Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Operation Absolute Resolve: 150 विमानं अन् 30 मिनिटांचा थरार! अमेरिकेने मादुरोला ‘असं’ केलं जेरबंद; बेडरूममधून थेट NYC तुरुंगात

Operation Absolute Resolve : अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना एका गुप्त लष्करी कारवाईत ताब्यात घेतले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी 'ऑपरेशन अ‍ॅब्सोल्यूट रिझोल्व' ची घोषणा केली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 04, 2026 | 03:04 PM
Operation Absolute Resolve: 150 planes and 30 minutes of excitement! America arrested Maduro 'like this'; Straight from the bedroom to a New York prison

Operation Absolute Resolve: 150 planes and 30 minutes of excitement! America arrested Maduro 'like this'; Straight from the bedroom to a New York prison

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकेच्या १५० हून अधिक विमानांनी व्हेनेझुएलाचे हवाई क्षेत्र व्यापले आणि अवघ्या ३० मिनिटांत निकोलस मादुरो यांच्या राजवटीचा अंत केला.
  •  अनेक महिन्यांच्या गुप्त नियोजनानंतर ‘डेल्टा फोर्स’ने मादुरो यांच्या किल्ल्यासारख्या सुरक्षित निवासस्थानात घुसून त्यांना आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतले.
  •  मादुरोच्या घराची हुबेहूब प्रतिकृती (Model) तयार करून अमेरिकन कमांडोजनी सराव केला होता, ज्यामुळे मोहिमेत कोणतीही चूक झाली नाही.

Operation Absolute Resolve details 2026 : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच जगाने एका अशा लष्करी कारवाईचा अनुभव घेतला, ज्याची तुलना केवळ ओसामा बिन लादेनविरुद्धच्या मोहिमेसोबत केली जाऊ शकते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अत्यंत गुप्तपणे राबवलेल्या ‘ऑपरेशन अ‍ॅब्सोल्यूट रिझॉल्व’ (Operation Absolute Resolve) अंतर्गत व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. ही मोहीम केवळ ३० मिनिटांत फत्ते झाली आणि मादुरो यांची वर्षानुवर्षांची सत्ता अवघ्या काही तासांत कोसळली.

महिन्याभराचे नियोजन आणि ‘डमी’ घराचा सराव

अमेरिकन इंटेलिजन्स मागील अनेक महिन्यांपासून मादुरोच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते. मादुरो कोणत्या वेळी काय करतात, त्यांचे पाळीव प्राणी कोणते, अगदी ते कोणत्या प्रकारचे कपडे घालतात, याची इत्थंभूत माहिती गोळा करण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे, अमेरिकेने मादुरोच्या निवास्थानाची (Miraflores Palace) हुबेहूब प्रतिकृती तयार केली होती. विशेष दलाच्या जवानांनी या ‘डमी’ मॉडेलवर शेकडो वेळा सराव केला, जेणेकरून प्रत्यक्ष हल्ल्याच्या वेळी एका सेकंदाचाही विलंब होऊ नये.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Maduro Arrested: हुकूमशहांचा काळ जवळ! अमेरिकेची पुढची शिकार होणार ‘Putin’; झेलेन्स्की यांच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

१५० विमानांचा गराडा आणि कराकसमध्ये अंधार

शुक्रवारी रात्री १०:४६ वाजता ट्रम्प यांनी या मोहिमेला अंतिम मंजुरी दिली. रडारला चकवा देण्यासाठी अमेरिकन हेलिकॉप्टर्स समुद्रसपाटीपासून अवघ्या १०० फूट उंचीवरून उड्डाण करत व्हेनेझुएलात शिरले. त्याच वेळी आकाशात १५० हून अधिक अमेरिकन लढाऊ विमाने, बॉम्बर्स आणि ड्रोन्सनी एक सुरक्षा कवच तयार केले. हल्ल्याच्या काही मिनिटे आधी कराकस शहराचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला, ज्यामुळे व्हेनेझुएलाच्या सैन्याला काय घडत आहे, याचा अंदाजच आला नाही.

