Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gautam Adani : अमेरिकेने होर्मुझमधून घेतली माघार! अदानींचे नशीबच चमकले; जाणून घ्या भारताला फायदा होणाऱ्या IMEC प्रकल्पाबद्दल

US-Iran War: होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर, आखाती देशांनी एक नवीन मार्ग शोधला आहे; ते इस्रायलच्या हैफा बंदरातून युरोपला तेल पाठवण्याची तयारी करत आहेत. अदानी समूहाच्या मालकीचे हे बंदर अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 02, 2026 | 02:40 PM
adani haifa port israel oil trade imec project hormuz strait crisis 2026

adani haifa port israel oil trade imec project hormuz strait crisis 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • होर्मुझ संकटावर तोडगा
  • अदानींचे नशीब चमकले
  • IMEC प्रकल्पाला संजीवनी

Adani Haifa Port Israel 2026 : मध्य-पूर्वेतील युद्ध आता एका अशा वळणावर पोहोचले आहे, जिथून जागतिक व्यापाराचे संपूर्ण नकाशे बदलणार आहेत. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर (Strait of Hormuz) दबाव वाढवल्यानंतर, अमेरिकेने तिथून घेतलेली माघार आणि आखाती देशांनी शोधलेला नवीन मार्ग, यामुळे भारताचे नशीब पालटणार आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सर्वात मोठा फायदा भारतीय उद्योगपती गौतम अदानी आणि भारताच्या ‘IMEC’ प्रकल्पाला होताना दिसत आहे.

काय आहे नेतान्याहू यांचा ‘मास्टरस्ट्रोक’?

इराणच्या धमक्यांमुळे आखाती देशांमधून होणारा तेल पुरवठा वारंवार विस्कळीत होत आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अरब देशांसमोर एक धाडसी प्रस्ताव ठेवला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीला पूर्णपणे वळसा घालून, जमिनीमार्गे रेल्वे आणि पाईपलाईनद्वारे तेल थेट इस्रायलच्या ‘हैफा’ (Haifa Port) बंदरात आणायचे आणि तिथून ते भूमध्य समुद्राद्वारे युरोपला पाठवायचे, अशी ही योजना आहे. लष्करी उपायांपेक्षा पर्यायी ऊर्जा मार्ग विकसित करणे हाच शांततेचा मार्ग असल्याचे नेतान्याहू यांनी ठामपणे सांगितले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Strategy : असे थांबले युद्ध! अमेरिका-इराण युद्धाच्या अर्धवट समाप्तीमागे दडली आहेत ‘ही’ अब्जावधींचे 5 गुपिते, वाचा सविस्तर

अदानी समूहाचे जागतिक वर्चस्व

या संपूर्ण योजनेचा केंद्रबिंदू म्हणजे इस्रायलमधील ‘हैफा बंदर’. विशेष म्हणजे, हे बंदर भारतीय कंपनी ‘अदानी पोर्ट्स’ (Adani Ports) चालवते. अदानी समूहाची या बंदरात ७०% हिस्सेदारी असून, २०५४ पर्यंत या बंदराचे सर्व अधिकार त्यांच्याकडे आहेत. इस्रायलमधील अर्ध्याहून अधिक कंटेनर मालाची हाताळणी याच बंदरातून होते. आता जर आखाती देशांचे तेल याच बंदरामार्गे युरोपला गेले, तर अदानी समूहाचे उत्पन्न आणि जागतिक व्यापारातील त्यांची पकड कित्येक पटीने वाढणार आहे. भारतासाठी ही अभिमानाची बाब आहे की, एका भारतीय कंपनीच्या बंदरामुळे जगाचा ऊर्जा पुरवठा सुरक्षित होणार आहे.

🔴 Gulf states consider new overland oil corridor to the Mediterranean via Haifa to bypass the Strait of Hormuz – report 👉 Read more herehttps://t.co/sNLSHwtWcT — i24NEWS English (@i24NEWS_EN) April 2, 2026

credit – social media and Twitter

IMEC: भारताला युरोपशी जोडणारा महामार्ग

या नवीन धोरणामुळे ‘भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर’ (IMEC) या प्रकल्पाला मोठी गती मिळणार आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट केवळ व्यापारापुरते मर्यादित नाही, तर याद्वारे रेल्वे, रस्ते आणि गॅस पाईपलाईनचे एक जाळे तयार केले जाणार आहे, जे भारताला थेट युरोपशी जोडेल. सौदी अरेबियाने यापूर्वीच आपल्या पूर्व-पश्चिम पाईपलाईनद्वारे लाल समुद्रापर्यंत तेल नेण्याचे मॉडेल यशस्वी केले आहे. आता हेच जाळे हैफा बंदरापर्यंत विस्तारले गेल्यास, इराणच्या कोणत्याही धमकीचा जागतिक तेल बाजारावर परिणाम होणार नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: मुज्तबा खामेनींच्या ‘त्या’ 5 निर्णयांनी महासत्तेचे गर्व हरण; अमेरिकेने युद्धात टेकले गुडघे आणि होर्मुझमधूनही माघार

इराणचा प्रभाव होणार कमी?

होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल मार्ग आहे, ज्यावर इराणचे वर्चस्व आहे. मात्र, जर आखाती देशांनी हैफा बंदराचा पर्याय निवडला, तर इराणचे हे सामरिक महत्त्व संपुष्टात येईल. रेल्वे आणि रस्ते नेटवर्कमुळे प्रादेशिक तणावाचा व्यापारावर होणारा परिणाम कमी होईल. यामुळे केवळ भारतालाच फायदा होणार नाही, तर युरोपलाही स्वस्त आणि सुरक्षित इंधन मिळेल. थोडक्यात सांगायचे तर, इराण-अमेरिका युद्धात भारताने आपली मुत्सद्देगिरी आणि अदानींनी आपल्या दूरदृष्टीने मोठी बाजी मारली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हैफा बंदर (Haifa Port) नक्की कोणाच्या मालकीचे आहे?

    Ans: इस्रायलमधील हैफा बंदर हे भारतीय 'अदानी समूह' (७०%) आणि इस्रायली कंपनी 'गॅडोट' (३०%) यांच्या संयुक्त मालकीचे असून अदानी समूह याचे संचालन करतो.

  • Que: IMEC प्रकल्प भारतासाठी का महत्त्वाचा आहे?

    Ans: IMEC प्रकल्प भारताला मध्य-पूर्वेमार्गे थेट युरोपशी जोडतो, ज्यामुळे व्यापाराचा वेळ आणि खर्च कमी होतो आणि होर्मुझसारख्या वादग्रस्त मार्गांवर अवलंबून राहावे लागत नाही.

  • Que: आखाती देश होर्मुझच्या सामुद्रधुनीला वळसा का घालत आहेत?

    Ans: इराणसोबतच्या वाढत्या तणावामुळे आणि युद्धाच्या धोक्यामुळे तेल पुरवठ्यात व्यत्यय येऊ नये, म्हणून आखाती देश इस्रायलमार्गे पर्यायी मार्गाचा विचार करत आहेत.

Web Title: Adani haifa port israel oil trade imec project hormuz strait crisis 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

BRICS 2026: ‘आता अमेरिका दादागिरी करत आहे…’ भारत भूमीवर पोहोचताच इराणच्या संतापाचा स्फोट; अराघची यांनी व्यक्त केला रोष
1

BRICS 2026: ‘आता अमेरिका दादागिरी करत आहे…’ भारत भूमीवर पोहोचताच इराणच्या संतापाचा स्फोट; अराघची यांनी व्यक्त केला रोष

Gaza Blockade Break: डझनभर जहाजे निघाली गाझाच्या दिशेने! इस्रायली नाकेबंदीला आव्हान देण्याच्या तयारीत, नेमकं काय घडणार?
2

Gaza Blockade Break: डझनभर जहाजे निघाली गाझाच्या दिशेने! इस्रायली नाकेबंदीला आव्हान देण्याच्या तयारीत, नेमकं काय घडणार?

Hormuz Conflict : ‘खपवून घेणार नाही’ होर्मुझमध्ये भारतीय जहाजावर ड्रोन अन् क्षेपणास्त्र हल्ला; सरकारचा शत्रूला कडक इशारा
3

Hormuz Conflict : ‘खपवून घेणार नाही’ होर्मुझमध्ये भारतीय जहाजावर ड्रोन अन् क्षेपणास्त्र हल्ला; सरकारचा शत्रूला कडक इशारा

Hormuz Strait: US-Iran युद्धाच्या आगीतून भारतीय जहाजांची ‘चित्त्यासारखी’ सुटका; होर्मुझमधील नाकेबंदी ‘अशी’ केली निष्प्रभ
4

Hormuz Strait: US-Iran युद्धाच्या आगीतून भारतीय जहाजांची ‘चित्त्यासारखी’ सुटका; होर्मुझमधील नाकेबंदी ‘अशी’ केली निष्प्रभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.