'बायडेन यांनी खुर्ची सोडून हॅरिसला राष्ट्रध्यक्षपद सोपवावे'; ट्रम्प यांच्या शपथ घेण्याआधी कोणी केली मागणी?
वॉश्गिंटन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची रणधुमाळी संपली आहे. या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांनी बहुमताने विजय मिळवला आहे. इतर देशाच्या पंतप्रधानांनी ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या समर्थकांमध्ये निराशा पसरली आहे. ट्रम्प यांनी बहुमताचा आकडा पार करत कमला हॅरिस यांचा पराभव केला होता. दरम्यान कमला हॅरिस यांच्या समर्थकापैकी एका व्यक्तीने जो बायडेन यांना इस्ताफा देऊन कमला हॅरिस यांना अध्यक्षपद सोपवण्याची मागणी केली आहे.
डेमोक्रॅटिक टीमचे माजी संचालक जमाल सिमन्स ने जो बायडेन यांना मागितला राजीनामा
मिळालेल्या माहितीनुसार, कमला हॅरिस यांच्या टीमचे माजी संचालक जमाल सिमन्स यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना पदाचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे. यामुळे कमला हॅरिस यांना अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून स्थान मिळू शकेल. जमाल सिमन्स यांनी एका टॉक शोमध्ये म्हटले की “जो बायडेन यांनी त्यांच्या कार्यकाळात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. परंतु आता वेळ आली आहे की त्यांनी देशासाठी बदलाच्या दिशेने एक पाऊल टाकावे.”
Biden should resign and make Kamala #47. What I said on @CNNSOTU this morning. https://t.co/3KqmTMFuyL
— Jamal Simmons (@JamalSimmons) November 10, 2024
बायडेन यांच्या राजीनाम्याने इतिहास घडवण्याची संधी- जमाल सिमन्स
याशिवाय जमाल यांनी असेही म्हटले की, बायडेन यांनी राजीनामा देऊन कमला हॅरिस यांना राष्ट्राध्यक्षपदावर बसवावे. यामुळे हॅरिस अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनतील. सिमन्स यांचे असे मत आहे की बायडेन यांच्या राजीनाम्याने इतिहास घडवण्याची संधी आहे. सिमन्स यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर देखील पोस्ट केली आहे.
यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, “जो बायडेन यांनी त्यांच्या कार्यकाळात उत्तम कामगिरी केली, परंतु आता त्यांनी शेवटचे वचन पूर्ण करावे आणि अमेरिकेत महिलांना अधिक नेतृत्वाची संधी देण्यासाठी पद सोडावे.” त्यांची अशी अपेक्षा आहे की डेमोक्रॅटिक पक्षाने आता पारंपारिक राजकारणापासून पुढे जाऊन नवीन विचारांची दिशा स्वीकारली पाहिजे.
कमला हॅरिस अध्यक्ष झाल्यास महिलांसाठी आदर्श निर्माण होईल
सिमन्स यांचे म्हणणे आहे की बायडेन आगामी 30 दिवसांत राजीनामा देऊ शकतात. यामुळे हॅरिस यांना राष्ट्राध्यक्षपद मिळेल. हॅरिस या पदावर विराजमान झाल्यास त्या अमेरिकेच्या 47व्या अध्यक्ष होतील आणि महिलांसाठी आदर्श निर्माण करतील. या विधानावर अनेक मतमतांतरे आहेत, मात्र डेमोक्रॅटिक पक्षातील काही घटकांचा बिडेन यांच्याकडून राजीनाम्याची अपेक्षा आहे, विशेषत: जे कमला हॅरिस यांच्या नेतृत्वाला महत्त्व देत आहेत.