'टॅरिफमुळे समस्या सुटत नाही'; मेक्सिकोच्या 'या' श्रीमंत व्यक्तीची डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयावर टीका (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मेक्सिको: सध्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प टॅरिफच्या मुद्द्यावरुन जागतिक स्तरावर चर्चेचा विषय बनत आहे. त्यांच्या या निर्णयाला आंतरराष्ट्रीय स्तरावर विरोध होत असून ट्रम्प यांनी अनेक देशांशी व्यापार युद्ध सुरु केले आहे. दरम्यान मेक्सिकोच्या एका श्रीमंत आणि महत्त्वपूर्ण व्यक्तीनेही ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर टीका केली आहे. मेक्सिकोचे सर्वात श्रीमंत उद्योजक आणि जगातील नामांकित उद्योगपती कार्लोस स्लिम यांनी टॅरिफवर आणि अमेरिकेच्या आर्थिक स्थितीवर भाष्य केले आहे.
कार्लोस स्लिम यांनी आपल्या वार्षिक परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. तसेच त्यांनी ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळतील त्यांच्या टॅरिफ धोरणावर टीका केली आहे.
ट्रम्प यांच्यासमोर मोठी आव्हाने
डोनालल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाबद्दल कार्लोस यांना विचारले असता, त्यांनी “ट्रम्प यांना अजून खूप काम आहे. चार वर्षांची मुदत फार कमी आहे” असे म्हटले आहे. तसेच त्यांनी असेही म्हटले की, ट्रम्प यांच्यासमोर अनेक गुंतागुंतीच्या समस्या आहेत. अमेरिकेने आपले जागतिक नेतृत्त्ल पुन्हा मिळवावे, यासाठी त्यांना योग्य दिशा निवडण्याची गरज आहे.
कार्लोस यांनी 2016 मध्ये ट्रम्प यांच्या पहिल्या अध्यक्षीय कार्यकाळात अमेरिकेसोबत केलेल्या मुक्त व्यापार कराराविषयी चर्चा केली होती. मेक्सिको आणि अमेरिका यांच्यात व्यापर आणि औद्योगिक संबंध मजबूत रहावेत यासाठी त्यांनी ट्रम्प प्रशासनाशी संवाद साधला होता, असे त्यांनी सांगितले.
टॅरिफ धोरणावर टीका
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर टीका करताना स्लिम यांनी स्पष्टपणे सांगितले की, “टॅरिफ प्रभावी उपाय नाहीत. ते केवळ महागाई वाढवतात आणि व्याजदरांवर कोणताही परिणाम करत नाहीत. टॅरिफ समस्यांचे समाधान करू शकत नाहीत.” ट्रम्प प्रशासनाच्या स्टील आणि अॅल्युमिनियम उत्पादने यांच्यावर 25% टॅरिफ लावण्याचा निर्णयावर प्रतिक्रिया देताना कार्लोस, याचा मेक्सिकोवर फारसा परिणाम होणार नाही असे म्हटले. त्यांनी सांगितले की, काही मेक्सिकन स्टील उत्पादकांचे स्वतःचे अमेरिका बाजारात व्यवसाय आहेत, यामुळे टॅरिफचा मोठा फटका बसणार नाही.
अमेरिकेच्या आर्थिक स्थैर्यावर परिणाम?
कार्लोस यांनी म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्रांची परिस्थिती चांगली नाही. अमेरिकेने स्वत:चे उत्पादन कमी केले आहे आणि अनेक उद्योग परदेशी कंपन्यांना आऊटसोर्स केले आहे. यामुळे देशाच्या आर्थिक स्थैर्यावर परिणाम होत आहे. त्यांच्या या वक्तव्याने स्पष्ट होते की, अमेरिकेच्या टैरिफ धोरणामुळे जागतिक व्यापारावर मोठा परिणाम होत आहे आणि भविष्यात दोन्ही देशांच्या व्यापार संबंधांमध्ये अधिक समतोल साधण्याची गरज आहे.