Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

गाझातील इस्रायल आणि हमास युद्धाने प्रचंड विनाश केला आहे. लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिक गंभीर आजाराने त्रस्त आहेत. यामध्ये विशेष करुन अल्पवयीन आणि लहान मुलांचा समावेश आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 19, 2025 | 11:23 PM
Acute Flaccid Paralysis is spreading rapidly in Gaza due to Israel

Acute Flaccid Paralysis is spreading rapidly in Gaza due to Israel

Follow Us
Close
Follow Us:

Gaza News marathi : गाझा पट्टी : इस्रायल आणि हमास युद्धाने (Israel Hamas War) सध्या गाझातील परिस्थिती अत्यंत बिकट केली आहे. येथील लोकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अन्न-पाणी, निवारा, वैद्यकीय सुविधा यांसारख्या लोकांना पायाभूत सुविधा मिळणेही कठीण झाले आहे. लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. परिस्थिती अत्यंत भयावह होत चालली आहे. यामुळे अनेक आजारा गाझामध्ये वेगाने पसरत आहे.

गाझाचे (Gaza) सर्वात भयानक वास्तव म्हणजे येथे उपासमारीमुळे, कुपोषमामुळे लहाना मुलांचा बळी जात आहे. लोकांना अर्धांगवायूसारखे गंभीर आजार होत आहे. सतत उपाशी राहण्यामुळे आणि पोषक अन्न न मिळाल्यामुळे लोकांमध्ये आवश्यक जीवनसत्वे कमी पडत आहे. याचा मोठा परिणाम गाझातील मुलांवर होत आहे.

Ajit Doval Wang Yi Meeting: चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर NSA अजित डोवाल यांची चर्चा, चर्चेत नेमके काय ठरले?

या गंभीर आजाराने त्रस्त आहे गाझा

गाझातील आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, आता गाझामध्ये आणखी एक नवीन आजार पसरत आहे. गेल्या काही दिवसांपासून एक्यूट फ्लैसिड पॅरालिसिस (Acute Flaccid Paralysis) ची अनेक प्रकरणे नोंदवली आहेत. या दुर्मिळ आजारामुळे शरीराचे स्नायू कमकुवत होतात.

लोकांना श्वास घ्यायला, अन्न गिळायला त्रास होतो. सध्या गाझातील लोक या आजाराने त्रस्त आहेत. गाझातील आरोग्य तज्ज्ञांनी या संसर्गजन्य आजारासाठी इस्रायलला जबाबदार धरले आहे. इस्रायलच्या हल्ल्यामुळे, बॉम्बस्फोटामुळे गाझातील सांडपाणी आणि स्वच्छतेवर परिणाम झाला आहे. यामुळे हा आजार पसरत असल्याचे म्हटले आहे.

२ वर्षात इतकी प्रकरणे नोंदवली

पॉलिटिकोने दिलेल्या अहवालानुसार, २०२३ मध्ये युद्ध सुरु झाल्यापासून दरवर्षी १२ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर गेल्या तीन महिन्यात १०० नवी प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या आजारावर डॉक्टरांना इलाजही सापडलेला नाही. आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आजार सांडपाणी आणि घाणीतून पसरत आहे.

गाझातील खान युनूस भागात रस्त्यांवर घाणेरडे आणि सांडपाणी साचले आहे. येत्या काही काळात या आजारामुळे रुग्णांचा संख्या वाढण्याची शक्यता आहे. तसेच गुलियन बार सिंड्रोमही वेगाने पसरत आहेत.

जागितक आरोग्य संघटनाने दिलेल्या अहवालानुसार, याचा सर्वात जास्त परिणाम १५ वर्षाखालील मुलांवर होत आहे. आतापर्यंत मुलांमध्ये ३२ प्रकरणे नोदंली गेली आहेत. कुपोषण आणि घाण यामुळे गाझातील लोकांचे जीवन अत्यंत बिकट झाले आहे. इस्रायलच्या हल्ल्यामुळे गाझामध्ये आरोग्य सेवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. WHO ने दिलेल्या माहितीनुसार, पोलिओच्या आजारातही ७०% वाढ झाली आहे. गुलियन बार सिंड्रोमची २२ प्रकरणे समोर आली आहेत.

अपुऱ्या आरोग्य सुविधा?

गाझातील आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, Acute Flaccid Paralysis, पोलिओ, गुलियन बार सिंड्रोम यांसारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी ओषधेही उपलब्ध नाहीत. मानवी मदतही पोहोचणे अत्यंत कठीण झाले आहे.

हमासने टेकले गुडघे? युद्धबंदी आणि ओलिसांना सोडण्याची इस्रायलची अट केली मान्य; पण…

Web Title: Acute flaccid paralysis is spreading rapidly in gaza due to israel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2025 | 11:23 PM

Topics:  

  • Gaza
  • Israel Hamas War
  • World news

संबंधित बातम्या

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
1

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी
2

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा
3

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
4

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.