America in danger North America slowly disappearing into Earth says researchers
वॉशिंग्टन: सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या आणि इतर अनेक निर्णयांमुळे मोठा गोंधळ सुरु आहे. लाखो लोक ट्रम्प मस्क विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. ट्रम्प-मस्क गो बॅक अशा घोषणा दिल्या जात आहेत. लोकांनी Hands Off आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील टेक्सासमधील ऑस्टिन विद्यापीठातील संशोधकांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे.
संशोधकांनी नवीन अभ्यासात असे आढळून आहे आहे की, अमेरिकेच्या मिडवेस्ट भागात पृथ्वीचा एक तुकडा हळूहळू आपल्या भूगर्भात ओढला जात आहे. शास्त्राज्ञांनी अमेरिकेतील लिथोस्फीयर म्हणजे पृथ्वीचा बाह्य थर पातळ होत असल्याचे म्हटले आहे. या प्रक्रियेला शास्त्राज्ञांनी क्रेकोनिक थ्रिनिंग असे म्हटले आहे. या धक्क्दायदायक खुलास्याने मोठी खळबळ उडाली आहे. यासाठी शास्त्रज्ञांनी भूकंपीय इमेजिनिंगचा वापर केला.
यामुळे संशोधकांना त्यांच्या निरिक्षमातून पृथ्वीखाली गळतीसारख्या आकाराच्या शोध लागला. या गळतीचे दृश्य सुमारे 640 किलोमीटर खोलवर पसरलेले आहे. तसेच मिशिगन, नेब्रास्का आणि अलबामा या राज्यांमध्ये विस्तृत भागांखाली ही गळती संशोधकांना आढळून आली आहे. या भागात पृथ्वाचा तुकडा मंद गतीने भूगर्भात मेंटलमध्ये उतरत आहे. हा भाग अगदी फनेलसारखा दिसत असून खालच्या दिशेने दगडांनाही खेचत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
या मागचे कारण सांगताना संशोधकांनी खंडाच्या प्राचीन गाभ्यातील किंवा क्रॅटॉनच्या पायथ्यापासून मिळणाऱ्या आवरणामुशे क्षेत्र जमिनीत लुप्त होत असल्याचे म्हटले आहे. तसेच साधारण 20 मिलियन वर्षापूर्वी फरालोन ही सागरी प्लेट उत्तर अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याच्या खाली सरकली होती. नंतर ती हळूहळू आणखी पुढे सरपकत गेली आणि त्याचे तुकडे झाले. हे तुकडे पृथ्वीच्या गर्भात गेले. ही प्रक्रिया अजूनही सुरु आहे. यामुळे अमेरिकेचा मोठा भाग जमिनीत लुप्त होत आहे.
संशोधकांच्या म्हणण्यानुसार, ही प्रक्रिया मिडवेस्टच्या भागांमध्ये पसरली आहे. परंतु याचा परिणाम संपूर्ण उत्तर अमेरिकेवर होण्याची शक्यता आहे. पृथ्वीच्या तुकड्याची हळूहळू होणारी झीज भविष्यात महागांत पडू शकते. यामुळे भूगर्भीय स्थिरतेवर परिणाम होण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. याचे संशोधन करणारे शास्त्रज्ञ पोस्टडॉक्टरल फेलो जुनलिन हुआ यांनी, “आपण प्रथमच ही प्रक्रिया प्रत्यक्षरित्या पाहिली आणि खूप रोमांचक असल्याचे म्हटले आहे. हा शोध भविष्यामध्ये भूगर्भीय घडामोडी समजून घेण्यासा महत्वाचा मानला जात आहे.