Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Transcript : ‘Trumpना प्रशंसा आवडते, म्हणून जेव्हा Putin फोन करतात…’ लीक फोन कॉलमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणातील गुपिते उघड

डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे परराष्ट्र धोरण सल्लागार युरी उशाकोव्ह यांच्यातील संभाषण लीक झाले आहे, ज्यामुळे आता एकच गोंधळ उडाला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 27, 2025 | 01:42 PM
A leaked call between Trump’s envoy and Putin’s aide has caused a buzz

A leaked call between Trump’s envoy and Putin’s aide has caused a buzz

Follow Us
Close
Follow Us:
  1. ट्रम्प यांचे विशेष दूत आणि पुतिन यांचे प्रमुख सल्लागार यांच्यातील लीक फोन कॉलमुळे ट्रम्पला खुशामत आवडते हे उघड झाले.
  2. विटकॉफ यांनी सुचवले की पुतिन यांनी ट्रम्पची उघडपणे स्तुती करावी आणि गाझा युद्धबंदीचे कौतुक करावे.
  3. ब्लूमबर्गने प्रकाशित केलेल्या ट्रान्सक्रिप्टनंतर जागतिक राजकारणात वादंग; रशियाने हे युक्रेन शांतता चर्चेला धक्का देण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले.
leaked Trump-Russia call : आंतरराष्ट्रीय राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजवणारा मुद्दा समोर आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump), त्यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांचे परराष्ट्र धोरण सल्लागार युरी उशाकोव्ह यांच्यातील फोन संभाषण लीक झाल्यामुळे अनेक गुपितांचे दार उघडले आहे. विशेषतः, ट्रम्प यांना उघडउघड प्रशंसा ऐकायला आवडते आणि त्याद्वारे अनेक राजनैतिक निर्णयांवर प्रभाव टाकता येतो, हे या संभाषणातून स्पष्ट झाले आहे.

२६ नोव्हेंबर २०२५ रोजी ब्लूमबर्गने हा ट्रान्सक्रिप्ट प्रसिद्ध करताच जागतिक माध्यमांनी त्याची दखल घेतली. हा कॉल १४ ऑक्टोबर २०२५ रोजी व्हॉट्सॲपवरून झाला असून त्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग देखील मिळाले आहे. या संभाषणादरम्यान विटकॉफ यांनी उशाकोव्हला स्पष्टपणे सांगितले की “ट्रम्पसोबत कोणतेही मोठे काम साध्य करायचे असेल तर त्यांची स्तुती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.” त्यांच्यानुसार, ट्रम्प यांच्याशी बोलताना पुतिन यांनी त्यांना “गाझा शांतता नायक”, “जागतिक स्थैर्याचा नेता” असे संबोधले पाहिजे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Guinea-Bissau : आता ‘या’ देशातही निवडणुकीनंतर अवघ्या तीनच दिवसात झाले सत्तापालट; सीमा केल्या बंद अन् राष्ट्रपती बेपत्ता

ट्रान्सक्रिप्टनुसार, युरी उशाकोव्ह यांनी विटकॉफला विचारले की पुतिन आणि ट्रम्प यांच्यात थेट टेलिफोनिक चर्चा घडवून आणता येईल का. त्यावर विटकॉफ यांनी सकारात्मक उत्तर देत “माझा माणूस तयार आहे” असे सांगितले. त्यांनी पुतिनने गाझा युद्धबंदीबद्दल ट्रम्प यांचे अभिनंदन करावे आणि रशिया देखील त्या निर्णयाला पाठिंबा देत असल्याचे सांगावे, अशी विशेष सूचना दिली.

A private call between Trump-appointed envoy Steve Witkoff and Putin advisor Yuri Ushakov was just leaked — and it shows the American envoy effectively acting as a strategist for Moscow. pic.twitter.com/HBiYoNCJ0h — Tim Mak (@timkmak) November 25, 2025

