70-year-old woman arrested in charge of Plan to attack Netanyahu with an ID bomb
जेरुसेलम : एक मोठी माहिती समोर आली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या हत्येचा कट रचल्याच्या संशयावरुन एका ७० वर्षाय महिलेला अटक करण्यात आली आहे. इस्रायलच्या सुरक्षा एजन्सी शिन बेटनेने ही कारवाई केली आहे. या महिलेवर ID स्फोटाद्वारे नेतन्याहूंवर हल्ला करण्याची योजना आखल्याचा आरोप करण्यात आला आहे.
गुरुवारी २३ जुलै रोजी या महिलेवर नेतन्याहूंच्या हत्येचा कट रचणे आणि दहशतवादी कृत्याचे आरोपत्र दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन आठवड्यांपूर्वी या महिलेला अटक करण्यात आली होती. मात्र त्यानंतर तिला काही अटींवर सोडण्यात आली. यामध्ये तिला सरकारी संस्थांमध्ये आणि पंतप्रधानांच्या कार्यलयात किंवा आसपासच्या परिसरात प्रवेश बंदी घालण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला सरकारी निदर्शक म्हटले जाते. यामुळे तिची माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे. या महिलेने खतरनाक शस्त्रे गोळा केली, तसेच पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. सध्या इस्रायलच्या न्यायालयाने या महिलेची ओळख गुप्त ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाईसाठी आवश्यक कागपत्रे राज्य वकील कार्यलय आणि सरकारी वकिलांकडे सादर करण्यात आली आहेत.
इस्रायलच्या पंतप्रधान नेतन्याहूंवर हल्ल्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील त्यांच्या राहत्या घरावर हल्ला करण्यात आला होता. गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२४ मध्ये ही घटना घडली होती. तसेच हिजबुल्लाह संघटनेने देखील नेतन्यांहून मारण्याचा प्रयत्न केल्याचे अनेक दावे करण्यात आहे आहेत. नेतन्याहूंच्या घराजवळ एका इमारतीवर ड्रोन हल्ला झाला होता. यावेळी नेतन्याहू आणि त्यांचे कुटुंबीय घरी नसल्याने बचावले होते.
सध्या इस्रायलचे पंतप्रधान पुन्हा एकदा चिंतेत आले आहे. तुर्की आणि इराण इस्रायलविरोधी मुस्लिम देशांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. इस्रायलच्या गाझातील, सीरियातील कारवायांना आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र विरोध केला जात आहे. यापूर्वी नेतन्याहूंविरोधात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने अटक वॉरंट देखील जारी केले होते. नेतन्याहूंवर गाझातील मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र इस्रायलने या आरोपांना फेटाळले होते. सध्या यावर कोणताही कारवाई करण्यात आलेली नाही.
भारत-चीन संबंधामध्ये सकारात्मक पाऊल; करोनानंतर पहिल्यांदाच चीनी नागरिकांसाठी व्हिसा मंजूर