Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

America-Russia Relation: ‘6 महिन्यात दाखवून देऊ…’; रशियावर लादलेल्या निर्बंधांवर डोनाल्ड ट्रम्प यांचा खुला इशारा

ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदीवर निर्बंध लादल्याचा दावा केला होता. भारत रशियाकडून तेल आयात कमी करणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते. पण दुसरीकडे भारत सरकारकडून या दाव्यावा कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 24, 2025 | 02:51 PM
Trump's controversial statement before Putin's India visit! Warned of 500% tariff on Russian oil purchase

Trump's controversial statement before Putin's India visit! Warned of 500% tariff on Russian oil purchase

Follow Us
Close
Follow Us:
  • रशियावर लादलेल्या निर्बंधांबाबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
  • खरा परिणाम पुढील सहा महिन्यांत दिसून येईल- डोनाल्ड ट्रम्प
  • रशियाने युद्ध संपवण्यासाठी खऱ्या अर्थाने पावले उचलावीत
अमेरिकेचे रशियावर लादलेल्या निर्बंधांबाबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा मोठ विधान केलं आहे. अमेरिकेने तेल खरेदीसंदर्भात रशियावर लादलेल्या निर्बंधांबाबत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी, ‘अमेरिकेच्या निर्बंधांचा रशियाच्या अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम होणार नाही.’ तसेच, स्वाभिमानाला प्राधान्य देणारा कोणताही देश दबावाखाली काम करत नाही. अशी प्रतिक्रीया दिली होती. त्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भाष्य केलं आहे.

”हा शेवटचा आठवडा?” २९ ऑक्टोबरनंतर सुरु होणार एलियन विरुद्ध मानव युद्ध?

गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ” या निर्बंधांचा खरा परिणाम पुढील सहा महिन्यांत दिसून येईल. त्यांना असे वाटते याचा मला आनंद आहे. सहा महिन्यांत निकाल काय येतो ते मी तुम्हाला सांगेन. पाहूया काय होते ते. दुसरीकडे,काही विशेषज्ज्ञांनी, अमेरिकेने लादलेल्या या निर्बंधांचे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांवर आणि आंतरराष्ट्रीय धोरणांवर दीघक्षकालीन परिणाम होऊ शकतात. अशी शक्यता वर्तवली आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अमेरिकेने रशियाच्या दोन सर्वात मोठ्या तेल कंपन्यां, रोझनेफ्ट आणि लुकोइलवर निर्बंध लागू केले. युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेले दिर्घकालीन युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेने रशियावर दबाव आणण्यासाठी हे निर्बंध लादले आहेत. निर्बंधांच्या घोषणेनंतर, जागतिक तेलाच्या किमती ५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

India-China News: भारतासाठी धोक्याची घंटा; चीन सीमारेषेवर लाहुंजे एअरबेसवर लढाऊ विमानांसाठी हॅंगरची उभारणी

भारतावर संभाव्य परिणाम

दरम्यान, ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदीवर निर्बंध लादल्याचा दावा केला होता. भारत रशियाकडून तेल आयात कमी करणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते. पण दुसरीकडे भारत सरकारकडून या दाव्यावा कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाच्या दबावाखाली असा निर्णय घेतला नाही. भारत सरकारचे आपल्या लोकांना परवडणारे आणि विश्वासार्ह तेल पुरवणे हे ध्येय आहे. तसेच, भारत सरकारकडून देशासाठी सर्वोत्तम निर्णय घेतले जातील,असंही सरकारकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी भारतातून येणाऱ्या वस्तूंवर ५० टक्क्यांपर्यंत कर लादल्यामुळे भारत आणि अमेरिकेत आणखी काही दिवसांपासून तणाव वाढत आहेत.

दुसरीकडे, युक्रेन रशिया युद्धबंदीसाठी पुतिन प्रयत्न करत नसल्याच्या कारणावरूनही डोनाल्ड ट्रम्प नाराज आहेत. युक्रेन-रशिया युद्धबंदीसाठी या वर्षी दोन्ही नेत्यांची भेट होणार होती. परंतु आता रशियाने अमेरिकेचा युद्धबंदीचा प्रस्तावही नाकारला आहे. त्यामुळे बैठक सध्यासाठी पुढे ढकलली आहे. तर, रशियाने युद्ध संपवण्यासाठी खऱ्या अर्थाने पावले उचलावीत अशी आपली इच्छा आहे, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.

 

Web Title: America russia relation we will show in 6 months donald trumps open warning on sanctions imposed on russia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2025 | 02:51 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Russia
  • Vladimir Putin

संबंधित बातम्या

डोनाल्ड ट्रम्पचा अमेरिकेत दरारा! थेट कपाळावर पासपोर्ट चिटकवून फिरतायेत लोक VIDEO VIRAL
1

डोनाल्ड ट्रम्पचा अमेरिकेत दरारा! थेट कपाळावर पासपोर्ट चिटकवून फिरतायेत लोक VIDEO VIRAL

US Winter Storm 2026: समुद्राच्या पोटात वाढतोय ‘बर्फाळ राक्षस’! अमेरिकेवर ‘बॉम्ब सायक्लोन’चे संकट; 18 राज्यांत आणीबाणी
2

US Winter Storm 2026: समुद्राच्या पोटात वाढतोय ‘बर्फाळ राक्षस’! अमेरिकेवर ‘बॉम्ब सायक्लोन’चे संकट; 18 राज्यांत आणीबाणी

India-EU व्यापार कराराने अमेरिकेला झोंबली मिरची; ट्रम्प यांच्या मंत्र्याचा जळफळाट, म्हणाले ‘भारत फायद्यात…
3

India-EU व्यापार कराराने अमेरिकेला झोंबली मिरची; ट्रम्प यांच्या मंत्र्याचा जळफळाट, म्हणाले ‘भारत फायद्यात…

जागतिक व्यापारात भारताचा डंका! युरोपनंतर ब्राझील आणि कॅनडाही करणार भारतासोबत व्यापार, ट्रम्प पडले एकटे?
4

जागतिक व्यापारात भारताचा डंका! युरोपनंतर ब्राझील आणि कॅनडाही करणार भारतासोबत व्यापार, ट्रम्प पडले एकटे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.