भारतासाठी धोक्याची घंटा; चीन सीमारेषेवर लाहुंजे एअरबेसवर लढाऊ विमानांसाठी हॅंगरची उभारणी
India-China News: भारत-चीन सीमारेषेवर चीन सैन्याच्या हालचाली वाढवल्या असून सीमेवर चीनकडून आपली ताकद दाखवण्याचा पुन्हा प्रयत्न करताना दिसत आहे. चीनने लाहुंजे एअरबेसवर अनेक मोठे बदल केले आहेत. अलिकडच्या काळात लाहुंजे एअरबेसवर लढाऊ विमानांसाठी हॅंगरची जलद बांधकाम सुरू केले आहे. याची काही छायाचित्रेही समोर आली आहेत. लाहुंजे एअरबेसवर लढाऊ विमाने आणि हल्ला करणाऱ्या हेलिकॉप्टरसाठी 36 नवीन, मजबूत आश्रयस्थाने बांधण्यात आली आहेत.
चीनने भारतीय सीमेजवळ एअरबेस बांधणे हा एक धोक्याचा इशारा मानला जात आहे. चीनचा लाहुंजे एअरबेस अरुणाचल प्रदेशातील तवांगपासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर आहे. या एअरबेसवर लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरसाठी हँगर बांधत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, हे एअरबेस इतर अनेक आधुनिक सुविधांनी सुसज्ज असतील. आपत्कालीन परिस्थितीत सीमेजवळ शस्त्रास्त्रे सहजरित्या आणि जलद तैनात करण्याची चीनची योजना आहे. म्हणूनच हा एअरबेस तयार केला जात आहे.
ओपन-सोर्स इंटेलिजेंस फर्म डेट्रेस्फा ने X वर काही छात्राचित्रे शेअर केली आहेत. अहवालानुसार, चीन लाहुंजे एअरबेसवर काम वेगाने प्रगती करत आहे. नवीन निवासस्थाने, हँगर आणि अॅप्रनचा विस्तार केला जात आहे. चीन आणि भारत यांच्यातील तणाव सातत्याने वाढत आहे. त्यातच भारतीय सीमेजवळ चीनचे बांधकाम चिंतेचे कारण असू शकते. चीनची नेहमीच भारतीय भूमीवर नजर राहिली आहे. अरुणाचल प्रदेशवरही त्याची नकारात्मक नजर आहे. महत्त्वाचे म्हणजे, चीनने अनेक वादग्रस्त नकाशे जारी केले आहेत.
ओपन-सोर्स इंटेलिजेंस फर्म @detresfa ने त्यांच्या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या फोटोंनुसार, चिनी सैन्य लहुंजे एअरबेस वेगाने विकसित करत आहे. या एअरबेसमध्ये नवीन आश्रयस्थाने, हँगर आणि अॅप्रनचा विस्तार करण्यात आला आहे.विशेषज्ञांचे म्हणणे आहे की, भारतासोबतच्या संभाव्य संघर्षात चीन या एअरबेसचा वापर करू शकतो. अलिकडच्या काळात चीन आणि भारताच्या सीमेस अनेक वेळा तणाव निर्माण झाला आहे, त्यामुळे या एअरबेसच्या वाढत्या क्षमतेवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. पोलिस, सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय धोरण तज्ज्ञांच्या मते, ही स्थिती सीमेवरील सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक ठरू शकते.
क्रिकेटप्रेमींसाठी महत्वाची बातमी! क्रिकेट अकादमीचे नवीन स्पोर्ट्स अरेना हडपसरमध्ये सुरु
अलिकडच्या वर्षांत चीनने भारतीय सीमेजवळील बांधकामांना लक्षणीय गती दिली आहे. त्यांनी रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा तयार केल्या आहेत, तसेच तिबेट आणि शिनजियांगमध्ये अनेक विमानतळ आणि हेलीपोर्ट बांधले असून ते अपग्रेडही केले आहेत. विशेषत: अरुणाचल प्रदेशच्या आसपासच्या भागांसाठी एअरबेसचे अपग्रेड करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते, कारण या भागात रस्त्याने पोहोचणे कठीण आहे. त्यामुळे लष्करी कारवायांसाठी हवाई तळ अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि सीमावर्ती सुरक्षा रणनीतीत त्याचा मोठा वाटा आहे. या उपाययोजनांमुळे चीन सीमेवरील आपले सैन्य गतिशील ठेवण्यास सक्षम होऊ शकतो, आणि त्यामुळे भारतासाठी सुरक्षेची आव्हाने वाढतात.






