All-party delegation in Japan underscored India's resolve in fight against terror TMC MP Abhishek Banerjee
नवी दिल्ली: पहलगामच्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणापूर्ण वातावरण होते. दरम्यान दोन्ही देशात लष्करी संघर्ष सुरु होता. पाकिस्तानने भारतावर अनेक गंभीर आरोप केले होते. परंतु भारताने पाकिस्तानच्या प्रत्येक आरोपाला चोख प्रत्युतर दिले आहे. तसेच भारताचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ ऑपरेशन सिंदर आणि पाकिस्तानकडून सुरु असलेल्या कटकारस्थानांविरोधात जागतिक स्तरावर भारताची भूमिका प्रभावीपण मांडण्यासाठी विविध देशांच्या दौऱ्यावर होते.
दरम्यान तृणमूल कॉंग्रेस (टीएमसी) खासदार अभिषेक यांच्यासह भारताच्या सर्व पक्षीय शिष्टमंडळाने जपान दौरा पूर्ण केला आहे. या शिष्टमंडळाचा उद्देश भारताचा दहशतवादविरोधाचा दृढ संकल्प जगासमोर मांडण्याचा होता. याअंतर्गत जगाच्या ३३ राज्यांमध्ये सात शिष्टमंडपाठवण्यात आले होते. यापैकी एका पथकाने टोकियोमधील भारतीय दूतावासात चर्च केली. या चर्चेत भारताने ऑपरेशन सिंदूर मोहीमेंतर्गत पाकिस्तान आणि पाव्याप्त काश्मीरमधील (पीओके) दहशतवादी तळांवर केलेल्या कारावाईवर चर्चा करण्यात आली. भारताच्या शिष्टमंडळाने स्पष्ट केले की नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करताना एक दहशतवादी नेटवर्क नष्ट करण्यात आले आहे.
टीएमसीटे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शिष्टमंडळाच्या टेकियोत जपानशी झालेल्या चर्चेची माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, जपानमधील आपल्या चर्चा यशस्वी ठरल्या आहे. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने जगाला स्पष्ट संदेश दिला आहे. भारताची ही कारवाई जागतिक शांतात आणि सुरक्षिततेसाठी आपली वचबद्धता दर्शवते. जपानने दहशतवादविरोधी भारताला पाठिंबा दिला आहे. तसेच हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केली आहे.
बॅनर्जी यांनी सांगितले की, सोलमध्ये हे अभियान पुढे नेण्याचा भारताचा दृढ निश्चय आहे. भारत दहशतवादविरुद्धच्या जागतिक लढाईत धौर्याने सामना करेल. यासाठी भारताचे नेतृत्त्व आणि आंतरराष्ट्रीय एकत मजबूत करण्याच्या दिशेने सकारात्मक पाऊलल उचलले गेले आहे, असे बॅनर्जी यांनी सांगितले.
Our global outreach in Japan concluded with a meaningful engagement at the Indian Embassy.
United in purpose, we drew attention to the grievous Pahalgam terror attack and highlighted India’s calibrated response- One that decisively dismantled terror infrastructure in Pakistan… pic.twitter.com/YmktcNa3tE
— Abhishek Banerjee (@abhishekaitc) May 24, 2025
दुसरीकडे टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी देखील भारताच्या या सकारात्मक पावलाचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले की, भारताने दहशतवादविरोधीत जागतिक स्तरवार उचलेले पाऊल सकारात्मक आहे. यांअतर्गत सर्वपक्षीय शिष्टमंडळ विविध देशांना भेट देत आहे आणि आपला चांगला उद्देश साध्य होत आहे. हे पाहून मला अतिशय आनंद होत आहे.
तसेच राष्ट्रीय हितासाठी आणि सार्वभौमत्त्वाच्या रक्षणासाठी केंद्राच्या प्रत्येक निर्णयाच्या पाठीशी टीएमसी ठामपणे उभा राहिल. ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला विनंत केली आहे की, शिष्टमंडळ परतल्यावर संसदेचे अधिवेशन बोलवण्यात यावे आणि देशातील नागरिकांना संघर्षाबद्दल माहिती द्यावी. ही माहिती जाणून घेण्याचा त्यांचा अधिकार आहे.