Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवकाशातील नवे रणांगण! अमेरिकेच्या सुरक्षेचा कणा ठरले ‘स्पेस फोर्स’ आणि ‘स्पेसकॉम’; पाहा का महत्वाचे?

U.S. Space Command mission : 2019 मध्ये, अनेक धोके लक्षात घेऊन स्पेस फोर्स आणि स्पेसकॉमची स्थापना करण्यात आली. स्पेस फोर्सचे काम कर्मचाऱ्यांची भरती करणे, प्रशिक्षण देणे आणि उपकरणे पुरवणे आहे, तर स्पेसकॉम हे काम करते.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 03, 2025 | 12:45 PM
america space force spacecom key role security how it works

america space force spacecom key role security how it works

Follow Us
Close
Follow Us:

U.S. Space Command Mission : गेल्या काही दशकांत युद्धाचे स्वरूप वेगाने बदलत आहे. आज केवळ जमिनीवर, पाण्यावर किंवा आकाशात लढाई होत नाही, तर चौथे रणांगण म्हणजेच “अवकाश” (Space) हे जगातील महाशक्तींनी आपली सुरक्षा रणनीती आखण्यासाठी सर्वात महत्त्वाचे ठिकाण बनवले आहे. अमेरिकेने याच धोक्याला ओळखून २०१९ मध्ये दोन महत्त्वाच्या संस्था निर्माण केल्या यूएस स्पेस फोर्स आणि यूएस स्पेस कमांड (स्पेसकॉम).

स्पेस फोर्स म्हणजे काय?

स्पेस फोर्स ही अमेरिकेची नववी लष्करी शाखा आहे, ज्याची स्थापना २० डिसेंबर २०१९ रोजी झाली. हिचं मुख्य काम म्हणजे

  • अवकाशाशी संबंधित सुरक्षा सुनिश्चित करणे

  • उपग्रह ऑपरेशन्स, जीपीएस, कम्युनिकेशन आणि हवामान प्रणालींचे संरक्षण करणे

  • अवकाश मोहिमांवर काम करणाऱ्या सैनिकांना (Guardian) भरती करणे व प्रशिक्षण देणे

  • नवे अवकाश तंत्रज्ञान विकसित करणे

स्पेस फोर्स तीन प्रमुख भागांमध्ये विभागली गेली आहे –

१. स्पेस ऑपरेशन्स कमांड (SPOC)

२. स्पेस सिस्टम्स कमांड (SSC)

३. ट्रेनिंग अँड रेडीनेस कमांड (STARCOM)

यातून हे स्पष्ट होते की अमेरिकेने आपल्या अंतराळ क्षमतांना स्वतंत्र, सक्षम आणि लढाऊ बनवण्यासाठी वेगळं सैन्य उभारलं आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : चीनच्या लष्करी परेडला अनुपस्थित राहण्यामागे PM मोदींची राजकीय खेळी; भारताच्या परराष्ट्र धोरणात लपला होता ‘हा’ मोठा संदेश

स्पेसकॉम म्हणजे काय?

स्पेसकॉम ही अमेरिकेची युनिफाइड कॉम्बॅटंट कमांड आहे. याची स्थापना सुरुवातीला १९८५ मध्ये झाली होती; मात्र २९ ऑगस्ट २०१९ रोजी ती पुन्हा सक्रिय करण्यात आली. हिचं काम केवळ अंतराळ दलापुरतं मर्यादित नाही, तर अमेरिकेच्या सर्व सैनिकी शाखांसोबत (लष्कर, नौदल, हवाईदल, मरीन) एकत्रित काम करणे हे आहे.

  • स्पेसकॉम अवकाशातील कोणत्याही धोक्यावर लक्ष ठेवते

  • युद्धाच्या परिस्थितीत थेट अवकाश ऑपरेशन्स करते

  • उपग्रहांवर हल्ले, सायबर धोके किंवा शत्रूराष्ट्रांच्या अवकाश प्रयोगांवर नजर ठेवते

युक्रेन युद्धाने दाखवलेली शिकवण

२०२२ मध्ये रशियाने युक्रेनच्या संपर्क यंत्रणांवर हल्ला केला. त्यावेळी युक्रेन सैन्याने व्यावसायिक उपग्रह तंत्रज्ञान वापरले. स्पेसएक्सच्या स्टारलिंकसारख्या सेवांमुळे त्यांना इंटरनेट, ड्रोन नियंत्रण आणि रिअल-टाइम प्रतिमा मिळाल्या. युद्धादरम्यान ७,००० हून अधिक उपग्रह सक्रिय राहिले.

