AI is useful for humanity but caution is needed; PM Modi's live remarks at France Summit
पॅरिस: सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्यावर असून, त्यांनी पॅरिसमध्ये आयोजित आर्टिफिशिय इंटेलिजन्स (AI) ॲक्शन परिषदेत सहभागी झाले आहे. या परिषदेदरम्यान त्यांनी आपल्या भाषणात AI च्या वाढत्या प्रभावाबद्दल भाष्य केले. त्यांनी सांगितले की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मानवतेसाठी मदत करणार साधान आहे आणि हे या शतकात मानवतेसाठी कोडिंग करत आहे. परंतु सावधगिरी बाळगणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
ग्लोबल गव्हर्नन्स आणि विश्वास निर्माण करण्याची गरज
पंतप्रधान मोदी यांनी, AI च्या प्रभावी व्यवस्थापनासाठी जागतिक पातळीवर सामूहिक प्रयत्नांची गरज त्यांनी अधोरेखित केली. त्यांनी म्हटले की, असे धोरण आणि नियम तयार करणे आवश्यक आहे, ज्यामुळे सामूहिक मूल्य जपले जातील, धोके टळतील आणि विश्वास निर्माण करती. AI चा वापर केवळ स्पर्धी आणि तणाव कमी करण्यास नव्हे तर नवीन संशोधनाला चालना देण्यासाठी तसेच जागतिक हितासाठी याचा उपयोग करता आला पाहिजे.
नरेंद्र मोदींनी एक उदाहरण देत म्हटले की, जर आपण आपली वैद्यकीय चाचणी रिपोर्ट AI ॲपमध्ये अपलोड केली, तर ते सोप्या भाषेत त्याचा अर्थ स्पष्ट करेल. मात्र, जर आपण त्याच ॲपला डाव्या हाताने लिहिणाऱ्या व्यक्तीचे चित्र काढण्यास सांगितले, तर ते बहुतांशवेळा उजव्या हाताने लिहिणारे व्यक्तीचे चित्र दाखवेल. हे उदाहरण देऊन त्यांनी सांगितले की AI मध्ये अद्याप काही मर्यादा आणि अडचणी असून यावर काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले.
AIच्या वेगवान वाढीवर मोदींचे निरीक्षण
तसेच पंतप्रधान मोदींनी, AI अतिशय वेगाने विकसित होत आहे आणि जागतिक स्तरावर त्याचा स्वीकारदेखील मोठ्या प्रमाणात केला जात आहे. म्हणूनच शासन आणि मानक विकसित करण्यासाठी देशांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यांनी हेही नमूद केले की, AI आधीच अर्थव्यवस्था, सुरक्षा आणि समाजाला नव्याने आकार देत आहे. यामुळे त्याला अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी विकसित करणे आवश्यक आहे. लोकांसाठी हे तंत्रज्ञान अधिक सुलभ करणे गरजेचे आहे.
AIचा उपयोग सकारात्मक दृष्टिकोनातून करण्याचे आवाहन
पंतप्रधान मोदी म्हणाले की, AIच्या सकारात्मक शक्यता विलक्षण आहेत, मात्र त्यातील पूर्वग्रह टाळण्यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे म्हटले. या संदर्भात त्यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रों यांचे आभार मानले आणि या महत्त्वाच्या चर्चेचा भाग होण्याचा आनंद व्यक्त केला.