Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Al-Aqsa Mosque: ‘अल-अक्सा’चे दरवाजे उघडा, अन्यथा…’ युद्धाच्या पार्श्वभूमीवर ‘या’ 8 इस्लामिक देशांनी इस्रायलविरुद्ध थोपटले दंड

Al-Aqsa Mosque Closure : आठ मुस्लिम देशांनी इस्रायलने अल-अक्सा मशीद बंद केल्याचा तीव्र निषेध केला आहे. रमजान दरम्यान मशीद बंद करणे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 12, 2026 | 09:35 AM
al aqsa mosque closure israel warning from 8 muslim countries marathi news

al aqsa mosque closure israel warning from 8 muslim countries marathi news

Follow Us
Close
Follow Us:
  • मुस्लिम राष्ट्रांचा इशारा
  • रमजानमध्ये बंदी
  • एकमेव अधिकार

Al-Aqsa Mosque Closure Saudi Arabia Pakistan Warning Israel 2026: मध्यपूर्वेतील (US-Israel Iran War) परिस्थिती दिवसेंदिवस स्फोटक होत चालली आहे. इराणसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने जेरुसलेममधील पवित्र ‘अल-अक्सा'(Al-Aqsa Mosque Israel) मशिदीला टाळे ठोकले आहे. या निर्णयामुळे संपूर्ण मुस्लिम जगतात संतापाची लाट उसळली आहे. विशेषतः पवित्र रमजान महिन्यात सलग १२ दिवस उपासकांना नमाज पठणापासून रोखल्यामुळे ८ प्रमुख मुस्लिम राष्ट्रांनी एकत्र येत इस्रायलला कडक शब्दांत तंबी दिली आहे.

आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन: ८ देशांचे संयुक्त निवेदन

सौदी अरेबिया, पाकिस्तान, कतार, जॉर्डन, इंडोनेशिया, तुर्की, इजिप्त आणि युएई (UAE) या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी बुधवारी एक संयुक्त निवेदन जारी केले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, जेरुसलेमच्या जुन्या शहरात आणि अल-अक्सा मशिदीत पॅलेस्टिनींना प्रवेश नाकारणे हे ‘आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे’ उघड उल्लंघन आहे. “कोणत्याही प्रार्थनास्थळात विना अडथळा प्रवेश मिळणे हा मानवी हक्क आहे आणि इस्रायल तो हिरावून घेत आहे,” असे या मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: ‘ते आधीच युद्धात उतरले होते..’ इराणच्या क्षेपणास्त्रांवर रशियाचा ‘ठसा’; तर संकटात भारताची ‘अशी’ स्मार्ट खेळी

अल-अक्सावर इस्रायलचा अधिकार नाही!

या ८ देशांनी इस्रायलच्या कारवाईला ‘बेकायदेशीर आणि अन्याय्य’ ठरवले आहे. निवेदनात ठामपणे मांडण्यात आले आहे की, इस्रायल ही केवळ एक ‘कब्जा करणारी शक्ती’ (Occupying Power) असून त्यांना जेरुसलेममधील कोणत्याही इस्लामिक किंवा ख्रिश्चन पवित्र स्थळांवर कोणताही सार्वभौम अधिकार नाही. अल-अक्सा मशीद आणि संपूर्ण परिसर हा केवळ मुस्लिमांचा आहे आणि त्यावर देखरेख करण्याचा अधिकार फक्त जॉर्डनच्या वक्फ आणि इस्लामिक व्यवहार मंत्रालयालाच आहे.

Eight Arab and Islamic Countries Condemn, in a Joint Statement, the Continued Closure by the Israeli Occupation Authorities of the Gates of Al-Aqsa Mosque / Al-Haram Al-Sharif to Muslim Worshippers Doha – March 11, 2026 The Foreign Ministers of the State of Qatar, the Hashemite… pic.twitter.com/oWyMDzIqCd — Ministry of Foreign Affairs – Qatar (@MofaQatar_EN) March 11, 2026

credit – social media and Twitter

रमजानमधील बंदीमुळे परिस्थिती चिघळली

रमजान हा मुस्लिमांसाठी सर्वात पवित्र महिना मानला जातो. या काळात अल-अक्सा मशिदीत जगभरातून लाखो लोक नमाजसाठी येतात. मात्र, इराण-इस्रायल संघर्षाचे कारण पुढे करत इस्रायलने सुरक्षा यंत्रणांच्या नावाने ही मशीद बंद ठेवली आहे. यामुळे मुस्लिम राष्ट्रांमध्ये चिंतेचे वातावरण आहे की, इस्रायल या पवित्र स्थळाची ‘ऐतिहासिक आणि कायदेशीर स्थिती’ (Status Quo) बदलण्याचा प्रयत्न करत आहे.

