Afghan Foreign Minister Muttaqi India Visit
Afghan Foreign Minister Muttaqi India Visit : नवी दिल्ली/काबूल : अफगाणिस्तानचे (Afghanistan) परराष्ट्र मंत्री अमीर मुत्ताकी भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत पोहोचले आहेत. त्यांच्या या दौऱ्याचा हेतू भारत आणि अफगाणिस्तानमधील संबंध मजबूत करणे आहे. चार वर्षापूर्वी अशरफ घनी यांचे सरकार पडल्यानंतर भारत आणि अफगाणिस्तानच्या संबंधासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. यावेळी मुत्ताकी दारुल अलूम देवबंद मदरसा आणि ताजमहालला भेट देणार आहेत.
मुत्ताकी गेल्या महिन्यात भारत दौऱ्यावर येणार होते. पण संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC)त्यांच्या परदेश प्रवासावर बंदी हटवली नाही. यामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला. यानंतर ३० सप्टेंबर रोजी त्यांना ९ ते १६ ऑक्टोबर दरम्यान भारताला भेट देण्याची परवानगी देण्यात आली. मुत्ताकी यांचा हा सात दिवसांचा दौरा असणार आहे.
‘भारताशी संबंध तात्काळ सुधारा, नाहीतर…’ ; अमेरिकन कॉंग्रेस खासदारांचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा
या भेटीमुळे भारत आणि अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारच्या संबंधांना एक नवी दिशा मिळेले. यापूर्वी १५ मे रोजी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मुत्ताकी यांच्याशी फोनवरुन चर्चा केली होती. भारत सरकारने अद्याप तालिबान सरकारला अधिकृतपण मान्यता दिलेली नाही.
सध्या मुत्ताकी यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा असून भारताचा उद्देश अफगाणिस्तानमध्ये मानवतावादी मदत पोहोचवण्याचा आहे. तसेच दहशतवाद मिटवणे, महिला आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांचे प्रश्न सोडवणे आहे. सध्या भारताने तालिबानशी मर्यादित संपर्क ठेवला आहे.
तालिबानला जागतिक स्तरावर अधिकृत मान्यता नाही
२०२१ मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार स्थापन झाले. अमेरिकेच्या अफगाणिस्तानमधून सैन्य माघारीनंतप तालिबान राजवट अस्तित्त्वात आहे. पण तालिबान अजून आंतरराष्ट्र स्तरावर अधिकृत मान्यता मिळालेली नाही. भारतासह अनेक देश सुरक्षा आमि मानवतावादी समस्यांवर सध्या चर्चा करत आहे. याच उद्देशाने हा मुत्ताकी यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. केवळ रशियाने तालिबानला औपचारिक मान्यता दिली आहे.
सध्या अफगाणिस्तानचे तालिबान सरकार परराष्ट्र देशांना त्यांच्या देशात गुंतवणूक करण्यास सांहत आहे. यामध्ये पायाभूत सुविधा, शाळा आणि रुग्णालयांचा समावेश आहे. भारतही अफगाणिस्तानसोबत राजनैतिक आणि नागरी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न कपत आहे. यासाठी भारताने एक तांत्रिक मोहिम सुरु केली आहे. ज्याचा उद्देश अफगाणिस्तानमध्ये मानवतावादी मदत पोहोचवणे आहे.
प्रश्न १. अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्री मुत्ताकी यांच्या भारत दौऱ्याचा उद्देश काय आहे?
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर मुत्ताकी भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्याचा हेतू भारत आणि अफगाणिस्तानमधील संबंध मजबूत करणे आहे.
प्रश्न २. भारताचा अफगाणिस्तानशी संबंध ठेवण्याचा काय उद्देश आहे?
भारताचा उद्देश अफगाणिस्तानमध्ये मानवतावादी मदत पोहोचवण्याचा आहे. तसेच दहशतवाद मिटवणे, महिला आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांचे प्रश्न सोडवणे आहे.