Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘शांतीपेक्षा जास्त रणनीती…’ डोनाल्ड ट्रम्पला नोबेल न मिळाल्यामुळे अमेरिका भडकली, समोर आली पहिली प्रतिक्रिया

व्हाईट हाऊसने म्हटले आहे की नोबेल समितीने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या शांततेच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष केले. ट्रम्प यांच्या कार्यालयाने म्हटले आहे की ते शांततेचा पाठपुरावा यापुढेही करत राहतील.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 10, 2025 | 07:33 PM
नोबेल हुकल्यावर अमेरिकेकडून पहिली प्रतिक्रिया (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

नोबेल हुकल्यावर अमेरिकेकडून पहिली प्रतिक्रिया (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • डोनाल्ड ट्रम्पचा नोबेल पुरस्कार हुकला 
  • मारिया कोरिना ठरल्या शांतता पुरस्काराच्या मानकरी
  • अमेरिकेची पहिली प्रतिक्रिया 
गेल्या कित्येक महिन्यापासून चर्चेचा विषय असणाऱ्या नोबेल शांतता पुरस्काराच्या नावावर अखेर आज पडदा पडला. डोनाल्ड ट्रम्प यांना डावलून २०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर झाल्यानंतर अमेरिकेने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नोबेल समितीने शांततेपेक्षा राजकारणाला प्राधान्य दिल्याचे सिद्ध केले आहे असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे.

अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे आणि यामध्ये संतप्त प्रतिक्रिया देत आपले शांततेचे काम असेच पुढे चालू ठेवणार असल्याचेही सांगितले आहे. नक्की काय आहे ही प्रतिक्रिया जाणून घेऊया 

शांततेपेक्षा राजकारण: अमेरिका

ओव्हल ऑफिसने म्हटले आहे की मचाडो यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन नोबेल समितीने शांततेपेक्षा राजकारणाला प्राधान्य दिले आहे. व्हाईट हाऊसचे कम्युनिकेशन्स डायरेक्टर स्टीव्हन चुएंग यांनी ट्विटरवर पोस्ट केले आहे की, “नोबेल समितीने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शांततेला चालना देण्याच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष केले आहे. असे असूनही, ट्रम्प शांततेसाठी प्रयत्न करत राहतील. ते युद्धे संपवत राहतील आणि जीव वाचवत राहतील. ते मानवतावादी करुणेचे माणूस आहेत.”

President Trump will continue making peace deals, ending wars, and saving lives. He has the heart of a humanitarian, and there will never be anyone like him who can move mountains with the sheer force of his will. The Nobel Committee proved they place politics over peace. https://t.co/dwCEWjE0GE — Steven Cheung (@StevenCheung47) October 10, 2025

“मारिया कोरिना लाखो लोकांना प्रेरणा देतील”

नॉर्वेजियन नोबेल समितीने घोषणा केली आहे की त्यांनी व्हेनेझुएलाच्या लोकांच्या लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी मारिया कोरिना मचाडो यांना २०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर केला आहे. नोबेल समितीने पुढे म्हटले आहे की, त्यांच्या जीवाला गंभीर धोका असूनही, मारिया कोरिना यांनी त्यांचे काम सुरू ठेवले. त्यांची निवड निश्चितच लाखो लोकांना प्रेरणा देईल.

Nobel Peace Prize: नोबेल पुरस्काराची घोषणा; डोनाल्ड ट्रम्प नव्हे तर ‘यांना’ मिळाला शांततेचा नोबेल पुरस्कार

या देशांनी ट्रम्प यांना नामांकन दिले

व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना २०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार मिळाल्याने ट्रम्प यांच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून, ते अनेक देशांमध्ये युद्धे संपवण्याचा दावा करत नोबेल शांतता पुरस्कारासाठी आपला दावा करत आहेत. इस्रायल, रशिया, अझरबैजान, पाकिस्तान, थायलंड, आर्मेनिया आणि कंबोडिया सारख्या देशांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना नामांकन दिले आहे.

या वर्षी या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी ३३८ नामांकन मिळाले होते, ज्यात ९४ संस्था आणि विविध क्षेत्रातील २४४ व्यक्तींचा समावेश होता. ट्रम्प यांनी दावा केला की ते इतिहासातील पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी नऊ महिन्यांच्या कालावधीत आठ युद्धे सोडवली आहेत.

Nobel Peace Prize 2025 Live: नोबेल शांतता पुरस्काराची आज घोषणा, डोनाल्ड ट्रम्पला मिळणार का?

Web Title: America first reaction about donald trump importance after losing nobel peace prize 2025 to maria corina

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2025 | 07:33 PM

Topics:  

  • Donald Trump
  • nobel prize
  • World news

संबंधित बातम्या

इस्रायली हेरांनी पेटवला इराण? मोसादच्या ‘त्या’ गुपित ऑपरेशनमुळे वाहिला रक्ताचा पाट, धक्कादायक पुरावे समोर
1

इस्रायली हेरांनी पेटवला इराण? मोसादच्या ‘त्या’ गुपित ऑपरेशनमुळे वाहिला रक्ताचा पाट, धक्कादायक पुरावे समोर

ऑपरेशन सिंदूर तर फक्त ट्रेलर….! भारताचा पाकिस्तानला थेट इशारा, ८ दहशवादी कॅम्प सैन्याच्या रडारवर
2

ऑपरेशन सिंदूर तर फक्त ट्रेलर….! भारताचा पाकिस्तानला थेट इशारा, ८ दहशवादी कॅम्प सैन्याच्या रडारवर

Iran Protest : इराणमध्ये रक्तरंजित दडपशाही! रस्त्यावर शेकडो मृतदेह, आंदोलकांच्या हत्येचे भयावह चित्र उघड, VIDEO
3

Iran Protest : इराणमध्ये रक्तरंजित दडपशाही! रस्त्यावर शेकडो मृतदेह, आंदोलकांच्या हत्येचे भयावह चित्र उघड, VIDEO

US Greenland Takeover : ग्रीनलँडवर आता ट्रम्पचे राज्य? अमेरिकेच्या संसदेत विधेयक सादर, चीन-रशियाचे दणाणले धाबे
4

US Greenland Takeover : ग्रीनलँडवर आता ट्रम्पचे राज्य? अमेरिकेच्या संसदेत विधेयक सादर, चीन-रशियाचे दणाणले धाबे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.