The #OIC condemns and warns against the continued closure of the Al-Aqsa Mosque by the #Israeli occupation. #AlAqsa #alaqsamosque #Palestine #Israel pic.twitter.com/xyVh6vE9UV — OIC (@OIC_OCI) March 7, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Oil Spill: जगावर इंधन संकट! इराणने पार केल्या सर्व मर्यादा; इराकच्या हद्दीत घुसून अमेरिकन जहाजांवर स्फोटकांचा पाऊस, VIDEO VIRAL

जागतिक समुदायाला आवाहन

या आठ देशांनी केवळ इस्रायललाच इशारा दिला नाही, तर आंतरराष्ट्रीय समुदायालाही यात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. इस्रायलला त्याचे “सततचे उल्लंघन” थांबवण्यास भाग पाडावे, जेणेकरून मुस्लिम उपासक पुन्हा एकदा शांततेत प्रार्थना करू शकतील, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. जेरुसलेममध्ये सुरू असलेला हा संघर्ष जर थांबला नाही, तर याचे पडसाद संपूर्ण मध्यपूर्वेतील शांततेवर उमटू शकतात.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अल-अक्सा मशीद का बंद आहे?

    Ans: इराणसोबतच्या युद्धामुळे सुरक्षेचे कारण देत इस्रायलने अल-अक्सा मशिदीत पॅलेस्टिनी आणि मुस्लिम उपासकांच्या प्रवेशावर निर्बंध लादले आहेत.

  • Que: कोणत्या ८ देशांनी इस्रायलचा निषेध केला आहे?

    Ans: सौदी अरेबिया, पाकिस्तान, तुर्की, कतार, जॉर्डन, इंडोनेशिया, इजिप्त आणि युएई या देशांनी संयुक्त निषेध केला आहे.

  • Que: अल-अक्सा मशिदीवर कोणाचे नियंत्रण आहे?

    Ans: आंतरराष्ट्रीय करारांनुसार, जॉर्डनचे 'जेरुसलेम वक्फ' हे या मशिदीच्या व्यवहारांचे व्यवस्थापन पाहणारी एकमेव कायदेशीर संस्था आहे.

Web Title: Al aqsa mosque closure israel warning from 8 muslim countries marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 09:35 AM

Topics:  

  • Israel
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

Middle East Conflict : मध्यपूर्वेतील संकटावर भारत मैदानात; २४ तासांत जयशंकर यांची अनेक देशांशी थेट चर्चा, जगात खळबळ
1

Middle East Conflict : मध्यपूर्वेतील संकटावर भारत मैदानात; २४ तासांत जयशंकर यांची अनेक देशांशी थेट चर्चा, जगात खळबळ

World War 3: ‘ते आधीच युद्धात उतरले होते..’ इराणच्या क्षेपणास्त्रांवर रशियाचा ‘ठसा’; तर संकटात भारताची ‘अशी’ स्मार्ट खेळी
2

World War 3: ‘ते आधीच युद्धात उतरले होते..’ इराणच्या क्षेपणास्त्रांवर रशियाचा ‘ठसा’; तर संकटात भारताची ‘अशी’ स्मार्ट खेळी

Oil Spill: जगावर इंधन संकट! इराणने पार केल्या सर्व मर्यादा; इराकच्या हद्दीत घुसून अमेरिकन जहाजांवर स्फोटकांचा पाऊस, VIDEO VIRAL
3

Oil Spill: जगावर इंधन संकट! इराणने पार केल्या सर्व मर्यादा; इराकच्या हद्दीत घुसून अमेरिकन जहाजांवर स्फोटकांचा पाऊस, VIDEO VIRAL

LPG Supply Shortage: गॅस टंचाईमुळे मोबाईल नेटवर्क गायब होणार? ५ मार्चपासून टॉवर कंपन्यांचा गॅस पुरवठा बंद
4

LPG Supply Shortage: गॅस टंचाईमुळे मोबाईल नेटवर्क गायब होणार? ५ मार्चपासून टॉवर कंपन्यांचा गॅस पुरवठा बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.