
Middle East Conflict
काय आहे इराणचे Nuclear गुपित? अमेरिकेच्या ‘त्या’ गुप्त अहवालाने जगभरात खळबळ, इस्रायलही हादरला
मिळालेल्या माहितीनुसार, खामेनेई इराणची राजधानी तेहरान येथे एका सुरक्षित अंडरग्राउंड बंकरमध्ये लपून बसले आहेत. त्यांनी आपल्या देशाचा प्रशासकीय कारवाभ आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याची जबाबादीर धाकटा मुलगा मसूद खामेनेई यांच्याकडे सोपवली असल्याचे सांगितले जात आहे. दावा केला जात आहे. खामेनेई ज्या बंकरमध्ये आश्रयित झाले आहेत, तो अधिक मजबूत आणि गुप्त भुयारांनी वेढलेला आहे. यापूर्वी देखील इस्रायलशी युद्धादरम्यान खामेनेईंनी या बंकरमध्ये हलवण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणवर संभाव्य हल्ल्याचा इशारा पुन्हा दिल्यानंतर खामेनेई गायब झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वत्र खामेनेई हल्ल्याच्या भितीने लपून बसले असल्याचा दावा केला जात आहेत. तसेच यामुळे खामेनेईंच्या सुरक्षेबाबातच्या चर्चांनाही उधाण आहे. असाही दावा केला जात आहे की, या बंकरमध्ये बसून खामेनेई देशाची सुत्रे संभाळत आहे. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि लष्करी अधिकाऱ्यांना येथूनच आदेश दिले जात आहेत.
दुसरीकडे अमेरिकेने इराणला विळखा घालण्यास सुरुवात केली आहे. ट्रम्पच्या आदेशानंतर अमेरिकेचे सैन्याने विमानवाहून जहाजे, युद्ध नौकांचा मोठा ताफा इराणच्या दिशेने रवाना केला आहे. पॅसिफिक महासागरातून अमेरिकेचा ताफा इराणच्या दिशेने सरकत आहेत. यामुळे इराणच्या सैन्यात गोंधळ उडाला आहे. तसेच इराणच्या लष्करी तळांबाबातही अमेरिकेने धक्कादायक आरोप केले आहे. इस्रायल आणि अमेरिकी हल्ल्यानंतरही इराण अण्वस्त्र बनेवणे सुरुच ठेवेल असा दावा पेंटागॉनने केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यामुळेच अमेरिका इराणवर कारवाईची शक्यता आहे.
अमेरिकेच्या या लष्करी हालचाली पाहता इराणने अमेरिकेला कडक इशारा दिला आहे. इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी स्पष्ट केले आहे की, अमेरिकेने किंवा इस्रायलने त्यांच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केल्यास याला चोख प्रत्युत्तर दिले जाऊईल. ही इराणविरुद्ध थेट युद्धघोषणा मानली जाईल. तसेच अणु तळांना नुकसान पोहचवल्यास इराण शांत बसणार नसल्याचेही पेझेश्कियान यांनी म्हटले आहे.
Ans: अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्याच्या भितीने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई अंडरग्राऊंड झाले असल्याचा दावा केला जात आहे.
Ans: दावा केला जात आहे की, खामेनेईंनी प्रशासनाची सर्व जबाबदारी धाकटा मुलगा मसूद खामेनेई यांच्याकडे सोपवली आहे.