Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्तन कापले, मेंटली टॉर्चर केलं अन्…. भारताची पहिली महिला गुप्तहेरचा अंगावर काटा आणणारा मृत्यू

एक काळ असा होता जिथे नोकरी करणं तर सोडाच पण घरातल्या पुरुष मंडळींकडे मान वर करुन बघण्याची देखील मुभा नव्हती अशा कठीण काळात देश स्वातंत्र्य होण्यासाठी एका महिला गुप्तहेराने आपलं आयुष्य़ देशसेवेसाठी वाहिलं.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 05, 2026 | 04:04 PM
स्तन कापले, मेंटली टॉर्चर केलं अन्…. भारताची पहिली महिला गुप्तहेरचा अंगावर काटा आणणारा मृत्यू
Follow Us
Follow Us:
  • स्तन कापले, मेंटली टॉर्चर केलं अन्….
  • देशाच्या स्वातंत्र्यासाठी केली पतीची हत्या
  • भारताची पहिली महिला गुप्तहेरचा अंगावर काटा आणणारा मृत्यू
“मेरी झाँसी कभी नहीं दूँगी” म्हणणारी झाशीची राणी असो की स्त्रीच्या अंगाला हात जरी लावला तरी परपुरुषांचं मुंडकं तलवारीने छाटणाऱ्या राजमाता जिजाऊ असो भारताच्या या मातीत अशा अनेक रणरागिणी होऊन गेल्या.  ज्यांचा इतिहास आजही मोठ्या अभिमानाने सांगितला जातो. जे बांगड्य़ा भरलेले हात चूल आणि मूल सांभाळतात,  घरातील कुटुंबाचं पालन पोषण करतात, तेच हात शस्त्र धारण करुन शत्रूचा जीव ही घेतात हे आजवर सिद्ध झालेलं आहे. आजच्या काळात अनेक महिला पोलीस दल किंवा सेैन्यात भरती होतात. आताच्या काळात हे अगदीच सामान्य आहे मात्र एक काळ असा होता जिथे नोकरी करणं तर सोडाच पण घरातल्या पुरुष मंडळींकडे मान वर करुन बघण्याची देखील मुभा नव्हती. अशा कठीण काळात देश स्वातंत्र्य होण्यासाठी एका महिला गुप्तहेराने आपलं आयुष्य़ देशसेवेसाठी वाहिलं. भारताची ही पहिली महिला गुप्तहेर कोण होती ते जाणून घेऊयात.

भारताला स्वातंत्र्य मिळावं यासाठी अनेक क्रांतीकारकांनी आपलं रक्त वाहिलं. मात्र अशी एक रणगारिगिणी होती, जिने देशसेवेसाठी सर्वस्व पणाला लावलं ती भारताची पहिली महिला गुप्तहेर म्हणजे निरा आर्या. उत्तर प्रदेशच्या एका श्रीमंत कुटुंबात 1904 मध्ये निरा यांचा जन्म झाला. सोन्याचा चमचा तोंडात घेऊनच त्या जन्माला आल्या होत्या. मात्र त्यांच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं. निरा यांनी गडगंज श्रीमंती आणि ऐशोआरामाचा त्याग करुन देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत दाखल होण्याचा निर्णय घेतला. ज्या मातीत आपण जन्माला आलो तिचं आपण काही देणं लागतो. हे त्यांच्या मनावर खोलवर रुजलं होतं. त्यांचं देशसेवेचं प्रेम अधिक उत्कट होतं गेलं, ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यामुळे. सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांच्या निरा यांच्य़ावर खूप प्रभाव पडला.

तो काळ होता देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी धाराधितीर्थी पडणाऱ्या वीर जवानांचा आणि यातील एक संघटना होती ती म्हणजे आझाद हिंद सेना.  याच चळवळीच्या निरा देखील एक सदस्य होत्या. आझाद हिंद सेनेतील महिलांची वेगळी रेजिमेंट होती, त्या रेजिमेंटचं नाव होतं ‘रानी झांसी रेजिमेंट’ निरा आर्या यात भारतीय महिला गुप्तहेर म्हणून कार्यरत होत्या.

Dinvishesh : अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 04 जानेवारीचा इतिहास

निरा आर्या यांचं व्यक्तिमत्वचं धाडसी होतं त्यामुळे त्यांनी लग्न सुद्धा एका नीडर व्यक्तीशीच केलं. निरा यांचे पती देखील ब्रिटीश लष्करात अधिकारी होते. निरा यांच्या पतीने केवळ स्वातंत्र्य चळवळीतील हलचाली लक्षात याव्यात यासाठी लग्न केलं होतं. निरा यांच्या प्रत्येक हलचालींवर त्यांच्या पतीने पाळत ठेवली होती. एके दिवशी त्यांच्या पतीने नेताजींसोबतच्या भेटीदरम्यान नीरा यांचा पाठलाग केला आणि गोळीबार करून नेताजींच्या चालकाला हत्या केली.

संतापाने उसळलेल्या निरा य़ांनी मागे पुढे कसलाही विचार न करता पतीची गोळ्या घालून हत्या केली. ही खबर ब्रिटीश राजवटीपर्यंत पोहोचली आणि निरा यांना अंदमानच्या कोठडीत कैद केलं. निरा यांच्याकडून स्वातंत्र्य चळवळीची माहिती काढून घेण्यासाठी ब्रिटीशांनी त्यांचा लाच देखील दिली. मात्र देशसेवेच्या प्रेमाने पेटून उठणाऱ्या निरा यांनी ब्रिटीशांचा प्रत्येक डाव हाणून पाडला. निरा यांच्याकडून कोणतीही माहिती मिळत नाही हे कळल्यावर ब्रिटीशांनी त्यांचा छळ केला. या अमानुष छळ करण्यात ब्रिटीश सैन्याने कोणतीही कसर मागे ठेवली नाही. निरा यांच्यावर अत्याचार करण्यात आले. या राक्षसीपणाचा ब्रिटीशांनी इतका कळस गाठला की, निरा यांचे स्तन कापले. त्यांना मेंटली टॉर्चर केलं. प्रचंड वेदना झाल्या पण त्या एक शब्दही बोलल्या नाही.

47 च्या स्वातंत्र्यानंतर निरा यांची कैदेतून सुटका झाली. मात्र तरी त्यांचं पुढचं आयुष्य खडतर गेलं. ज्या वाघिणीने आपलं सर्वस्व पणाला लावत देशाच्या स्वातंत्र्यासाठी सगळं सोसलं ती मात्र तिच्या शेवटच्या काळात हैदराबादमध्ये एका रस्त्यावर फुलं विकून पोटाची खळगी भागवत होती. 1998 मध्ये 26 जुलै रोजी एका रुग्णालयात तिचा करुण अंत झाला. दुर्देवाची गोष्ट हीच की, मरण्याआधी नाहीच पण मरणोत्तर देखील या वाघिणीचा सन्मान केला गेला नाही की तिची शौर्यगाथा कोणत्या पुस्तकात आढळून आली नाही,अशा वाघिणीचा झालेला अंत डोळ्यात पाणी आणणारा आहे हेच खरं.

थोर समाजसेवक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 02 जानेवारीचा इतिहास

Web Title: Who first indian female detective neera arya killed her husband for indias freedom

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 03:37 PM

Topics:  

  • india
  • India History
  • indian Soldiers

संबंधित बातम्या

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?
1

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात
2

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
3

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन
4

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.