Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेत इमिग्रेशनच्या नावाखाली रक्ताचा खेळ? गोळीबारात एकाचा मृत्यू, २ वर्षाची चिमुकलीही ताब्यात

US Immigration Controversy : अमेरिकेत पुन्हा इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या कठोर कारवाईमुळे गोंधळ उडाला आहे. मिनियापोलिसमध्ये कारावईदरम्यान एका व्यक्तीचा गोळीबारात मृत्यू झाला असून यावर लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 25, 2026 | 07:20 PM
US Immigration Controversy

US Immigration Controversy

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकेत इमिग्रेशन कारवाईत एकाचा मृत्यू
  • २ वर्षाच्या चिमुकलीला घेतलं ताब्यात
  • मिनियापोलिसमझ्ये ICE अधिकाऱ्यांविरोधात तीव्र आंदोलन
USA Immigration Controversy : वॉशिंग्टन : अमेरिकेत (America) पुन्हा एकदा इमिग्रेशन कारवाईमुळे वाद निर्माण झाला आहे. संघीय अधिकाऱ्यांच्या इमिग्रेशन कारवाईदरम्यान मिनियापोलिसमध्ये एका व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेमुळे मिनियापोलिसमध्ये तीव्र संताप उफळला आहे. इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) ही कारवाई ट्रम्प प्रशासानाच्या इमिग्रेशन धोरणाचा (Immigration) भाग असल्याचे म्हटले आहे. परंतु इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या जबरदस्तीच्या कारवाईला तीव्र विरोध केला जात आहे.

California Protest : कॅलिफोर्नियाच्या रस्त्यावर उफाळला संताप; ICE विरोधात हजारो नागरिकांचे आंदोलन

मिळालेल्या माहितीनुसार, इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी एका ५१ वर्षीय व्यक्तीवर गोळीबार केला असून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटेनेममुळे मिनियापोलिसच्या स्थानिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) च्या अधिकाऱ्यांनी या व्यक्तीकडे धोकादायक शस्त्रे आणि काडतुसे होती यामुळे गोळीबारा करण्याता आले असल्याचे म्हटले आहे. तसेच मिनियापोलिसच्या गव्हर्नरर टीम वॉल्झ यांनी या घटनेचा तीव्र विरोध केला आहे.

इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) च्या अधिकाऱ्यांनी या व्यक्तीकडे धोकादायक शस्त्रे आणि काडतुसे होती यामुळे गोळीबार करण्याता आले असल्याचे म्हटले आहे. वॉल्झ यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, गोळीबाराच्या घटनेनंतर त्यांनी व्हाइट हाउससोबत संपर्क साधला आहे. तसेच त्यांनी इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या कारवाईला तीव्र विरोध केला आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) प्रशासानाच्या इमिग्रेशन धोरणाला दडपशाही म्हणून संबोधले आहेत. सध्या या घटनांमुळे मिनियापोलिसमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.

वडीलांसह २ वर्षाची चिमुकली ताब्यात

या वेळी इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) ने आणखी एका व्यक्तीला त्याच्या २ वर्षाच्या चिमुकलीसह ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीचे नाव एल्विस जोएल टिपॉन-एचेव्हेरिया असून तो आपल्या मुलीसोबत किराणा दुकानातून घरी परतत होता. यावेळी त्याला आणि त्याच्या मुलीला ताब्यात घेण्यात आले. CNN ने दिलेल्या वृत्तानुसार, यानंतर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी वडिल आणि मुलीली तात्काळ टेक्क्सासमधील डिटेन्शन कार्यालयात नेण्यात आले. काही तासानंतर मुलीला तिच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आले आहे.

या घटनेच्या एक दिवस आधीच एका पाच वर्षीय चिमुकल्यालाही त्याच्या वडीलांसह ताब्यात घेण्यात आले होते. त्यांना टेक्सासमधील डिटेन्शन तुरुंगात पाठवण्यात आले होते. याशिवाय एका गरदोर महिलेला जमिनीवर दाबत जबरदस्तीने अटक करण्यात आली होती. सध्या या वाढत्या हिंसक घटनांमुळे इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या कारवाईला तीव्र विरोध केला जात आहे. लोक ट्रम्प प्रशासनाविरोधात रस्त्यांवर उतरले आहेत.

अमेरिकेत इमिग्रेशन कारवाईत हिंसाचार ; ICE अधिकाऱ्याच्या गोळीबारात एक महिला ठार, VIDEO

💡

Frequently Asked Questions

  • Que: मिनियापोलिसमध्ये गोळीबाराची घटना कधी आणि कशी घडली?

    Ans: मिनियापोलिसमध्ये संघीय अधिकाऱ्यांच्या इमिग्रेशन कारवाईदरम्यान एका ५१ वर्षीय व्यक्तीवर गोळी झाडण्यात आली आहे. त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

  • Que: इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी २ वर्षाच्या चिमुकलीला ताब्यात का घेतलं आहे?

    Ans: इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी बेकादेशीर स्थलांतरितांवरिोधात केलेल्या कारवाई व्यक्तीला ताब्यात घेतले होते, यामुळे त्याच्या २ वर्षाच्या मुलीलाही काही काळासाठी अधिकाऱ्यांच्या ताब्यात ठेवण्यात आले आहे.

  • Que: या घटनांवर अमेरिकेत काय प्रतिसाद येत आहे?

    Ans: इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या कारवाईत लोकांचा बळी जात आहे, लहान मुलांना ताब्यात घेतले जात आहे. तसेच गर्भवती महिलेला जबदस्तीने अटक केली जात आहे. यामुळे लोकांनी ICE अधिकाऱ्यांच्या कारवाईला आणि ट्रम्प प्रशासानच्या धोरणाला तीव्र विरोध केला आहे. लोकांनि निदर्शने सुरु केली आहेत.

Web Title: Usa immigration policy man shot dead by us immigration agents in minnieapolis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Illegal immigration
  • World news

संबंधित बातम्या

परराष्ट्र धोरणातील कुटनीती ठरवणार भारताचे भविष्य; धोरणात्मक स्वायत्ततेवर घ्यावा लागणार निर्णय
1

परराष्ट्र धोरणातील कुटनीती ठरवणार भारताचे भविष्य; धोरणात्मक स्वायत्ततेवर घ्यावा लागणार निर्णय

कॅनडात गँगवॉरचा थरार! भारतीय वंशाच्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या; प्रकरणाची चौकशी सुरु 
2

कॅनडात गँगवॉरचा थरार! भारतीय वंशाच्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या; प्रकरणाची चौकशी सुरु 

India-Canada: मार्क कार्नी आणि ट्रम्प यांच्यात मतभेदांचे रण पेटले; US च्या 100% टॅरिफवर कॅनडाचे ‘Buy Canadian’ने प्रतिउत्तर
3

India-Canada: मार्क कार्नी आणि ट्रम्प यांच्यात मतभेदांचे रण पेटले; US च्या 100% टॅरिफवर कॅनडाचे ‘Buy Canadian’ने प्रतिउत्तर

Syria Ceasefire : सीरियात 15 दिवसांची ‘शांतता’! 9,000 ISIS दहशतवाद्यांच्या नशिबाचा फैसला होणार; अमेरिकेचा मोठा प्लॅन
4

Syria Ceasefire : सीरियात 15 दिवसांची ‘शांतता’! 9,000 ISIS दहशतवाद्यांच्या नशिबाचा फैसला होणार; अमेरिकेचा मोठा प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.