यातून तीन मोठे धडे मिळाले

१. आता लहान देश देखील प्रगत अवकाश क्षमतांचा वापर करू शकतात.

२. उपग्रहांवर होणारे सायबर हल्ले हे मोठे आव्हान आहे.

३. युद्धात यश मिळवण्यासाठी जीपीएस, कम्युनिकेशन आणि इंटेलिजन्ससारखी साधने अत्यंत महत्त्वाची ठरतात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 2300 वर्षे जुन्या गूढ कबरींसोबत समोर आला इतिहासाचा थरारक अध्याय; पेरूमध्ये पुरातत्वशास्त्रज्ञांची रोमांचकारी शोधमोहीम

अमेरिकेला कोणते धोके?

यूएस स्पेस कमांडचे जनरल स्टीफन व्हाइटिंग यांनी चेतावणी दिली की

  • चीन आणि रशिया दोन्ही देश सायबर साधने, लेसर, जॅमिंग उपकरणे, थेट-चढाई उपग्रहविरोधी शस्त्रे आणि सह-कक्षीय प्रणाली विकसित करत आहेत.

  • २०२१ मध्ये रशियाने उपग्रहविरोधी चाचणी केली ज्यामुळे १,५०० हून अधिक तुकडे अंतराळात निर्माण झाले.

  • चीनने “फ्रॅक्शनल ऑर्बिटल बॉम्बार्डमेंट सिस्टम” ची चाचणी केली.

ही सर्व चाचण्या थेट अमेरिकेच्या अंतराळ सुरक्षेला आणि उपग्रह नेटवर्कला मोठं आव्हान देतात.

का आहे स्पेस फोर्स आणि स्पेसकॉम गरजेचे?

आज आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्ट जीपीएस, नेव्हिगेशन अॅप्स, आर्थिक व्यवहार, आपत्कालीन सेवा हे सर्व उपग्रहांवर आधारित आहे. जर हे नेटवर्क विस्कळीत झाले, तर केवळ सैन्यच नव्हे तर सामान्य माणसाचंही जगणं संकटात येऊ शकतं. म्हणूनच अमेरिकेने आपल्या सुरक्षेचा कणा म्हणून स्पेस फोर्स आणि स्पेसकॉम या दोन संस्था उभारल्या आहेत.

जनरल व्हाइटिंग यांचेच शब्द लक्षात घेतले तर

“आम्हाला अंतराळात युद्ध नको आहे. पण जर ते झाले, तर जिंकण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार असले पाहिजे.”

Web Title: America space force spacecom key role security how it works

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2025 | 12:45 PM

Topics:  

  • America
  • America news
  • World news

संबंधित बातम्या

Paris Summit : युक्रेनच्या हवाई सुरक्षेसाठी झेलेन्स्कींचा अमेरिकेला मोठा प्रस्ताव; ट्रम्प यांच्यासोबत पॅरिसमध्ये महत्वपूर्ण बैठक
1

Paris Summit : युक्रेनच्या हवाई सुरक्षेसाठी झेलेन्स्कींचा अमेरिकेला मोठा प्रस्ताव; ट्रम्प यांच्यासोबत पॅरिसमध्ये महत्वपूर्ण बैठक

NASA : लाखोंच्या जीवाला धोका! अमेरिकेतील ‘ही’ सर्व शहरे भीषण संकटात; नासाचा ट्रम्प यांना त्वरित कारवाईचा सल्ला
2

NASA : लाखोंच्या जीवाला धोका! अमेरिकेतील ‘ही’ सर्व शहरे भीषण संकटात; नासाचा ट्रम्प यांना त्वरित कारवाईचा सल्ला

ट्रम्प यांची ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी; जपान अमेरिकेत करणार तब्बल 550 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक, 15% टॅरिफवर ‘मोठी’ घोषणा
3

ट्रम्प यांची ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी; जपान अमेरिकेत करणार तब्बल 550 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक, 15% टॅरिफवर ‘मोठी’ घोषणा

Ismail Azizi Tanzania : मृत्यूला हरवणारा टांझानियन इसम; सहा वेळा ‘मरण पावला’, पण प्रत्येक वेळी जिवंतच परतला
4

Ismail Azizi Tanzania : मृत्यूला हरवणारा टांझानियन इसम; सहा वेळा ‘मरण पावला’, पण प्रत्येक वेळी जिवंतच परतला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.