फोटो सौजन्य: सोशल मीडिया
जेरूसेलम: दोन महिन्यांपूर्वी 17 सप्टेंबर रोजी लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहवर पेजर हल्ले करण्यात आले होते. त्यानंतर हे हल्ले कोणी केले याबाबत तपास सुरू होता. मात्र कोणतीही माहिती समोर आली नाही. दरम्यान आता इस्त्रायलने या हल्ल्यांची जबाबदारी घेतली आहे. इस्त्रायने स्पष्ट केले आहे की, 17 सप्टेंबर रोजी लेबनॉनमधील हिजबुल्ला सदस्यांच्या पेजरमध्ये झालेले स्फोट केले होते. या स्फोटांची जबाबदारी तब्बल 54 दिवसांनी इस्त्रायने स्वीकारली आहे.
इस्त्रायलच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला
मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी देशाच्या सुरक्षेबाबत कडक भूमिका घेत या हल्ल्याला अधिकृत मान्यता दिल्याचे स्पष्ट केले आहे. नेतान्याहूंचे प्रवक्ते ओमर दोस्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी कॅबिनेटच्या बैठकीत नेतान्याहू यांनी लेबनॉनमधील हिजबुल्ला ठिकाणांवर हल्ल्याचे आदेश दिले होते. नेतन्याहूंनी स्पष्ट केले की, याआधी इस्त्रायली संरक्षण संस्था आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या हल्ल्या विरोध दर्शवला होता. मात्र नेतन्याहूंनी या हल्ल्यांचा निर्णय घेतला.
हे देखील वाचा- इस्त्रायलचा लेबनॉनवर पुन्हा कहर; हवाई हल्ल्यात लहान मुलांसह 40 जणांचा मृत्यू
हिजबुल्लाह प्रमुख नसरल्लाहपासून धोका वाटत होता
यामागचे कारण स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, त्यांनी हिजबुल्लाह प्रमुख यांचा धोका वाटत होता. त्यामुळे त्यांनी इस्त्रायच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला आणि हे हल्ले घडवून आणले होते. या हल्ल्यांमध्ये हिजबुल्लाशी संबंधित 40 लोकांचा मृत्यू झाला, तर 3000 हून अधिक लोक जखमी झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, हिजबुल्लाहने त्यांच्या सदसअयांना पेजर दिले होते.याचा वापर ते संदेश पाठवण्यासाठी आणि प्रताप्त करण्यासाठी करत होते.
पेजरमध्ये बॉम्ब स्फोट करून 20 तासांत हिजबुल्लाहच्या प्रमुखाचा खात्मा
इस्रायलच्या गुप्तचर संस्थांना याची माहिती मिळली. त्यांनतर त्यांनी पेजरमध्ये बॉम्ब सेट करून स्फोट घडवून आणला. हिजबुल्लाने यापूर्वीच आपल्या सदस्यांना मोबाईल फोन वापरणे बंद करण्याचे आदेश दिले होते, पण पेजरचा वापर सुरू ठेवला होता. 27 सप्टेंबर रोजी यूएनमध्ये भाषण दिल्यानंतर नेतान्याहू यांनी हिजबुल्लाच्या मुख्यालयावर हल्ला करण्यासाठी परवानगी दिली. यानंतर अवघ्या 20 तासांत इस्रायलने हल्ल्या करून हिजबुल्लाह प्रमुख हसन नसराल्लाह यांचा खात्मा केला.
इस्रायलच्या सुरक्षेसाठी घेतलेल्या या कठोर निर्णयावर नेतान्याहू यांची ठाम भूमिका
हिजबुल्ला ही लेबनॉनमधील एक प्रभावी शिया संघटना असून त्यावर इराणचा प्रभाव आहे. इस्रायलशी विरोध असल्याने हिजबुल्ला आणि हमास हे एकत्र आहेत. इस्रायलच्या सुरक्षेसाठी घेतलेल्या या कठोर निर्णयावर नेतान्याहू यांची ठाम भूमिका लक्षात घेण्याजोगी आहे, ज्यामुळे लेबनॉनमध्ये संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.