थेट चढले रडगाड्यावर अन्...; पाकिस्तानच्या पंतप्रधानांची सैन्याची भेट ठरलीये चर्चेचा विषय, VIDEO (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्लामाबाद: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच आदमपूर एअरबेसवर सैन्याची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी सैन्याच्या कामगिरीचे आणि शौर्यचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच सर्वत्र कौतुक होत आहे. याच वेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देखील त्यांच्या सैन्याचे भेट घेतली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर यावर मोठ्या प्रमाणात टिका केली जात आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या या कृतीचे डिप्लोमसी म्हणून वर्णने केले जात आहे. नरेंद्र मोदींनी देशाच्या सुरक्षेसाठी लढा देणाऱ्या सैनिकांचे आभार मानले आणि त्यांचे मनोबल वाढवले असे म्हटले जात आहे. तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कृती ही राजकीय स्टंट असल्याची टिका सोशल मीडियावर केली जात आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Prime Minister Muhammad Shehbaz Sharif, during his visit to Sialkot, addressed Pakistan Army soldiers and PAF airmen, delivering a clear and firm message to Prime Minister Modi. pic.twitter.com/weeQW5iU3x
— The Daily CPEC (@TheDailyCPEC) May 15, 2025
पहगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरु झाला होता. भारतातून पहगामच्या हल्ल्याचा बदल्याची मागणी केली जात होती. भारताने ऑपरेशन सिंदूर मोही राबवली आणि पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केले. भारताने पहलगामचा बदला घेतला. परंतु भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानने देशाच्या सीमावर्तीत भागांमध्ये हल्ला करण्यास सुरुवाक केली. मात्र, भारताने पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले.
दरम्यान १० मे रोजी चार दिवस सुरु असलेल्या संघर्षावर विराम झाला. दोन्ही देशांच्या डीजीएमोने चर्चा केली आणि युद्धबंदीवर सहमती दर्शवली. एवढे होऊनही पाकिस्तान सुधारला नाही, यानंतरही भारतावर हल्ले केले. तसेच सिंधू जल करारावरुन भारताला धमकी दिली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी म्हटले की, सिंधू जल करार पुनर्सुचित केला नाही तर युद्धबंदी मानता येणार नाही.
दरम्यान पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेसवर सैन्याला भेट दिली होती. यावेळी त्यांनी सैन्याच्या कामगिरीचे त्यांच्या धाडसाचे कौतुक केलेच. तसेच एअरबेसवरुन पाकिस्तानला इशारा दिला. तसेच त्यांनी युद्धबंदीत अमेरिकेची कोणतीही मध्यस्थी नव्हती हेही स्पष्ट केले. त्यांनी म्हटले की, युद्धबंदीत अमेरिकेची कोणतीही मध्यस्थी नव्हती. तसेच काश्मीर मुद्दा देखील पाकिस्तान आणि भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. यावर कोणत्याही बाहेरच्या देशाची भूमिका आम्ही स्वीकारणार नाही. तसेच पाकिस्तानकडून पुन्हा हल्ला झाल्यास भारत त्याला चोख प्रत्युत्तर देईल असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले.