सौदी-अमेरिका मैत्रीचा भारताला होणार फायदा? जाणून घ्या नेमकं कसं बदलणार धोरणात्मक समीकरण (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अमेरिका-सौदीतील संरक्षण भागीदारी सध्या अधिकृतपमे आघाडीवर नाही. अमेरिका रियाधला मेजर नॉन-नाटो सहयोगी म्हणून दर्जा देणार आहे. पण या निर्णयाने भारतासाठी एक मोठी संधा चालून आली आहे. भारतीय लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांनी सौदी अरेबिया आणि अमेरिकेतील या करारावर बोलताना सांगितले की, याचा भारताला मोठा फायदा होणार आहे.
जनरल सय्यद अता हसनैन यांनी म्हटले की, सौदी अरेबिया पुढील दशकात अमेरिकेन ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहेत. यामध्ये उर्जा, प्रगत तंत्रज्ञान, संरक्षण तंत्रज्ञान आणि एआय सुधारित सुरक्षा उपाय यांसारख्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. यामुळे भारतासाठी नव्या संधी उलब्ध होणार आहेत.






