
Trump Cuba Policy
डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी क्युबातील कम्युनिस्ट सरकार उलथवून टाकायचे आहे. यासाठी ट्रम्प गांभीर्याने विचार करत असून तेल आयातीवर पूर्णपणे नाकेबंदीचा विचार अमेरिका करत आहे. असे करुन ट्रम्प यांनी क्युबाच्या अर्थव्यवस्थेवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे क्युबातील नेतृत्व बदलेले असे ट्रम्प यांची योजना आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी क्युबाला अमेरिकेशी करार करण्याची धमकीही दिली होती. अन्यथा तेलावर बंदीचा इशारा त्यांनी दिला होता. ट्रम्प यांच्या या योजनेला अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याकडूनह पाठिंबा मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, क्युबाची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे व्हेनेझुएलाकडून मिळाणाऱ्या तेलावर आणि पैशावर अवलंबून आहे. यामुळे अमेरिकेने व्हेनेझुएलातून येणाऱ्या तेलावर नाकेबंदी केल्यास याचा क्युबाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची शक्यता आहे. आधीच व्हेनेझुएलावरील आर्थिक निर्बंध, महागाई, वीज आणि अन्न पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे क्युबाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तेलावर नाकेबंदी झाल्यास ही परिस्थिती अधिक घातक होण्याची शक्यता आहे. यामुळे वाहतूक, वीज निर्मिती आणि उद्योगांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे क्युबात गंभीर मानवी संकट उभे राहिल.
क्युबाला टार्गेट करण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे रशिया आणि चीनशी या देशाची वाढती जवळीक आहे. यामुळे अमेरिका क्युबावर नाराज आहेत. अमेरिकेच्या शेजारी देशात दोन महासत्ता आणि शत्रू देशांचा वाढत प्रभाव राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे ट्रम्प यांचे मत आहे. यामुळेच ट्रम्प क्युबावर अधिक कठोर निर्बंध लादण्याच्या तयारीत आहेत.
परंतु अमेरिकेने क्युबावर पूर्णपणे तेल नाकेबंदी केल्यास याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठे वादळ उठण्याची शक्यता आहे. यापूर्वी १९६१ मध्ये देखील अमेरिकेने क्युबामध्ये सत्ता परिवर्तनासाठी गुप्त कारवाई केली होती. परंतु हा प्रयत्न अपयशी ठरला होता. यामुळे ट्रम्प आता काय पावले उचलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ट्रम्पचा व्हेनेझुएलावर दबाव वाढला! ‘या’ देशांसोबत आर्थिक संबंध तोडण्याचा दिला अल्टीमेटम
Ans: क्युबातील कम्युनिस्ट सरकार उलथवून टाकण्यासाठी ट्रम्प क्युबाला व्हेनेझुएलाकडून मिळणाऱ्या तेलावर नाकेबंदी करण्याचा विचार करत आहे. यामुळे क्युबाच्या अर्थव्यवस्थेवर दबाव निर्माण होईल आणि नेतृत्वात बदल होईल असे ट्रम्प यांना वाटते.
Ans: तेल नाकेबंदीमुळे क्युबामध्ये वीजपुरवठा, वाहतूक आणि उद्योगांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे महागाई, अन्नटंचाई यांसारख्या गंभीर मानवी संकाटाचा सामना क्युबाच्या जनतेला करावा लागेल.
Ans: अमेरिकेने क्युबावर पूर्णपणे तेल नाकेबंदी केल्यास आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठे वादळ उठण्याची शक्यता आहे.