
Pakistan Afghanistan War
हा हल्ला अशा वेळी करण्यात आला आहे जेव्हा, अफगाणिस्तानच्या (Afghanistan) कथित दाव्यानुसार पाकिस्तानने त्यांच्यावर तीव्र हवाई हल्ला केला होता. ज्यामुळे ९ लहान मुलांसह १० जण ठार झाले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्तानने पाकिस्तानसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केला असल्याचे म्हटले जात आहे.
एका अफगाण पत्रकाराने सोशल मीडियावर दावा केला आहे की, अफगाणिस्तानने पाकिस्तानी विमाने आणि ट्रान्झिट फ्लाइट्ससाठी आपले हवाई क्षेत्र तात्पुरते बंद केले आहे. यामुळे पाकिस्तानच्या PIA एअरलाईृइन्सला अनेक उड्डाणे रद्द करावी लागली आहे. अद्याप तालिबानच्या या निर्णयामागचे खरे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, पाकिस्तनच्या हल्ल्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे.
मंगळवारी (२५ नोव्हेंबर) अफगाणिस्तानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी दावा केला होता की, पाकिस्तानी सैन्याने आक्रमक होऊ खोस्त प्रांतात एका स्थानिक नागरिकाचे घरे उडवून दिले होते. ज्यामध्ये लहान मुले आणि महिलेचा मृत्यू झाला. शिवाय पाकिस्तानने काही भागात छापे देखील टाकले असल्याचे म्हटले होते. मात्र पाकिस्तानने अफगाणिस्तानवर कोणताही हल्ला केल्याचा दावा नाकारला होता.
Sources:
The #Afghan government has closed its #airspace to #Pakistan.
Reliable sources in Kabul report that the Afghan government has recently taken action to shut its airspace to Pakistan, and no Pakistani passenger or cargo aircraft is now allowed to fly through Afghan+ pic.twitter.com/kgpWwe1c6v — Sonia Niazi English (@sonia_niazi12) November 26, 2025
तालिबान प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद यांनी केलेल्या दाव्यानंतर पाकिस्तानने प्रतिक्रिया अफगाणिस्तानवरील हल्ल्यांचे दावे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. पाकिस्तानच्या इंटर-सर्विसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) चे डीजी लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी सरकारी माध्यमांना मंगळवारी सांगितले की, अफगाण तालिबानचे आरोप पूर्णपणे खोटे आहेत.
दरम्यान या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ड्युरंड रेषेवर पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात सैन्य आणि जड तोफखाना आघाडीच्या चौक्यांवर तैनात करण्यात आल्या आहेत. यामुळे पुन्हा एकदा तीव्र संघर्षाच धोका निर्माण झाला आहे. शिवाय तालिबान सरकारने देखील आपल्या सीमांच्या बाजूने रॉकेट्स युनिट्स आणि फ्रंटलाइन ब्रिगेड्स तैनात केल्या आहे. सध्या दोन्ही देशातील तणावात प्रचंड वाढ झाली आहे.
पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरला पाकिस्तान; अंदाधुंद गोळीबारात तीन सुरक्षा कर्मचारी ठार
Ans: पाकिस्तानच्या कथित हवाई हल्ल्यानंतर सोशल मीडियावर अफगाणिस्तानचे पाकिस्तानसाठी हवाई क्षेत्रावर बंदी घातली असल्याचा दावा केला जात आहे.
Ans: पाकिस्तानने अफगाणिस्तानवर तीव्र हवाई हल्ला केला होता. ज्यामुळे ९ लहान मुलांसह १० जण ठार झाले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्तानने पाकिस्तानसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केला असल्याचे म्हटले जात आहे. मात्र अद्याप याचे खरे कारण स्पष्ट नाही.