America Strong earthquake hits Southern California
वॉशिंग्टन: अमेरिका पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या दक्षिण कॅलिफोर्निया शहराजवळील सॅन डिएगोत सोमवारी (14 एप्रिल) 5.2 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणाने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचे केंद्रबिंदू सॅन डिएगोच्या पूर्वेकडे ज्युलियनच्या पर्वतीय भागात होते. भूकंपाने सॅन डिएगो येथील शेलफ्कस हादरले तसेच लॉस एंदजेलिसच्या उत्तरकडे देखील भूकंपाचे जोरदार झटके जाणवले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या या भूकंपात कोणतीही जीवीत किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. परंतु सध्या परिसरात भितीचे वातवरण पसरलेले आहे.
अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणाने (USGS) ने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा झटका सॅन डिएगोच्या काउंटीमध्ये जाणवला. याचे परिणा लॉस एंजलिसच्या उत्तरेकडील कॉउंटपर्यंत जाणवला. रिपोर्टनुसार, 5.2 तीव्रतेच्या भूकंपानंतरही आणखी काही भूकंपाचे झटके जाणवले. सॅन डिएगोच्या जवळील ज्युलियन या डोंगराळत भागला भूकंपाचा मोठा फटका बसला. या डोंगराळ भागातील लोकसंख्या सुमारे 1500 आहे. एका स्थानिक रहिवाशाने सांगितले की, सॅन डिएगोमधील भूकंपामुळे ज्युलियन येथे लोकांच्या घराच्या खिडक्या आदळल्या.
शिवाय, माजी खाण मालक नेल्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे ईगल मायनिंग कंपनीच्या गिफ्ट शॉपमधील फोटो फ्रेम देखील पडले. तथापि, पर्यटक वापरत असलेल्या बोगद्यांमध्ये कोणतेही नुकसान झाल्याची माहिती नाही.
यापूर्वी रविवारी (13 एप्रिल) देखील भूकंपाचे धक्क जाणवले होते. यादरम्यान सुमारे दोन डझन खाणकामगार खाणीत होते. तसेच सोमवारी झालेल्या सॅन डिएगो काउंटीमधील भूकंपामुले कॅलिफोर्नियाच्या वनीकरण आणि अग्निशमन संरक्षण विभागाने खबरदारी म्हणून शाळेतील मुलांना इमारतींमधून बाहेर काढले आणि घरी पाठवण्यात आले. सॅन डिएगो काउंटी शेरीफ विभागाने सांगितले की, अद्याप कोणतीही जीवीतहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.
दक्षिण कॅलिफोर्नियाचे भूकंपशास्त्रज्ञ लुसी जोन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, एल्सिनोर फॉल्ट झोनजवळ देखील 13.4 किलोमीटर खोलीवर बूकंप झाला. कॅलिफोर्निया भूकंपप्रवण क्षेत्र आहे. तसेच एल्सिनोर अमेरिकेच्या सॅन अँड्रियास ऱॉल्ट सिस्टमचा देखील भाग आहे. या ठिकाणी दरवर्षी 4.0 तीव्रेतचे भूकंप होतात. यामुळए सॅन डिएगो रहिवासी USGS च्या शेकअलर्ट प्रणालीचा वापर करुन स्वत:चा बचाव करतात. यामुळे लोकांना एक दोन सेंकद आधी भूकंपाचा इशारा मिळतो.