JUST IN: US FINALLY DID IT taking out Venezuelan dictator Nicolas Maduro has just landed in New York aboard a DOJ 757 Freedom For Venezuela 🇻🇪 Source: AZ Intel pic.twitter.com/OihYvajfr8 — Ape𝕏 (@CubanOnlyTrump) January 3, 2026

credit : social media and Twitter

बेडरूममधून अटक: मादुरोचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला

जेव्हा ‘डेल्टा फोर्स’चे कमांडोज मादुरोच्या निवासस्थानी पोहोचले, तेव्हा मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस (Cilia Flores) गाढ झोपेत होते. आवाजाची चाहूल लागताच मादुरो यांनी एका अतिशय मजबूत ‘स्टील सेफ रूम’मध्ये पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते त्या सुरक्षित खोलीचा दरवाजा बंद करू शकले नाहीत. कमांडोजनी अत्यंत चपळाईने त्यांना आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतले. या मोहिमेत एकही अमेरिकन सैनिक मारला गेला नाही, हे या ऑपरेशनचे सर्वात मोठे यश मानले जाते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Kamala Harris: ‘ड्रग्ज ही केवळ थाप आहे!’ Venezuela कारवाईमागील खरं सत्य कमला हॅरिस यांनी केलं उघड, मादुरोच्या अटकेवर संताप

थेट अमेरिकन युद्धनौकेवरून न्यूयॉर्ककडे प्रस्थान

अटकेनंतर मादुरो यांना तातडीने हेलिकॉप्टरने समुद्रात तैनात असलेल्या ‘USS Iwo Jima’ या युद्धनौकेवर नेण्यात आले. तिथे मादुरो यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेले आणि कानात आवाज रोखणारे हेडफोन्स लावलेले फोटो ट्रम्प यांनी स्वतः शेअर केले. सध्या मादुरो न्यूयॉर्कमधील एका सुरक्षित तुरुंगात असून, त्यांच्यावर ‘नार्को-टेररिझम’ आणि ड्रग्स तस्करीचे खटले चालवले जाणार आहेत.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: 'ऑपरेशन अ‍ॅब्सोल्यूट रिझॉल्व' म्हणजे काय?

    Ans: हे अमेरिकन लष्कराचे एक गुप्त ऑपरेशन होते, ज्याद्वारे व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक करून अमेरिकेला नेण्यात आले.

  • Que: या मोहिमेत किती विमानांचा वापर करण्यात आला?

    Ans: या मोहिमेत १५० हून अधिक अमेरिकन विमानांनी आणि हेलिकॉप्टर्सनी सहभाग घेतला होता.

  • Que: मादुरो यांना कुठे नेण्यात आले आहे?

    Ans: मादुरो यांना न्यूयॉर्कमध्ये नेण्यात आले असून, तिथे त्यांच्यावर अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी खटला चालवला जाईल.

Web Title: Operation absolute resolve maduro arrested us military caracas raid 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • international news
  • Nicholas Maduro
  • Venezuela

संबंधित बातम्या

World War 3: अमेरिका-इराण युद्ध पेटले! ’48 तासांत इराणवर नरक कोसळेल’; राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा शेवटचा इशारा
1

World War 3: अमेरिका-इराण युद्ध पेटले! ’48 तासांत इराणवर नरक कोसळेल’; राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा शेवटचा इशारा

डोनाल्ड ट्रम्पच्या अहंकारात अनेकजण होरपळे अन् अर्थव्यवस्था कोलमडली; मध्यपूर्व युद्ध कधी होणार शांत?
2

डोनाल्ड ट्रम्पच्या अहंकारात अनेकजण होरपळे अन् अर्थव्यवस्था कोलमडली; मध्यपूर्व युद्ध कधी होणार शांत?

War Profits : इराण युद्धाच्या आगीत ट्रम्पच्या दोन्ही मुलांची चांदी; अरब देशांना ‘हे’ महत्वाचे शस्त्र विकून कमावली अमाप संपत्ती
3

War Profits : इराण युद्धाच्या आगीत ट्रम्पच्या दोन्ही मुलांची चांदी; अरब देशांना ‘हे’ महत्वाचे शस्त्र विकून कमावली अमाप संपत्ती

US-Iran War: क्षणात घडवून आणेल विध्वंस! अमेरिकेने इराणवर डागले सर्वात घातक ‘स्टेल्थ’ क्षेपणास्त्र; काय आहे ‘JASSM-ER’ ची ताकद?
4

US-Iran War: क्षणात घडवून आणेल विध्वंस! अमेरिकेने इराणवर डागले सर्वात घातक ‘स्टेल्थ’ क्षेपणास्त्र; काय आहे ‘JASSM-ER’ ची ताकद?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.