Albania PM AD Rama Kneels To Greet Italian PM Georgia At EU Summit
शुक्रवारी (१६ मे) अल्बानियामध्ये ४० देशांची युरोपीय परिषद पार पडली. या परिषदेदरम्यान अल्बानियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी ४० देशांच्या नेत्यांचे उत्साहाने स्वागत केले. यावेळी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनींचे देखील अल्बानीयाच्या एडी रामा पंतप्रधानांनी खास पद्धतीने स्वागत केले. अगदी मुसळधार पाऊसही त्यांना मेलोनींचे स्वागत करण्यापासून रोखू शकला नाही. सध्या याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
अल्बानीयाचे पंतप्रधान एडी रामा नी प्रत्येकाचे उत्साहाने आणि हसतमुखाने सर्व युरोपीय देशांच्या नेत्यांचे स्वागत केले. त्यांनी म्हटले की, युरोपीय परिषदेसाठी तिराना येथे जमलेल्या सर्व युरोपीय देशांचे, नेत्यांचे आम्ही स्वागत करतो. शिखर परिषदेच्या वेळा लाल कार्पेट देखील टाकण्यात ले होते. तसेच पंतप्रधान एडी रामा यांनी पावसात उभे राहून सर्वांचा स्वागत केले.
यावेळी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे आगमन झाले. यावेळी अल्बानीयाचे पंतप्रधान एडी रामा गुडघ्यावर बसले, त्यांनी हातातील छत्री बाजूला ठेवली आणि दोन्ही हात जोडून इटालीच्या बहिणीचे जॉर्जिया मेलोनींचे स्वागत केले. नंतर मेलोनीं यांनी त्यांना उठवले आणि दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि परिषदेच्या सभागृहात प्रवेश केला.
तसेच त्यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे वोलोडिमिर झेलेन्स्की यांचा आदराने स्वागत केले. त्यांना ओपेरा सभागृहापर्यंत सोडले. तसेच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅंक्रों यांचे स्वागत करताना, राजा आला! अले म्हणत त्यांना मिठी मारली. तसेच इतर देशांच्या राष्ट्राध्यक्षांचे देखील अनोख्या अंदाजमध्ये अल्बानियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी स्वागत केले.
Giorgia Meloni truly commands the utmost respect of world leaders. This is quite the sight to see. pic.twitter.com/xBp3d0Qi7j
— Joey Mannarino 🇺🇸 (@JoeyMannarinoUS) May 16, 2025
२०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅनुएल मॅक्रों यांनी युरोपीय देशांच्या परिषदे घेतील होती. ही परिषद सर्व युरोपीय देशांना एकत्र आणते. या बैठकीचा महत्त्वाचा मुद्दा हा युक्रेन आणि रशियामध्ये सुरु असलेले युद्ध आहे. यावेळी इस्तंबूलमध्ये झालेल्या रशिया-युक्रेन युद्धबंदीच्या चर्चेवरही चर्चा झाली. तसेच स्थलांतरितांच्या मुद्द्यावरही युरोपीय देशांच्या परिषदेत चर्चा झाली.