ट्रम्प यांच्या शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्याला इस्राएल-हमास सहमत; पंतप्रधान मोदींनीही केलं स्वागत, म्हणाले... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Israel Hamas War : इस्रायल आणि हमास युद्ध (Isreal Hamas War) अखेर संपणार आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने गाझातील शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यावर इस्रायल आणि हमास सहमत झाला असल्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केली आहे. गाझातील युद्ध थांबवणे आणि ओलिसांची सुटका या पहिल्या टप्प्यात केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे.
हमासच्या अस्तित्वाला धोका? डोनाल्ड ट्रम्प यांच्या अटींवर गाझात होणार का युद्धबंदी?
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर पोस्ट केली आहे की, मला हे सांगताना खूप अभिमान वाटत आहे, इस्रायल आणि हमास दोघांनी आमच्या शांतता योजनच्या पहिल्या टप्प्यावर स्वाक्षरी केली आहे. यामुळे आता लवकरच ओलिसांची सुटक होईल. इस्रायली सैन्य त्यांना मान्य करण्यात आलेल्या रेषेवरुन माघार घेईल. हे शांततेच्या दिशेने एक मोठे सकारात्मक पाऊल आहे.
हा दिवस अरब आणि मुस्लिम देशांसासाठी, इस्रायल, गाझा, आसपासचे सर्व राष्ट्र आणि अमेरिकेसाठी एक महान दिवस असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी कतार आणि तुर्कीने इस्रायल आणि हमासमध्ये मध्यस्थी करुन शांततेसाठी केलेल्या प्रयत्नांवरही आभार मानले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायल आणि हमासच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी म्हटले की, हा निर्णय इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंच्या (Benjamin Netanyahu) मजबूत नेतृत्त्वाचा विजय आहे. आशा आहे की, गाझातील ओलिसांटी सुटका होईल. गाझातील लोकांना मानवतावादी मदत मिळेल आणि कायमस्वरुपी शांततेचा मार्ग देखील मोकळा होईल.
We welcome the agreement on the first phase of President Trump’s peace plan. This is also a reflection of the strong leadership of PM Netanyahu. We hope the release of hostages and enhanced humanitarian assistance to the people of Gaza will bring respite to them and pave the way… — Narendra Modi (@narendramodi) October 9, 2025
डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझात युद्धबंदीसाठी २० कलमी योजन मांडली होती. यातील पहिल्या टप्प्याला इस्रायल आणि हमासकडून मान्यता मिळाल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. याअंतर्गत इस्रायल गाझातून आपले सैन्य माघारी बोलावेल, तसेच ७२ तासांच्या आत हमास सर्व ओलिसांची सुटका करणार आहे. गुरुवारी (०९ ऑक्टोबर) रोजी इजिप्तमध्ये इस्रायल आणि हमासने या करारावर स्वाक्षरी केली आहे.
प्रश्न १. इस्रायल-हमास युद्धावर ट्रम्प यांनी काय घोषणा केली?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इस्रायल आणि हमासने त्यांच्या शांतता योजनेतील पहिल्या करारावर स्वाक्षरी केली असल्याचे घोषणा केली आहे.
प्रश्न २. पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्या घोषणेवर काय म्हटले?
पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्या घोषणेनंतर इस्रायल-हमासच्या शांतता योजेनला सहमती देण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. यामुळे ओलिसांची सुटका होईल आणि कायमस्वरुपी शांतात निर्माण होईल असे त्यांनी म्हटले आहे.
प्रश्न ३. शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यात कशावर लक्ष्य केंद्रित केले जाणार?
इस्रायल-हमासच्या सहमती नंतर शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यात गाझातील युद्ध थांबवणे आणि ओलिसांची सुटका केली जाणार आहे.