credit : social media

याव्यतिरिक्त, विटकॉफ यांनी संभाषणादरम्यान युक्रेन युद्धाबाबतही एक महत्त्वाची कल्पना मांडली. ते म्हणतात, “कदाचित आपण गाझासाठी जसा प्रस्ताव मांडला, तसाच २० कलमी शांतता प्रस्ताव युक्रेनसाठीही मांडू शकतो.” हे वक्तव्य जगाच्या नजरेत विशेषत्वाने ठळक ठरले आहे. या लीक कॉलनंतर फक्त दोन दिवसांनी १६ ऑक्टोबरला ट्रम्प आणि पुतिन यांची प्रत्यक्ष बैठक पार पडली होती. लीक झालेल्या ट्रान्सक्रिप्टबाबत विचारले असता ट्रम्प यांनी कोणताही विरोध दर्शवला नाही. त्यांनी हे “राजनैतिक चर्चा करण्याची सामान्य प्रक्रिया” असल्याचे सांगितले. रशियाने मात्र तीव्र प्रतिक्रिया देत म्हटले की “ही लीक युक्रेन शांतता चर्चेला कमकुवत करण्याचा प्रयत्न” आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Rare Minerals : काचिन प्रदेश नव्या भू-राजकीय रणभूमीत; म्यानमार पर्वतांमध्ये दडलेल्या दुर्मिळ खजिन्यावरून ‘या’ 3 महासत्ता आमनेसामने

या प्रकरणामुळे जगातील दोन सर्वात प्रभावशाली नेत्यांच्या पाठीमागे कोणत्या प्रकारचे संवाद चालतात, कशाप्रकारे आंतरराष्ट्रीय धोरणे तयार केली जातात, आणि वैयक्तिक ‘खुशामत’ देखील किती महत्त्वाची भूमिका बजावते, याचा पुन्हा एकदा उलगडा झाला आहे. या कॉलची वेळ, त्यातील संदेश आणि त्यानंतर लगेच झालेली बैठक या सर्वांमुळे या प्रकरणाचे महत्व अधिकच वाढले आहे. या लीकमुळे जागतिक चर्चेला नववे वळण मिळाले असून पुढील काही दिवसांत या विषयावर आणखी माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प–पुतिन लीक कॉल कधी झाला?

    Ans: १४ ऑक्टोबर २०२५ रोजी हा व्हॉट्सॲप कॉल झाला असल्याचे ब्लूमबर्गने सांगितले.

  • Que: लीक कॉलमध्ये महत्त्वाचे काय उघड झाले?

    Ans: ट्रम्पला उघडपणे स्तुती ऐकायला आवडते आणि त्याद्वारे राजनैतिक निर्णयांना दिशा दिली जाऊ शकते, हे समोर आले.

  • Que: रशियाने लीकबाबत काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: रशियाने हे युक्रेन शांतता प्रक्रियेला कमकुवत करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले.

Web Title: A leaked call between trumps envoy and putins aide has caused a buzz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 01:42 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Vladimir Putin

संबंधित बातम्या

White House shooting: ‘चुकीला माफी नाही…’ व्हाईट हाऊसजवळील हल्ल्यांनंतर ट्रम्पचा चढला पारा; म्हटले, सर्व बायडेनची चूक
1

White House shooting: ‘चुकीला माफी नाही…’ व्हाईट हाऊसजवळील हल्ल्यांनंतर ट्रम्पचा चढला पारा; म्हटले, सर्व बायडेनची चूक

Russia Ukraine War : अखेर युक्रेन युद्ध थांबणार? पण रशियाला मात्र झाला मोठा फायदा; ट्रम्पचा ‘Peace Plan’ ठरली एक विक्राळ फसवणूक
2

Russia Ukraine War : अखेर युक्रेन युद्ध थांबणार? पण रशियाला मात्र झाला मोठा फायदा; ट्रम्पचा ‘Peace Plan’ ठरली एक विक्राळ फसवणूक

युक्रेन संघर्षादरम्यान रशियाचे अध्यक्ष पुतिन मित्र देशाच्या दौऱ्यावर; कारण काय?
3

युक्रेन संघर्षादरम्यान रशियाचे अध्यक्ष पुतिन मित्र देशाच्या दौऱ्यावर; कारण काय?

शत्रूच्या मनात घर करु पाहत आहेत डोनाल्ड ट्रम्प; AI चा शस्त्र म्हणून वापर करत लॉन्च केले ‘Genesis Mission’
4

शत्रूच्या मनात घर करु पाहत आहेत डोनाल्ड ट्रम्प; AI चा शस्त्र म्हणून वापर करत लॉन्च केले ‘Genesis Mission’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.