इंडोनेशियात मोठी दुर्घटना; भर समुद्रात प्रवाशांनी भरलेल्या जहाजाला भीषण आग, पाहा VIDEO
इंडोनेशियामधील उत्तर सुलावेसीजवळ मोठी समुद्री दुर्घटना घडली आहे. “केएम बार्सिलोना वीए” नावाच्या प्रवासी जहाजाला भीषण आग लागली आणि घाबरलेल्या प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी थेट समुद्रात उड्या मारल्या. ही घटना तालिस बेटाजवळ घडली असून या जहाजातून २८० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते.
दुर्घटना की अपघात? इराणच्या सर्वात मोठ्या रिफायनरी कारखान्याला भीषण आग; देशभरात घबराट
घटनेनंतर समोर आलेल्या व्हिडीओ फुटेजमध्ये प्रवाशांची जीवरक्षक जैकेट घालून, तसेच काहींनी जैकेटशिवायही समुद्रात उड्या मारताना दृश्यं कैद झाली आहेत. या जीवघेण्या क्षणांचे व्हिडीओ काही प्रवाशांनी स्वतः मोबाईलमध्ये चित्रीत केले असून, ते आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. एका महिलेनं चित्रीत केलेल्या व्हिडीओमध्ये ती आग लागलेल्या जहाजापासून केवळ १० ते १५ मीटर अंतरावर पोहत असल्याचं दिसत आहे.
#BREAKING
Passengers jump overboard as massive fire engulfs ferry in Indonesia Terrifying scenes from Indonesia after a fire broke out on the KM Barcelona VA passenger ship near Talise Island, North Sulawesi Over 280 people onboard, panic-stricken passengers some with children… pic.twitter.com/wwKOHlAz6z — Nabila Jamal (@nabilajamal_) July 20, 2025
घटनेनंतर इंडोनेशियाच्या राष्ट्रीय शोध आणि बचाव यंत्रणांनी तातडीने बचावकार्यास सुरुवात केली. आग लागल्यानंतर संपूर्ण जहाज धुराने व्यापून गेलं आणि आगीच्या ज्वाळांनी वेढलं होतं. यामुळे जहाजावर उपस्थित अनेक लहान मुलांसह सर्व प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली. या दुर्घटनेदरम्यान, जवळून जाणाऱ्या स्थानिक मच्छीमार नौकांनी अत्यंत धाडसाने काही प्रवाशांना समुद्रातून बाहेर काढलं आणि त्यांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर पोहोचवलं. या मदतीमुळे अनेकांचे प्राण वाचले.
भूकंपामुळे हादरली रशियाची जमीन; त्सुनामीचा इशाऱ्याने लोकांमध्ये घबराट, जाणून घ्या काय आहे परिस्थिती?
सध्या आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. अद्याप कोणत्याही जीवितहानीची अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र अशा प्रकारच्या समुद्री प्रवासांमधील सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बचावकार्य अद्याप सुरू असून स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक सर्व प्रवाशांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.