Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. रशियाशी असलेल्या मैत्रीवरून ट्रम्प भारतावर नाराज असल्याचे म्हटले जात होते. त्यामुळे त्यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लावला होता. मात्र आता त्यांनी हा निणर्य बदलला असून अजून जास्त टॅरिफ लावण्याचा अमेरिकेने भारतावर आता ५० टक्के टॅरिफ लावला आहे.
भारत रशियन तेलाची सातत्याने खरेदी करत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत. अमेरिकेने या आधी भारतावर २५ टक्के टॅरिफ लादला होता. मात्र आता अमेरिकेने हा कर २५ वरून ५० टक्क्यांवर नेला आहे. आता ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के कर लावला आहे. त्यामुळे भारताची चिंता वाढली आहे.
अमेरिकेने लादलेला हा अतिरिक्त कर २१ दिवसांनी लागू होणार आहे. साधारणतः २७ ऑगस्टपासून हा कर लागू होणार आहे. ट्रम्प यांनी काही तासांपूर्वीच भारताला कर वाढवण्याची धमकी दिली होती. २४ तासांमध्येच अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता भारत काय निर्णय घेणार किंवा भारताची भूमिका काय असणार हे पाहावे लागणार आहे.
ट्रम्पचा टॅरिफ जाचकच! ‘या’ देशांनी केला तीव्र विरोध
भारत
ट्रम्प यांनी भारतावर २५% कर लादला आहे. सध्या त्यांनी हा कर वाढवण्याची धमकी दिली आहे. रशियाशी सुरु असलेला तेल व्यापार थांबवण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. परंतु भारताने याला विरोध केला आहे. भारताने स्पष्ट केले आहे की, प्रत्येक देशाला त्याचे राष्ट्रीय आणि आर्थिक हित साधण्याचा अधिकार आहे, यामुळे भारत यासाठी आवश्यक ती पावले उचलत राहिल. शिवाय अमेरिका स्वत:हा रशियाकडून खते आयात करतो, यामुळे त्यांनी भारताला सल्ला देऊ नये.
डोनाल्ड ट्रम्पचा टॅरिफ जाचकच! ‘या’ देशांनी केला तीव्र विरोध
रशिया
याच वेळी रशियाने देखील भारताला समर्थन दिले आहे. रशियाने भारतविरोधी विधानांना त्यांच्या राष्ट्रीय हितासाठी धोक्याचे मानले आहे. तसेच त्यांच्या भारतासारख्या मित्र देशांना धमकवण्याचा कोणताही अधिकार कोणत्याही देशाला नसल्याचेही पुतिन यांनी म्हटले आहे. सध्या रशिया आणि अमरेकितही युक्रेन युद्धावरुन तीव्र वाद सुरु आहे.
ब्राझील
ट्रम्प यांनी सर्वाधिक कर ब्राझीलवर लादला आहे. ब्राझीलवर ट्रम्पने ५०% कर लागू केला असून याला तीव्र विरोध केला आहे. ब्राझीलचे अध्यक्ष लुईस इनासियो लुला दा सिल्वा यांनी अमेरिकेपुढे झुकण्यास नकार दिला आहे. ब्राझीलने जागतिक व्यापार संघटनेशी संपर्क साधण्याचा विचार केला आहे. ब्राझीलने अमेरिकेचा थेट दबाव झुडकारत WTO कडे धाव घेतली आहे. ट्रम्प यांनी ब्राझीलला वाटाघाटीसाठी चर्चेची ऑफर दिली आहे, परंतु लुला दा सिल्वा यांनी याला स्पष्ट नकार दिला आहे. त्यांनी यावर आधी भारताशी आणि चीनशी चर्चा करण्याचे म्हटले आहे.