Christian Freuding, head of the Bundeswehr’s Ukraine Situation Center, stated on the Nachgefragt podcast that Moscow aims to reach the capability of launching 2,000 drones simultaneously against Ukraine. He emphasized that it’s not cost-effective to… pic.twitter.com/XRs8VvdGxC — NSTRIKE (@NSTRIKE1231) July 20, 2025
सध्या रशियाच्या वाढत्या आक्रमाणाला रोखण्यासाठी युक्रेनने देखील प्रत्युत्तरात्मक कारवाईची तयारी सुरु केली आहे. फ्रायडिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनने लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर सुरु केला आहे. यांचा मारा रशियाच्या ड्रोन उत्पादन केंद्रांवर केला जात आहेत. रशियाच्या वेगवेगळ्या भागातील लष्करी उत्पादन केंद्रे, शस्त्र कारखाने आणि ड्रोन असेंब्ली युनिट्सला विशेष करुन लक्ष्य केले जात आहे. परंतु युक्रेनला अधिक ताकदवान आणि लांब पल्ल्याच्या शस्त्रास्त्रांची गरज आहे. यासाठी पश्चिमी देशांकडे युक्रेनने मागणी केली आहे.
दरम्यान जर्मनी आणि अमेरिकेने युक्रेनला मदत केली आहे. जुलै अखेरपर्यंत जर्मनीकडून शेकडो लांब पल्ल्याची देशांतर्गत उत्पादित शस्त्रे युक्रेनला पाठवण्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनान्ड ट्रम्प यांनी देखील युक्रेनला नाटोच्या माध्यमातून शस्त्रे पुरवण्याचे म्हटले आहे.
सध्या परिस्थिती पाहता, संपूर्ण युरोपीय देशांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी गंभीर धोका निर्माण झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.